राष्टीय टपाल कामगार दिवस – National Postal Worker Day In Marathi

राष्टीय टपाल कामगार दिवस – National Postal Worker Day In Marathi

आज डिजीटल क्रांतीचे युग झाले आहे ज्यामुळे आता लोक आधीसारखे कोणाला पत्र लिहिण्यापेक्षा डायरेक्ट मँसेज तसेच ईमेल करण्याला अधिक प्राधान्य देतात.

पण वेळ जरी बदलली असेल तरी आपल्या जीवणात असलेले डाक खात्याचे अणि डाक कर्मचारींचे स्थान अजुनही बदललेले नाहीये.

आज आपण एक अत्यंत महत्वाच्या दिवसाविषयी जाणुन घेणार आहोत.

जो निस्वार्थ भावनेने समर्पित होऊन उन,वारा पाऊस यांचा विचार न करता सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर असणारया आणि आपली सेवा करत असलेल्या डाक कर्मचारींना समर्पित केला गेला आहे.ज्याचे नाव आहे राष्टीय टपाल कामगार दिवस.

1) राष्टीय टपाल कामगार,डाक कर्मचारी दिवस कधी साजरा करण्यात येतो?

राष्टीय टपाल कामगार दिन दरवर्षी 1 जुलै रोजी साजरा केला जातो.

2) राष्टीय टपाल कामगार,डाक कर्मचारी दिवस का साजरा केला जातो?

समाजामध्ये टपाल कामगार घरोघरी टपाल पोहचवून जे सामाजिक सेवेचे काम करत असतात.त्यांच्या ह्याच योगदानाची दखल घेत त्यांचे कौतुक आणि सम्मान करण्यासाठी त्यांचे मनापासुन आभार व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

तसेच आपल्या प्रत्येकाच्या जीवणात असलेले डाक कर्मचारी वर्गाचे विशेष स्थान आणि योगदान आठवण करून देणे हा राष्टीय टपाल कामगार दिन साजरा करण्याचा मुख्य हेतु आहे.

3) राष्टीय टपाल कामगार दिवस साजरा करण्यास आरंभ कधीपासुन झाला?त्याचा इतिहास काय आहे?

अमेरिका ह्या देशातील एका फेमस टपाल सर्विस पुरवणारयाने 1997 मध्ये हा दिवस साजरा करायला सुरूवात केली होती.तेव्हापासुन हा दिवस दरवर्षी साजरा केला जाऊ लागला.

See also  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काही प्रेरणादायी विचार -30 Inspirational thoughts of Babasaheb Ambedkar in Marathi

4) आपल्या जीवणात टपाल कामगारांची भुमिका –

● टपाल कामगार उन्हा तान्हात पावसात तसेच कुठल्याही परिस्थीतीत देखील दुर अंतरावर घाम गाळत सायकलवर पँन्डल मारत घरोघरी जाऊन पत्र तसेच टपाल सुरक्षितपणे पोहचवण्याचे काम करत असतात.ज्यात आपले महत्वाचे पार्सल,लेटर जाँब काँल लेटर इत्यादी समाविष्ट असते.

● जेव्हा देशात कोरोनाने थैमान घातले होते तेव्हा देखील आपले सर्व महत्वाचे पार्सल लेटर आपणास घरपोच आणुन देण्याचे काम डाक कर्मचारी करीत होते.म्हणजे परिस्थिति कशीही असो डाक कर्मचारी सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर असतात.त्यांच्या ह्याच समर्पणाचा निष्ठावंतपणे कार्य करण्याचा गौरव दरवर्षी 1 जुलै रोजी करण्यात येतो.

5)भारतात डाक सेवेस कधीपासुन आरंभ झाला होता?

भारतात 1 आँक्टोंबर 1854 मध्ये डाक सेवेस आरंभ करण्यात आला होता.

6)भारतात पहिले पोस्ट आँफिस कुठे स्थापित करण्यात आले होते?

भारतामधील कोलकत्ता ह्या शहरामध्ये पहिले पोस्ट आँफिसची स्थापणा करण्यात आली होती.जी 1774 मध्ये करण्यात आली होती.