पालक दिन महत्व,कोट्स,संदेश,शुभेच्छा – Parent day quotes,message,wishes in Marathi
पालक दिन हा कधी साजरा केला जात असतो?
पालक दिन हा जुलै महिन्यात चौथ्या रविवारी साजरा करण्यात येतो.ज्याला मराठीत पालक दिन अणि इंग्रजीत पँरेण्टस डे असे म्हटले जाते.
2022 मध्ये पालक दिन कधी साजरा केला जाईल?
2022 मध्ये पालक दिन 24 जुलैला साजरा केला जाणार आहे.
पालक दिन का अणि कसा साजरा केला जात असतो?
आपले आईवडील जे आपणास लहानाचे मोठे करतात आपले व्यवस्थित पालन पोषण संगोपण करतात.आपणास शिकवून स्वताच्या पायावर खंबीरपणे उभे करतात अशा आपल्या जीवणाला निस्वार्थपणे आकार देणारया आपल्या आईवडीलांचा सम्मान तसेच कौतुक करण्याचा हा दिवस असतो.
यादिवशी आपण आपले मोठे बंधु,बहिण,वाडवडील ज्यांनी आईवडीलांनंतर आपली पालकत्वाची जबाबदारी पार पाडली त्यांना शुभेच्छा देत असतो.त्यांचे आभार व्यक्त करत असतो.
जागतिक पालक दिन कधी साजरा केला जात असतो?
1 जुन रोजी जागतिक पालक दिन साजरा केला जात असतो.अणि 24 जुलै रोजी राष्टीय पालक दिन साजरा केला जात असतो.
पालक दिन कोट्स,संदेश,शुभेच्छा Parent day quotes,message,wishes in Marathi
1) आपण न सांगता आपल्या मनातील सर्व काही ओळखते ती आई अणि आपले भवितव्य ओळखता ते आपले वडील हेच दोघे आपल्या जीवणाचे भविष्य सांगणारे एकमेव असे ज्योतिष असतात.
पालक दिनाच्या आपणा सर्वाना खुप खुप शुभेच्छा
2) आईची ममता,वडिलांची वटवृक्षाप्रमाणे सदैव डोक्यावर असणारी छाया ही देवानी केलेली अजब जादु आहे.
पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
3) माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारया माझे संगोपण करुन मला स्वताच्या पायावर खंबीरपणे उभे करणारया माझ्या आईवडीलांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
4) एकवेळ वेळ बदलेल,परिस्थिती,माणसे अणि काळही बदलेल पण आपले आईवडील कधीच बदलत नसतात लहानपणी जेवढे प्रेम ते आपल्यावर करतात मोठे झाल्यानंतर देखील तेवढेच प्रेम ते आपल्यावर करत असतात.
Happy parents day
5) आईवडीलांसारखे आपल्या हिताचा योग्य विचार करणारे ह्या जगात दुसरे कोणीच नाही.
पालक दिवसाच्या शुभेच्छा
6) आपल्या मूलांसाठी दिवस रात्र झटणारया अणि त्यांच्या उज्वल अणि सुरक्षित भवितव्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारया सर्व पालकांना पालक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा
7) ह्या जगात आईवडीलच असे दोन व्यक्ति आहेत ज्यांना आपल्या मुलाला स्वतापेक्षा जास्त मोठा माणुस झालेले,यशस्वी झालेले पाहायचे असते.
पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
8) हजारो लोक जीवणात भेटतात पण आपल्या लाखो चुकांना माफ करून आपल्याला जवळ घेणारे आईबाप जीवणात एकदाच भेटत असतात.
9) ह्या जगात आईवडीलांचे प्रेम सोडुन सर्व काही विकत घेता येऊ शकते.
हँपी पँरेण्टस डे
10) आईवडील हे आपल्या पाल्याचे प्रथम शिक्षक अणि गुरू असतात.
आपणा सर्वाना पालक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा
11) पालकत्व ही एक अशी जबाबदारी आहे आपणास शेवटच्या श्वासापर्यत पार पाडावी लागणारी खुप मोठी जबाबदारी आहे.