रॅमन मॅगसेसे पुरस्कार विषयी माहिती Ramon Magsaysay Magsaysay award information in Marathi
नुकताच रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार देऊन तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांना सन्मानित करण्यात आले आहे.असे सांगितले जाते आहे की तब्बल ६४ वर्षांनंतर व्यक्तिगत रीत्या त्यांना हा पुरस्कार दिला जातो आहे.
असे सांगितले जाते की दलाई लामा यांना हा पुरस्कार देण्याची घोषणा १९५९ मध्येच करण्यात आली होती.पण चीनमुळे दलाई लामा यांना तिबेट मधुन बाहेर पडावे लागले होते.
म्हणुन दलाई लामा यांना हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाता आले नव्हते असे म्हटले जाते.
दलाई लामा यांना हा पुरस्कार का दिला जातो आहे?
दलाई लामा यांनी तिबेटी समदायासाठी आतापर्यंत जो काही संघर्ष केला आहे तिबेटी संस्कृतीस जी काही प्रेरणा प्राप्त करून दिली आहे त्यांच्या ह्याच महान कार्यासाठी दलाई लामा यांना रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
असे सांगितले आहे की दलाई लामा यांना देण्यात आलेला हा पहिला आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार आहे.
रॅमन मॅगसेसे पुरस्कार काय आहे?
रॅमन मॅगसेसे हा एक पुरस्कार आहे जो फिलिपींसचे राष्ट्रपती यांच्या आठवणीत स्मरणार्थ दिला जातो.ह्या पुरस्काराची स्थापणा १९५७ मध्ये करण्यात आली होती.
असे सांगितले जाते की ह्या पुरस्काराच्या स्थापणेसाठी फिलिपिन्स सरकार सोबत राॅकफेलर सोसायटीने देखील आपले विशेष योगदान दिले आहे.
रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणाला दिला जातो?का दिला जातो?
रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी बजावणाऱ्या समाजसुधारकांना समाजसेवकांना विशेषकरून दिला जातो.
ह्या पुरस्काराला एशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून देखील संबोधित केले जाते.
रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणकोणत्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यासाठी दिला जातो?
साहित्य क्षेत्र,पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी समाजात शांततापूर्ण आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करण्यासाठी तसेच समाजसेवेचे कार्य करण्यासाठी रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार दिला जातो.
रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे स्वरूप कसे असते?
रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्याला एक प्रशस्तीपत्रक अणि स्मृतिचिन्ह दिले जाते सोबत विजेत्यास बक्षिसाची काही रोख रक्कम देखील देण्यात येत असते.
रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार सर्वप्रथम कोणाला देण्यात आला होता?
विनोबा भावे यांना १९५८ दरम्यान सर्वप्रथम रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार कोठे दिला जातो?
रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार फिलिपींसची राजधानी असलेल्या मनीला येथे देण्यात येत असतो.
आतापर्यंत कोणत्या दिग्दज महान व्यक्तींना रॅमन मॅगसेसे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे?
प्रकाश आमटे
किरण बेदी
बाबा आमटे
मदर तेरेसा
विनोबा भावे
अरविंद केजरीवाल
आरके लक्ष्मण
सोनम वांगचुक
चिंतामणराव देशमुख
जयप्रकाश नारायण
एम एस स्वामी नाथन