रेशनकार्ड धारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आता धान्याऐवजी मिळणार बँक खात्यात रोख पैसे | Ration card- Money will be transferred instead of food grains

Money will be transferred instead of food grains

रेशनकार्ड धारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आता धान्याऐवजी मिळणार बँक खात्यात रोख पैसे

शासनाने एक नवीन जीआर काढला आहे ज्यात असे दिले आहे की केशरी रेशनकार्ड धारकांना आता आपल्या रेशन कार्डवर धान्या ऐवजी रोख पैसे दिले जाणार आहे.

महाराष्ट्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडुन ही महत्त्वाची योजना राबविण्यात येत आहे.ही योजना राज्यांमधील एकूण १४ आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यांतील नागरीकांसाठी असणार आहे.

ज्यात बीड, बुलढाणा, वर्धा,अमरावती,परभणी, उस्मानाबाद,नांदेड,अकोला,वाशिम,हिंगोली, औरंगाबाद,जालना,लातुर,यवतमाळ इत्यादी जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.

ह्या नवीन योजनेअंतर्गत एका लाभार्थी व्यक्तीस धान्य ऐवजी एक महिन्याचे रेशन विकत घेण्यासाठी १५० रूपये इतकी रोख रक्कम दिली जाणार आहे.

जर समजा आपल्या कुटुंबात एकुण पाच जण आहेत तर आपणास एकुण १५० रूपये प्रती व्यक्ती प्रमाणे ७५० रूपये ह्या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.

  1. आपल्या कुटुंबातील सर्व लाभार्थी सभासदांचे पैसे हे कुटुंबातील महिला लाभार्थी व्यक्तीच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.
  2. म्हणून प्रत्येक कुटुंबातील महिला लाभार्थी व्यक्तीचे बँक अकाऊंट हे त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे.लाभार्थींनी मिळालेल्या पैशातून गहु तांदुळ याची खरेदी करावी.अणि उरलेल्या पैसे आपल्या आवश्यकतेनुसार खर्च करावेत.
  3. आपल्या केशरी रेशनकार्ड वर धान्याऐवजी रोख पैसे प्राप्त करण्यासाठी रेशनकार्ड धारकांना राज्य शासनाने भरावयास सांगितलेला फाॅम भरायचा आहे.अणि हा फाॅम भरून लवकरात लवकर सबमीट करायचा आहे.
  4. सदर फाॅम भरताना फाॅममध्ये अर्जदाराने आपले नाव अणि पत्ता टाकायचा आहे.यानंतर आपला शिधापत्रिकेच्या नंबर म्हणजेच रेशनकार्ड नंबर देखील टाकायचा आहे.
  5. यानंतर रेशनकार्ड वर असलेल्या आपल्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या वैयक्तिक बँक खाते तपशील देखील भरून घ्यायचा आहे.
  6. अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे इथे आपण जो बँकेचा तपशील देणार आहे त्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
  7. तसेच बँकेचे नाव,बँकेच्या शाखेचे नाव,बँक खाते क्रमांक, दिलेले असणे गरजेचे आहे.आपण दिलेले बँक खाते पर्सनल आहे का जाॅईट आहे हे देखील येथे द्यायचे आहे.
  8. शेवटी बॅकेचा आय एफसी कोड टाकून झाल्यावर फाॅम सबमीट करताना राशन कार्डच्या पहिल्या अणि शेवटच्या पेजची झेरॉक्स अणि बँकेच्या खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स फाॅमसोबत जोडायची आहे.
  9. मग फाॅमवर आपल्या गावाचे नाव,दिनांक,आपल्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे नाव टाकुन आपली सही करायची आहे.अणि रेशन दुकानात जाऊन भरलेला फॉर्म जमा करून द्यायचा आहे.
  10. यानंतर जेव्हाही धान्याऐवजी पैशांची वाटणी सुरू केली जाईल तेव्हा आपल्या कुटुंबातील लाभार्थी व्यक्तींची रक्कम आपल्या कुटुंबातील महिला प्रमुखाच्या बँक खात्यावर जमा केली जाईल.

सर्व काही आता महिलांसाठी एसटी प्रवासात सर्व महिलांना मिळणार ५० टक्के इतकी सुट 

सदर फाॅमचे स्वरूप कसे आहे हे आपण शासनाने काढलेल्या जीआर मध्ये जाऊन बघु शकतात.अणि त्या फाॅमची प्रिंट काढुन तो भरून रेशन दुकानात जमा करू शकता.

जीआरची लिंक – राज्य शासनाने भरावयास सांगितलेला फाॅम -DOWNLOAD