Sgx Nifty बंद होणार आहे का? – SGX Nifty to get delisted

Sgx Nifty बंद होणार आहे का? – SGX Nifty to get delisted

सध्या बाजारात एक विषयावर चर्चा सुरू आहे की एसजी एक्स निफ्टी बंद होणार आहे का?

याबाबत बातमी देखील इकोनाॅमिक्स टाईम मार्केट ह्या वर्तमानपत्रात आली आहे.

वर्तमानपत्रात असे दिले आहे की एसजी एक्स निफ्टी डिलीस्ट करण्यात येणार आहे म्हणजे काढुन टाकण्यात येणार आहे.

त्यामुळे सर्व गुंतवणूकदारांना हा प्रश्न पडला आहे की एसजी एक्स निफ्टी ज्याच्या आधारावर आपणास हे समजत होते की मार्केट सकाळी वर ओपन होईल की खाली,मार्केट मध्ये किती गॅप अप होईल किती गॅप डाऊन होईल?जे आपणास कळायचे ते आता कसे समजणार.

आजच्या लेखात आपण ह्याच बातमी विषयी थोडक्यात माहिती जाणुन घेणार आहोत.

SGX Nifty to get delisted

न्युज मध्ये असे देण्यात आले आहे की एसजी एक्स निफ्टी मधील इंडेक्स फ्युचर जे सिंगापूर एक्सचेंज मध्ये जे निफ्टीचे फ्युचर ट्रेड केले जात होते ते आता बंद केले जाणार आहे.

एप्रिल,मे जुन मधील जे फ्युचर चालु आहे ते ३० जुन २०२३ पासुन हे फ्युचर सिंगापूर एक्सचेंज ज्याला आपण एसजी एक्स म्हणतो ते निफ्टी ट्रेड मध्ये बंद होणार आहे.

अशावेळी आपणास म्हणजे गुंतवणूकदारांना हा प्रश्न हा पडतो की मार्केट मध्ये कधी गॅप अप होईल कधी गॅप डाऊन होईल हे आपणास कसे कळणार.

पण असे काहीही नाहीये एसजी एक्स निफ्टी सिंगापूर एक्सचेंज बंद झाल्यावर देखील आपणास मार्केट मध्ये कधी गॅप अप होईल कधी गॅप डाऊन होईल हे कळणार आहे.

कारण खर म्हणजे एसजी एक्स निफ्टी सिंगापूर एक्सचेंज हे बंद वगैरे होणार नाहीये.

गुजरात मध्ये एक गिफ्ट सिटी आहे ज्याला भारताच्या बाहेरचे मानले जाते.हया ठिकाणी कुठलीही कंपनी स्थापित झाल्यावर तिला भारताच्या बाहेरची कंपनी असण्याचा दर्जा दिला जातो.

एसजी एक्स निफ्टी हे गुजरात मध्ये असलेल्या ह्याच गिफ्ट सिटी जिला आय एफ एससी म्हटले जाते तिथे 3 जुलै रोजी एका नवीन नावाने रिलिस्ट करण्यात येणार आहे.

See also  वन महोत्सव विषयी माहीती - Van Mahotsav information in Marathi

इथले एक्सचेंज हे भारताच्या बाहेरील एक्सचेंज म्हणुन देखील ओळखले जाणार आहे.

ज्याला आतापर्यंत आपण एसजी एक्स निफ्टी म्हणायचो आता त्याला NSE IFSC Nifty असे म्हटले जाणार आहे.

का बंद केले जाते आहे sgx Nifty?

शासनाला असे निदर्शनास आले की खुप अधिक परदेशी गुंतवणूकदारांचा एसजी एक्स निफ्टी मध्ये गुंतवणूक करण्याकडे कल अणि रूची वाढत आहे.

म्हणुन शासनाने भारतीय मार्केटमध्ये एसजी एक्स निफ्टी लिस्ट करण्याचे ठरवले आहे.