वन महोत्सव विषयी माहीती – Van Mahotsav information in Marathi

वन महोत्सव विषयी माहीती _ Van Mahotsav information in Marathi

वन महोत्सव म्हणजे काय?वनमहोत्सव कसा साजरा केला जातो?

वन महोत्सव हा एक असा कालावधी आहे जो वर्षातुन एकदा जूलै महिन्याच्या पहिल्या आठवडयात साजरा केला जातो.या वनमहोत्सवात लोकांमध्ये वृक्ष तसेच जंगल यांच्याविषयी जागृकता निर्माण केली जाते.यासाठी विविध कार्यक्रम देखील आयोजित केले जात असतात.

यादिवशी संपुर्ण जगभरात वृक्षारोपणाची मोहीम राबविली जाते.घरोघरी रोपटे लावली जातात.आणि इतरांना देखील ह्या मोहीमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित तसेच प्रेरित केले जाते.विविध शाळा काँलेजात वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबविले जात असतात.

वन महोत्सव कधी साजरा केला जातो?

वन महोत्सव हा दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडयात साजरा केला जात असतो.1जुलै ते 7 जुलै ह्या कालावधीत हा वनमहोत्सव साजरा केला जात असतो.

2022 मध्ये वनमहोत्सवास आरंभ कधी होणार आहे?

2022 मध्ये 1 जुलै रोजी वन महोत्सवास आरंभ होणार आहे.

2022 मध्ये वनमहोत्सवाची समाप्ती कधी होणार आहे?

2022 मध्ये 7 जुलै रोजी वन महोत्ससवाचा शेवट होणार आहे.म्हणजेच तब्बल सात दिवस हा वनमहोत्सव साजरा केला जाणार आहे.

वन महोत्सवाचे महत्व –

● ह्या महोत्सवात जागोजागी वृक्षांची लागवड केली जाते.जंगलाचे संरक्षण करणे किती महत्वाचे आहे आणि त्यासाठी आपण जंगलतोडीला रोखणे किती आवश्यक आहे हे लोकांना ह्या महोत्सवात सांगितले जाते.

वन महोत्सवाचा इतिहास –

● वनस्पती शास्त्रज्ञ एम एस रंधावा यांच्याकडुन भारतातील प्रथम वृक्षारोपण सप्ताहाचे आयोजन 1947 मध्ये केले गेले होते.आणि ह्याच वर्षात खुर्शीद मोहमद खान जे दिल्लीचे उपायुक्त होते एक रोपटे लावून वृक्षारोपणाच्या पहिल्या कार्यक्रमाचे उदघाटन केले होते.

See also  पालक दिन महत्व,कोट्स,संदेश,शुभेच्छा - Parent day quotes,message,wishes in Marathi

● यानंतर मग तीन वर्षांनी अन्नमंत्री कन्हैयालाल माणिकलाल मुंशी यांनी ह्याच वृक्षारोपण मोहीमेस एक राष्ट्रीय उपक्रम म्हणुन घोषित केले.तेव्हापासुन हा कार्यक्रम जुलैच्या पहिल्या आठवडयात साजरा करण्याचे ठरवून ह्याच दिवसाला तेव्हापासुन वनमहोत्सव असे नाव देण्यात आले.

आपण वन महोत्सव दिवस कसा साजरा करायला हवा?

● आपण स्वता वृक्ष लावावे आणि इतरांना देखील वृक्षलागवड करण्यास प्रेरित तसेच प्रोत्साहित करायला हवे.

● जंगलाचे रक्षण करणे जंगल तोड रोखणे मानव हितासाठी किती आवश्यक आहे हे इतरांना पटवून द्यायला हवे.

● निसर्गाचे आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वनांचे रक्षण किती महत्वाचे आहे हे आपण जंगलतोड करत असलेल्या इतर व्यक्तींना सांगायला हवे.

1 thought on “वन महोत्सव विषयी माहीती – Van Mahotsav information in Marathi”

Comments are closed.