माइंडफुलनेस म्हणजे काय? जीवनातलं महत्व – Mindfulness information in Marathi

माइंडफुलनेस म्हणजे काय? जीवनातलं महत्व – Mindfulness information in Marathi

माइंडफुलनेस समजायल अगदी सोपं , ह्यातुन हे दर्शविल जाते की आपल्या सभोवताली जे काही घडत आहे, घटना ,प्रसंग घडत आहेत किंवा आपण काय करीत आहोत यावर संपुर्ण पणे मन लावून लक्ष केंद्रित करणे.
माइंडफुलनेस ला आपण ही मूलभूत मानवी क्षमता म्हणू शकतो ज्यात मानवाला कोणत्याही प्रसंगी संपूर्ण पणें सचेत राहण्याची, जागरूक राहण्याची ,मन शांत ठेवून ,सारासार विचार करत,आपण कोठे आहोत आणि आपण नेमकं काय करीत आहोत याची निष्पक्षपणे जाणीव होत असते.
सभोवताली जे काही घडत आहे किंवा कोणत्या प्रसंग समोर आला तर त्यावर अति संवेदनशील न होता जास्त भारावून न जाता किंवा आक्रस्ताळेपने प्रतिक्रिया देता समंजसपणे निर्णय घेणे.
तुम्हाला जर कायमस्वरूपी आनंदी राहायचे असेल तर तुम्ही माईंड फुलनेस थेरपी च्या मदतीने आनंदी राहू शकता.आपण जर जीवनाचां विचार केला तर आपल्या जीवनात दुःख जास्त आणि सुख कमी असते ,परंतु जेवढे आनंदाचे क्षण असतात त्याला आपण मनापासून जगले पाहिजे
काही लोकांचा स्वभावच असा असतो की ,,ते तुरुंगात मधे जरी राहिले तरी तिथे आनंदी असतात आणि काहींचा स्वभाव असा असतो ,त्यांना महालात जरी ठेवले तरी ते कायम दुखी असतात.
आपण माइंडफुलनेस नेस थेरपी च्या मदतीने कायमसवरूपी आनंदी राहू शकतो.
माइंडफुलनेस एक प्रकारे ध्यानाचा प्रकार आहे ,परंतु माईंड फुल्लणेस मधे तुम्ही तुमचे सगळे ध्यान आता जी चालू स्थिती आहे त्यात लावता.
थोडक्यात सांगायचे झाले तर माइंडफुलनेस म्हणजे चालू स्थितीत जगणे.काही लोक आपल्या भूतकाळात जगतात ,तर काही लोक आपल्या भविष्यकाळात जगतात.परंतु आपल्याला जर आनंदी राहायचे असेल तर आपण वर्तमानात जगले पाहिजे आणि आताचा क्षण जगला पाहिजेल.
असे मानले जाते की माइंडफुलनेस थेरपी चां जर तुम्ही नियमित सराव केला तर तुम्ही तुमचे पुढचे आयुष्य आनंदात घालवू शकता.तुम्ही सत्याला जेवढे स्वीकाराल तेव्हढे तुम्ही आनंदी राहाल.तुम्ही परिस्थिती नियंत्रित करू शकत नाही ,परंतु तुम्ही त्या परिस्थितीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन नक्की बदलू शकता.

See also  Narasimha Jayanti 2023 In Marathi : आज नरसिंह जयंती, जाणून घ्या भगवान विष्णूचा हा अवतार घेण्यामागची कहाणी, महत्त्व

माइंडफुलनेस करण्याचे प्रकार –

१) आपल्या श्वासावर ध्यान केंद्रित करणे
२) प्रत्येक गोष्ट लक्ष केंद्रित करून ऐकणे
३) प्रत्येक गोष्टीकडे ध्यान देऊन पाहणे
४) आपल्या विचारांवर लक्ष्य केंद्रित करणे
५) आपल्या शरीरातील क्रियांवर ध्यान करणे.

माइंडफुलनेस थेरपी चे फायदे खालीलप्रमाणे :

१) माईंडफुलनेस थेरपी च्या नियमित सरावाने आपण आपल्या विचारांवर कंट्रोल करायला शिकतो.तुम्ही जर नियमित माईंड फुलनेस थेरपी चा सराव करत असाल तर तुम्ही निराशेत जाण्याचे चांसेस कमी होतात.
२) माईंड फुलनेस थेरपी च्या नियमित सरावाने आपली लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते.
३) माईंड फुलनेस थेरपी च्या नियमित सरावाने तुमची गोष्टी आठवण्याची क्षमता वाढते.
४) माईंड फुलनेस थेरपी च्या नियमित सरावाने तुम्ही कोणत्याही स्थितीमध्ये स्थिर राहता.म्हणजे आनंदाच्या क्षणी जास्त आनंदी होत नाही आणि दुःखाच्या क्षणी जास्त दुखी होत नाही.
५) माईंड फुलनेस थेरपी च्या नियमित सरावाने तुम्हाला अंतर्गत शांती लाभते.
सगळ्यात महत्वाचे माईंड फुलनेस थेरपी च्या नियमित सरावाने तुम्हाला राग खूप कमी वेळा येतो.तुमचा स्वभाव जर रागीट असेल किंवा तुम्हाला जर सारखा राग येत असेल तर तुम्ही माईंड फुल्लनेस थेरपी चा सराव केला पाहिजे.तुम्ही काही दिवसातच माईंड फुल्ल नेस थेरपी च्या सरावाने तुमचा राग नियंत्रित करू शकता
६) माईंड फुलनेस थेरपी च्या नियमित सरावाने तुमच्या त्वरित निर्णय घ्यायच्या क्षमतेत वाढ होते.
तुमची जर झोप पूर्ण होत नसेल तर तुम्ही माईंड फुलनेस चा सराव केला पाहिजे. माईंड फुलनेस थेरपी च्या नियमित सरावाने तुम्हाला पुरेशी झोप लागते आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी फ्रेश उठता.

१) आपल्या श्वासावर ध्यान देने –

या प्रकारामध्ये तुम्ही तुमच्या श्वासावर ध्यान केंद्रित करा.तुमचा एक हात पोटावर ठेवा आणि निरीक्षण करा की जेव्हा तुम्ही श्वास घ्याल तेव्हा तुमचे पोट बाहेर येईल आणि जेव्हा श्वास सोडाल तेव्हा तुमचे पोट आत जाईल.श्वासावर ध्यान केंद्रित करताना तुमचे जर मन भटकत असेल तर आपल्या मनाला परत श्वासावर ध्यान केंद्रित करण्यासाठी प्रयत्न करा.आपण घेतलेली हवा गरम आहे की गार हे देखील तुम्ही पाहू शकता.श्वासावर ध्यान देण्याच्या सरावाने आपण आपल्या मनाला स्थिर करू शकतो.

See also  पँसिव्ह इन्कम म्हणजे काय- Passive Income In Marathi

२) ध्यान देऊन ऐकणे –

ह्या प्रकारामध्ये तुम्ही तुमचे ध्यान आपल्या आसपास वाजणाऱ्या आवाजावर लावा,जसे की हॉर्न चां आवाज , टीव्ही चा आवाज ,इत्यादी. तुम्ही कोणता आवाज मोठा आहे ,कोणता आवाज लहान आहे,आवाज कोणत्या दिशेला जात आहे ? कोणता आवाज सतत येत आहे ? कोणता आवाज थांबून थांबून येत आहे ? यावर ध्यान द्या.

३) ध्यान देऊन पाहणे

– ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आसपास च्या वस्तूकडे पहा. पहा की कोणती वस्तू मोठी आहे,कोणती वस्तू लहान आहे ,कोणत्या वस्तूचा आकार मोठा आहे ,कोणत्या वस्तूचा आकार लहान आहे ,कोणती वस्तू कोणत्या रंगाची आहे.

४) आपल्या विचारांवर ध्यान देने –

आपल्या प्रत्येकाच्या मन चंचल असते आणि ते कधीच एका जागेवर जास्त वेळ टिकत नाही.आता आपले मन इथे असले तर ,क्षणात ते अमेरिकेत जाऊ शकते.या प्रकारामध्ये तुम्ही तुमच्या विचारांवर लक्ष्य केंद्रित करा.तुमच्या मनात जे विचार येत असतील ,ते तुम्ही एका वहीत लिहीत रहा.तुम्ही एका गोष्टीचे निरीक्षण कराल की ,जेव्हा पण तुम्ही आलेला विचार तुमच्या वहीत लिहिता ,तेव्हा तो विचार तुमच्या मनात परत येत नाही.ह्यांच्या सतत प्रयत्नाने तुम्ही तुमचे चंचल मन स्थिर करू शकता.

2 thoughts on “माइंडफुलनेस म्हणजे काय? जीवनातलं महत्व – Mindfulness information in Marathi”

  1. ह्या टिप्स वाचुन मनाला खुप बरे वाटले.थोडा वेळ मन स्थिर राहिल्या सारखे वाटले.

Comments are closed.