आहारातील मिठाच महत्व ,तोटे आणि प्रमाण – Importance Of Salt In Diet

आहारातील मिठाचे महत्व Importance Of Salt In Diet

 आज आपण खाण्यातील स्वाद चव वाढण्यासाठी तसेच आरोग्यासाठी नेहमी जेवणात मिठाचा वापर करत असतो.

पण आपले मानवी शरीराची रचना अशी केलली गेलेली आहे की आपल्याला जसे भाजीत जेवणात कमी मीठ असले तर ती भाजी अळणी आणि बेचव लागत असते.

तसेच ते मीठ भाजीत प्रमाणापेक्षा जास्त टाकले गेले तर ते देखील आपल्या शरीराला आरोग्याला हानीकारक ठरत असते.

म्हणजेच मीठ ही एक अशी गोष्ट आहे ज्याचे प्रमाण भाजीत,जेवणात कमी असल्यावर आपल्या शरीराला हे अपायकारक ठरत असते.त्याचसोबत तेच प्रमाण जास्त देखील झालेले आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायी ठरत असते.

म्हणून आजच्या लेखात आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि जेवणात चवीसाठी मीठ का गरजेचे आहे?किती मिठाचे प्रमाण गरजेचे आहे?हे जाणुन घेणार आहोत.

सोबतच आपण किती मीठाचे प्रमाण आपल्या शरीराला घातक ठरू शकते?आणि यावर आळा घालुन आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी आपण काय करायला हवे हे देखील सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

का गरजेचे आहे मीठ?

आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि जेवणात स्वाद तसेच चव येण्यासाठी मीठ खुप महत्वाची भुमिका बजावताना दिसुन येते.

आपल्याला आत्तापर्यत एवढेच माहीत होते की भाजीला चव तसेच स्वाद येण्यासाठी मीठ गरजेचे असते.मीठाचा वापर आपण जेवणात नही केला तर सर्व अन्न बेचव तसेच अळणी बनत असते.

तसेच हेच जर आपण अधिक प्रमाणात कोणत्याही अन्नपदार्थात टाकले तर तेच अन्नपदार्थ खारट देखील होत असतात.

पण आज आपण मिठाचे काही इतरही आरोग्याच्या दृष्टीने महत्व असते ते जाणुन घेणार आहोत.

मिठाचे फायदे :  Importance Of Salt In Diet

  • मिठाचे आपल्या शरीराला अनेक फायदे होत असतात.मिठामुळे आपल्या शरीरात असलेले पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहत असते.
  • तसेच मिठाचे सेवन केल्याने आपली पचनसंस्था आणि किडनी देखील चांगल्या पदधतीने कार्य करत असते.
  • आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचे काम देखील मीठ करत असते.
  • मिठाचे नियमित केल्याने आपल्या मांसपेशी देखील व्यवस्थित काम करतात.
See also  अंग्रेजी मे फुल,सब्जी और फलो के नाम और उनका हिंदी मे मतलब - Flower,Vegetables,Fruits Names In English With Hindi Meaning

पण याचठिकाणी आपल्या शरीरात मिठाचे प्रमाण कमी राहिले तर आपल्याला खालील समस्यांचा सामना करावा लागु शकतो.

शरीरात मिठाचे कमी प्रमाण असल्यास होणारे दुष्परिणाम पुढीलप्रमाणे आहेत:

  • आपल्या शरीरातील कोलेस्टेराँलच्या प्रमाण अधिक वाढत जाते.
  • शरीराला नेहमी थकवा जाणवतो.
  • राहुन राहुन अधुनमधून आपल्याला चक्कर देखील येत असतात.
  • जास्त जेवण जात नाही आणि आपल्याला भुक देखील खुपच कमी लागत असते.
  • आपल्याला लो बिपीचा त्रास देखील जाणवत असतो.

मिठाचे इतर महत्व :

  • मिठामध्ये एकुण चाळीस टक्के सोडिअम आणि साठ टक्के क्लोरीनचा समावेश असतो.
  • शरीरात मिठाचे योग्य प्रमाण असल्याने आपल्याला गाँईटर नावाच्या रोगाला सामोरे जावे लागत नाही.

साधारणत किती मिठाचे सेवन आपण करायला हवे?

आधी जसे आपण बोललो की शरीराला कमी मीठ देखील हानीकारक ठरते आणि जास्त मीठ देखील हानीकारक ठरत असते.

अशावेळी आपल्याला हा प्रश्न पडतो की कोणत्या वयातील व्यक्तीने किती मिठाचे प्रमाण आपल्या शरीरात ठेवणे गरजेचे आहे.

वयानुसार सेवन करावयाचे मिठाचे प्रमाण :

जागतिक आरोग्य संघटनेचे असे म्हणने आहे की प्रत्येक व्यक्तीने आपल्या वयोगटानुसार मिठाचे सेवण करायला हवे.

आणि हे प्रमाण पुढीलप्रमाणे असायला हवे :

1)12 महिन्याच्या बाळाच्या आहारात जास्तीत जास्त एक ग्राम मिठाचे प्रमाण असायला हवे.

2) 1 ते 3 वर्षाच्या मुला मुलींच्या आहारात दोन ग्राम मिठाचे प्रमाण असायला हवे.

3) 4 ते 6 वर्षाच्या मुला मुलींच्या आहारात 3 ग्राम मिठाचा समावेश करायला हवा.

4)7 ते 10 वर्षाच्या मुला मुलींच्या आहारात 4 ग्रँम मिठाचा समावेश करायला हवा.

5) आणि ज्यांचे वय अकरा पेक्षा अधिक आहे त्यांनी आपल्या आहारात 5 ग्रँम मिठाचा समावेश करायला हवा.

मिठाचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने शरीराला होणारे नुकसान तसेच तोटे कोणकोणते आहेत?

शरीराला जसे कमी मीठ अपायकारक ठरते तसेच जास्त मीठ देखील घातक ठरत असते.म्हणुन आपण प्रमाणबदधपणेच मीठाचे सेवण करणे आपल्याला आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.

See also  Sgx Nifty बंद होणार आहे का? - SGX Nifty to get delisted

मिठाचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने शरीराला होणारे नुकसान पुढीलप्रमाणे आहेत :

  • अधिक मिठाचे सेवण केल्याने आपल्याला हायपर टेन्शनची समस्या उदभवू शकते.
  • आपले ब्लड प्रेशरदेखील वाढु शकते.ज्यामुळे आपल्याला हार्ट अँटक देखील येण्याची अधिक शक्यता असते.
  • जास्त मिठाचे सेवण केल्याने आपल्या शरीरातील लोह खनिजाचे प्रमाण कमी होत असते.ज्यामुळे आपल्याला अँसिडिटीची समस्या उदभवू शकते.
  • आणि शरीरात मिठाचे प्रमाण अधिक वाढल्याने आपल्याला भुक लागलेली नसताना देखील शरीरात भुक लागल्याची जाणीव होत असते.ज्यामुळे आपल्या शरीरातील कँलरीजचे प्रमाण अधिक वाढुन आपल्याला लठठपणाची समस्या देखील होऊ शकते.

 

आपण आपल्या शरीरारातील मिठाचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी काय उपापयोजना करू शकतो?

आपण आपल्या शरीरारातील मिठाचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी खालील उपाययोजना करू शकतो :

  • मिठाचे अधिक प्रमाण असलेले अन्नपदार्थाचे सेवण करणे आपण टाळायला हवे.
  • दहीमध्ये मीठ टाकून खाणे टाळायला हवे.
  • सँलेड खात असताना त्यात मीठ टाकु नये
  • ज्या व्यक्तींना हार्ट किडनी तसेच फुप्फुसाचे आजार आहेत अशा लोकांनी कमी सोडियम मिठाचे सेवण करायला हवे.
  • तळलेल्या अन्नाचे सेवण कमी करायला हवे.
  • आपण आपल्या शरीरातील सोडिअम क्लोराईडचे योग्य संतुलित प्रमाण ठेवण्यासाठी आहारात फळ आणि भाज्यांचा समावेश करायला हवा.

 

मिठामध्ये काय काय असते?

मिठामध्ये खालील जीवणसत्वांचा,खनिजांचा समावेश असतो :

  • सोडिअम
  • मँग्नेशिअम
  • कँल्शिअम
  • ब्रोमाईड