स्वप्रे आणि त्यामागचे अर्थ अणि संकेत – Dreams and their meanings in Marathi

आपल्याला पडणारी स्वप्रे आणि त्यामागचे दडलेले काही अर्थ अणि संकेत – Dreams and their meanings in Marathi

Table of Contents

आपल्याला स्वप्न का पडत असतात?

मित्रांनो असे म्हणतात की दिवसभरात आपण जे काही पाहत असतो,ऐकत असतो,वर्तवणुक करत असतो ज्याविषयी विचार करत असतो त्याचेच काल्पणिक चित्र आपल्या मनामध्ये निर्माण होत असते आणि हेच काल्पणिक चित्र स्वप्र बनुन आपल्यासमोर येत असते.
आणि आपल्याला स्वप्नात जी पात्रे दिसत असतात.ती देखील काल्पणिकच असतात.
पण अध्यात्मिक दृष्टया विचार केला तर आपणास पडत असलेली ही स्वप्रे काल्पणिक नसुन त्यामागे काही तरी अर्थ दडलेला असतो त्यामागे काही भविष्यात घडणार असलेल्या घटना प्रसंगाचे पुर्वसंकेत दडलेले असतात जे आपल्याला स्वप्नांच्या माध्यमातुन प्राप्त होत असतात.असे देखील स्वप्न ज्योतिष शास्त्रात सांगितले जाते.
यानुसार आपल्याला पडत असलेल्या प्रत्येक स्वप्नाचे काही वेगवेगळे अर्थ निघतात.जे आज आपण समजुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

वैवाहिक दांपत्याला पडत असलेल्या स्वप्नांमागचे काही अर्थ आणि संकेत –

1)स्वप्ना मध्ये पत्नीचे दिसणे याचा काय अर्थ होतो?

जर आपणास स्वप्नात आपली पत्नी दिसुन येत असेल तर हा एक शुभ संकेत मानला जातो.याचाच अर्थ आपले आपल्या पत्नीवर खुप प्रेम आहे.आणि आपल्या वैवाहिक जीवणात याने नेहमी गोडवा राहतो.आपल्या जीवनसाथीकडुन आपणास भरपुर प्रेम मिळणार असते.
याचा असा देखील अर्थ होत असतो की देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा दृष्टी आहे.ज्यामुळे लवकरच आपल्याला धनाची प्राप्ती होणार आहे.

See also  लेक लाडकी योजना - मुलींसाठी शासनाने सुरू केली एक धमाकेदार योजना प्रत्येक मुलीला मिळणार ९८ हजार रुपये  | Lek Ladki Yojana 2023 In Marathi

स्वप्नामध्ये आपली पत्नी आपल्यासोबत निद्रासुख अनुभवताना दिसते याचा काय अर्थ होतो?

जेव्हा स्वप्नामध्ये आपणास आपली पत्नी आपल्यासमवेत निद्रासुख अनुभवताना दिसुन येत असेल तर याचा अर्थ असा होत असतो की आपल्या भविष्यात आपल्या वैवाहिक जीवणात अजुन जास्त प्रेम आणि गोडवा वाढेल.
ह्या स्वप्नाच्या माध्यमातुन आपणास नवरा बायकोमधील वाढणारे प्रेम दिसुन येत असते.

स्वप्नात पत्नीशी फारकती होताना दिसुन येणे याचा काय अर्थ होतो?

जर आपणास स्वप्नात असे दिसत असेल की आपण आपल्या पत्नीला घटस्फोट तसेच फारकती देत आहे तर हा एक वैवाहिक जीवणातील अशुभ संकेत मानला जातो.
याचा अर्थ आपले वैवाहिक जीवण चांगले चाललेले नाहीये.आपल्या वैवाहिक जीवणात ताणतणावाचे वातावरण चालु आहे.किंवा यामागे असा देखील अर्थ असु शकतो की आपले नाते भविष्यात जास्त काळ टिकुन राहणार नाही.
स्वप्नात आपला प्रियकर तसेच प्रेयसी आपल्यापासुन दुर होताना दिसुन येणे यामागचा अर्थ काय आहे?
जर आपणास स्वप्नात आपली प्रेयसी आपल्यापासुन दुर होताना दिसुन येत असेल तर याचा अर्थ भविष्यात आपले आपल्या प्रेयसीसोबतचे रिलेशनशीप ब्रेक अप होऊ शकते.

आपण आपल्या पत्नीसोबत फिरताना दिसणे या स्वप्ना मागचा अर्थ काय आहे?

आपण आपल्या पत्नीसोबत फिरताना दिसणे या स्वप्नाचा अर्थ असा होत असतो की हळुहळु आपल्या दोघांच्या नात्यामध्ये सुधारणा होऊ राहिली आहे.
तसेच लवकरात लवकर आपणा दोघांची मने जुळणार आहे.

स्वप्नात एखाद्याची अंतयात्रा जाताना दिसणे याचा काय अर्थ होतो?

स्वप्नात जर आपणास एखाद्याची अंतयात्रा जाताना दिसुन येत असेल तर याचा अर्थ नवरा-बायकोचे आपापसात भविष्यात भांडण वादविवाद होणार आहे.

आपली पत्नी आजारी असल्याचे स्वप्नात दिसणे याचा काय अर्थ होतो?

आपली पत्नी आजारी असल्याचे स्वप्नात दिसणे याचा अर्थ असा होतो की लवकरच आपल्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी समस्या दुर होणार आहेत.किंवा याचा अर्थ असा देखील होऊ शकतो की भविष्यात आपल्याला एखाद्या मोठया संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

See also  ATP म्हणजे काय? ATP Full form in Marathi

स्वप्नात आपली पत्नीचा मृत्यु झाला आहे असे दिसणे याचा काय अर्थ होतो?

स्वप्नामध्ये आपली पत्नीचा मृत्यु झाला आहे असे दिसणे याचा अर्थ असा होतो की ती आपली पत्नी दीर्घायुष्य जगणार आहे.

दैनंदिन जीवणात आपणास पडत असलेली काही इतर स्वप्न त्याचे अर्थ अणि त्यामागील दडलेले संकेत-

1)आपण उंचावरून खाली पडतो आहे असे स्वप्नात दिसणे याचा काय अर्थ होतो?
जर आपणास झोपेत असे स्वप्न पडत असेल की आपण एखाद्या उंच इमारतीवरून खाली पडतो आहे तर याचा अर्थ आपल्या मनात कशाबाबतीत तरी भय आहे.
2) कोणीतरी आपला पाठलाग करत आहे असे स्वप्नात दिसणे याचा काय अर्थ होतो?
जर आपणास स्वप्नात असे दिसत असेल की कोणीतरी आपल्या मागे लागले आहे आपला पिछा करते आहे तर याचा अर्थ असा होतो की एखादी गोष्ट आपल्याला त्रास देते आहे अणि आपण तिच्यापासुन दुर पळण्याचा प्रयत्न करतो आहे.
3) स्वप्नात जेवण करताना दिसणे याचा काय अर्थ होतो?
जर आपणास स्वप्नात असे दिसत असेल की आपण एखाद्यासोबत बसुन जेवतो आहे तर याचा अर्थ असा होत असतो की लवकरच आपल्या करीअरच्या बाबतीत एखादी चांगली वार्ता आपणास प्राप्त होणार आहे.
4) स्वप्नामध्ये देवी देवता दिसणे याचा काय अर्थ होतो?
जर आपणास स्वप्नात देवीदेवता दिसत असतील तर समजुन जावे की आपण जे काम करतो आहे त्यात आपणास यश प्राप्त होणार आहे.
5) स्वप्नात ढोल वाजत असल्याचे दिसुन येणे याचा काय अर्थ होतो?
जर एखाद्या अविवाहीत मुलीस असे स्वप्न पडत असेल तर याचा अर्थ लवकरच तिचे हात पिवळे होणार आहे.आणि हेच स्वप्र जर एखाद्या विवाहीत पुरूषाला देखील पडत असेल तर समजुन जावे की लवकरच तो बाप होणार आहे.
6) आपल्याला स्वप्नात उंदीर मेला असल्याचे दिसुन येणे याचा काय अर्थ होतो?
जर आपणास स्वप्नामध्ये उंदिर मेला असल्याचे दिसुन येत असेल तर याचा अर्थ होतो की लवकरच आपल्या आयुष्यातील दुख संपुष्टात येणार आहे.
7) स्वप्नात आपण फुलपाखरू पकडत असल्याचे दिसणे याचा काय अर्थ होतो?
समजा आपल्याला असे स्वप्र पडत असेल की आपण फुलपाखरामागे धावतो आहे अणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो आहे.तर याचा अर्थ असा होत असतो की आपल्या आवडत्या मुलामुलीसोबत आपला लवकरच विवाह होणार आहे.
8) अंगावर एखादा हिंस्स प्राणी धावून येत असल्याचे स्वप्नात दिसणे याचा काय अर्थ होतो?
जर आपणास असे स्वप्र पडत असेल की आपल्यावर एखादा हिंस्स प्राणी हल्ला करतो आहे किंवा आपल्यावर धावून येतो आहे तर याचा अर्थ आपल्यावर लवकरच एखादे मोठे संकट येणार आहे.
आणि इतर कोणावर प्राणी हल्ला करताना दिसुन येत असेल तर समजुन जावे की आपल्या आयुष्यात काहीतरी वाईट घटना प्रसंग घडणार आहे.
9) स्वप्नात आपले डोळे लाल झाले असल्याचे दिसुन येणे याचा काय अर्थ होतो?
जर आपणास स्वप्नात आपले डोळे लाल झाले असल्याचे दिसुन येत असेल तर हे आपण लवकरच आजारी पडणार असल्याचे लक्षण मानले जाते.
आणि डोळे सुजलेले दिसणे हे जीवणात अजुन आनंद आणि संतुष्ठी मिळण्याचे संकेत आहे.
10) स्वप्नात पैसे दिसणे याचा काय अर्थ होतो?
जर आपणास स्वप्नामध्ये पैसे दिसुन येत असतील तर याचा अर्थ असा होतो की आपणास लवकरच धनप्राप्ती होणार आहे.
11) स्वप्नामध्ये पाणी दिसणे याचा काय अर्थ होतो?
जर आपणास स्वप्नात पाणी दिसुन येत असेल तर याचा अर्थ असा होत असतो की लवकरच करीअर तसेच व्यवसायाच्या बाबतीत एखादी खुशखबर आपल्याला ऐकु येणार आहे.
12) स्वप्नामध्ये विहीर दिसणे याचा काय अर्थ होतो?
स्वप्नामध्ये विहीर दिसणे याचा अर्थ असा होत असतो की भविष्यात आपणास भरपुर मानसम्मान प्राप्त होणार आहे.

See also  पुदिना (Mint) चे फायदे -Pudina information in Marathi

3 thoughts on “स्वप्रे आणि त्यामागचे अर्थ अणि संकेत – Dreams and their meanings in Marathi”

  1. स्वप्नात जर स्वतःचा अपघात होताना दिसला आणि मारणार असे वाटत असताना जाग आली तर याचा अर्थ काय

  2. गणपती बसवण्याची तयारी झालेली असताना अचानक मूर्ती खाली पडून गायब होणे या स्वप्नाचा अर्थ काय?

Comments are closed.