पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील एसपीजी कमांडोचा दुदैवी मृत्यू – Unfortunate death of SPG commando in Prime Minister Narendra Modi’s convoy

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील एसपीजी कमांडोचा दुदैवी मृत्यू – Unfortunate death of SPG commando in Prime Minister Narendra Modi’s convoy

आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्या एसपीजी मार्फत सुरक्षेची सुविधा देण्यात आली आहे.अणि मोदी हे आपल्या देशातील एकमेव असे व्यक्ती आहेत ज्यांची सुरक्षा करण्याची जबाबदारी एसपीजी कमांडो कडे सोपविण्यात आली आहे.

त्याच एसपीजी कमांडो दलातील एका सैनिकाचा अपघाती मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

ह्या सुरक्षा रक्षकाचे नाव गणेश गीते असे आहे.गणेश‌ हा मोटारसायकलने आपल्या पत्नी अणि मुलांसोबत येत असताना त्यांच्या बाईकचा तोल गेला अणि गणेश यांनी त्यांचे कुटुंबीय गोदावरी नदीच्या उजव्या पात्रात जाऊन पडले होते.

आजुबाजुला असलेल्या लोकांनी हा प्रकार लक्षात येताच गणेश अणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली पण गणेश गीते यांचा कालव्यात वाहुन जाऊन दुदैवी मृत्यू झाला आहे.

त्यांची मुले अणि पत्नी यांनाच वाचविण्यात नागरीकांना यश प्राप्त झाले आहे.

कोण आहेत गणेश गीते?

गणेश गीते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष सुरक्षा पथकात तैनात असलेले जवान आहेत.गणेश हे केंद्रीय राखीव सुरक्षा बलात कार्यरत आहेत.

24 फेब्रुवारी 2023 नातेवाईकाच्या लग्नासाठी सिन्नर तालुक्यातील गावी मेंढी येथे रजा घेऊन आले होते.आपली पत्नी रुपाली अणि एक मुलगा एक मुलगी सोबत ते मोटारसायकल वर शिर्डी येथे गेले होते.

अणि गुरूवारी10 मार्च 2023 रोजी आपल्या कुटुंबासमवेत शिर्डी हुन परतताना अचानक त्यांच्या बाईकचा तोल गेला ज्यात गणेश त्यांची पत्नी मुलगा मुलगी हे सर्वजण कालव्यात जाऊन पडले.

आजूबाजूच्या लोकांना हा प्रकार लक्षात येताच घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली अणि गणेश यांच्या पत्नी अणि मुलांचा कसाबसा जीव वाचविला पण गणेश यांना वाचविण्यात नागरीकांना अपयश आले गणेश यांचा कालव्यात बुडुन वाहुन गेल्याने दुदैवी मृत्यू झाला आहे.

See also  पीएम किसान योजनेचा १४ व्या हप्त्याची तारीख जाहीर योजनेचा लाभ करण्यासाठी ही तीन कामे आत्ताच करून घ्या अन्यथा १४ व्या हप्त्याचा लाभ प्राप्त होणार नाही PM kisan samman nidhi yojana 14th installment in Marathi

मग तत्काळ गणेश यांना एनडी आर एफच्या पथकाने शोधायला सुरुवात केली ज्यात घटनास्थळापासुन 500 मीटर इतक्या दुर अंतरावर एन डी आर एफच्या पथकास गणेश गीते यांचा पाण्यात वाहुन गेलेला मृतदेह आढळून आला.

गणेश यांच्या दुखद निधनामुळे संपुर्ण नाशिक जिल्हा तसेच सिन्नर तालुक्यात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

सदर घटने विषयी माहिती प्राप्त होताच सिन्नर औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, पोलिस काॅन्सटेबल हीरामण बागुल, विनोद जाधव विजयसिंह ठाकुर धनाजी जाधव इत्यादींनी घटनास्थळी मदतीसाठी त्वरीत धाव घेतली होती.

पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील घटनास्थळी धाव घेत गणेश यांच्या कुटुंबीयांची त्वरीत भेट घेतली.

बाईक NOC साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा | How to Apply for Bike NOC Online In Marathi

एसपीजीचा फुलफाॅम काय होतो

एसपीजीचा फुलफाॅम special protection group असा होतो.

एसपीजी म्हणजे काय?

ही एक खास सुरक्षा आहे जी आपल्या देशातील प्रमुख व्यक्ती यांनाच दिली जाते जसे की भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही खास सुरक्षा दिली गेली आहे.

भारत देशाचे पंतप्रधान माजी पंतप्रधान तसेच इतर महत्त्वाचे नेते यांना ही विशेष सुरक्षा सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

एसपीजी कमांडो हे आपल्या भारत देशातील सर्वात पावरफुल कमांडो आहे जे आपल्या देशातील विशेष व्यक्तींची सुरक्षा करण्यासाठी तैनात केले जाते.