एमपीएससी डेटा लीक प्रकरण नेमकी आहे तरी काय? अणि एमपीएससीचा डेटा लीक झाला तरी कसा?
mpsc student data leakage information in Marathi
सध्या सोशल मिडिया वर वार्ता आपणास ऐकायला मिळत आहे की एमपीएससी परीक्षार्थीचा डेटा हा एका टेलिग्राम चॅनलवर बेकायदेशीरपणे लीक करण्यात आला आहे.
आधी आपण प्रकरण नेमके काय आहे याची थोडक्यात माहिती घेऊ अणि मग एमपीएससी परीक्षार्थीचा डेटा लीक होण्यामागे कोणकोणती कारणे असू शकतात याची देखील
कारणे जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एमपीएससी डेटा लीक प्रकरण नेमका विषय काय आहे?
एमपीएससी परीक्षार्थीचे हाॅलतिकिट हे एका टेलिग्राम चॅनलवर लीक केले आहे असा दावा एमपीएससी परीक्षार्थीकडुन केला गेला आहे.
ह्या टेलिग्राम चॅनलच्या अॅडमिनवर पोलिसांनी कारवाई अटक देखील केल्याचे सांगितले जात आहे.पण ह्या पेपर लीकेज मध्ये अजुन कोण कोण समाविष्ट हे स्पष्टपणे अद्याप समोर आलेले नाहीये.असे विद्यार्थ्यांचे मत आहे.
शिवाय आता विद्यार्थ्यांकडुन एमपीएससी परीक्षा आॅनलाईन पद्धतीने न घेता आॅफलाईन पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
कारण वेबसाईटवरून परीक्षार्थीचा डेटा हॅक केला जाऊ शकतो तर आॅनलाईन परीक्षेत असा प्रकार केला जाणार नाही याची काय गॅरंटी आहे असा प्रश्न परीक्षार्थीनी उपस्थित केला आहे.
एमपीएससी खुलासा केला आहे की हाॅलतिकिट वगळता विद्यार्थ्यांचा इतर कुठलाही वैयक्तिक डेटा हॅकरकडुन चोरण्यात आलेला नाहीये तरी देखील विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
३० एप्रिल रोजी राज्य सेवा आयोगाची परीक्षा होणार होती.पण त्याआधीच परीक्षार्थीची ९३ हजार इतकी हाॅलतिकिट एका टेलिग्राम चॅनलवर लीक केली गेली आहे.
सोबतच ह्या टेलिग्राम चॅनलवर असा देखील दावा करण्यात आला आहे की विद्यार्थ्यांच्या हाॅलतिकिट व्यक्तीरीक्त आधार कार्ड नंबर,एमपीएससी साईटवर अपलोड केलेले सर्व सर्टिफिकेट,फी पावती,ईमेल आयडी,संपर्क क्रमांक, एमपीएससी पुर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका देखील यांच्याकडे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला होता.
म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रासोबत त्यांची एमपीएससी पुर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका अणि इतर वैयक्तिक माहिती देखील आपल्याजवळ असल्याचा दावा ह्या टेलिग्राम चॅनलवर करण्यात आला होता.
जसे की विद्यार्थ्यांचा ईमेल आयडी,आधार क्रमांक,एमपीएससी साईटवर अपलोड केलेले सर्व सर्टिफिकेट मोबाईल नंबर ह्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.अणि ह्या सर्व घटनेबाबत निषेध व्यक्त केला होता.
एमपीएससी आयोगाने यावर काय उत्तर दिले आहे?
यावर एमपीएससी कडुन प्रसिद्धीपत्रकाद्वारे असे सांगितले गेले आहे की परीक्षेचे हाॅलतिकीट संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
पण तात्पुरत्या स्वरूपात ही हाॅलतिकिटे बाह्य लिंकदवारे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहेत.त्यामुळे सोशल मिडिया वर ही हाॅलतिकिटे व्हायरल केली जात आहे.
अणि बाह्य लिंकदवारे हाॅलतिकिट विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आयोगाकडून बंद देखील करण्यात आले आहे.
याचसोबत एमपीएससी आयोगाने असे देखील म्हटले आहे की सोशल मिडियावर व्हायरल झालेली हाॅलतिकिट वगळता इतर कुठलाही पर्सनल डेटा विद्यार्थ्यांचा लीक झाला नाहीये.तसेच प्रश्नपत्रिका देखील फुटल्या नाहीये.
पण तरी देखील विद्यार्थ्यांच्या मनात असलेली शंका पूर्णपणे अदयाप दुर झालेली नाहीये म्हणून आॅनलाईन ऐवजी आॅफलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
अजुनही काही विद्यार्थ्यांचे असे मत आहे की एवढी ९३ हजार हाॅलतिकीट जर टेलिग्रामवर सोशल मिडिया वर लीक होऊ शकतात तर आमची वैयक्तिक माहिती डेटा पुर्व परीक्षेचा डेटा लीक झाला नसेल हे कशावरून?
कारण आयोगाने फक्त प्रसिद्धी पत्रकात जाहीर केले आहे की विद्यार्थ्यांचा इतर डेटा लीक झालेला नाहीये पण याबाबत कुठलेही प्रमाण देण्यात आले नाहीये.म्हणुन विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रमाची स्थिती कायमच आहे.
ह्या सर्व गोष्टीतुन एमपीएससी डेटा लीक झाला कसा हाच प्रश्न निर्माण झालेला आपणास दिसून येत आहे.
एमपीएससीचा डेटा लीक झाला तरी कसा?यामागचे कारण नेमकी काय असु शकते?
एमपीएससीचा डेटा लीक झाला आहे किंवा नाही हे आपणास माहीत नाही पण आपण कुठल्याही आॅनलाईन संकेतस्थळावरून डेटा लीक होण्याची संभाव्य कारणे काय असु शकतात.हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
आॅनलाईन संकेतस्थळावरून डेटा लीक होण्याची कोणकोणती संभाव्य कारणे असु शकतात हे आपणास समजुन घेता येईल.
१) सर्वर पुर्णपणे सुरक्षित नसणे –
एखाद्या वेबसाईटचे कंपनीचे आँनलाईन पोर्टलचे सर्वर जर पुर्णपणे सुरक्षित केले गेले नसेल तर त्या मधील डेटा लीक होण्याची दाट शक्यता असते.
कारण वेबसाईटचे सर्वर पुर्णपणे सुरक्षित न केले गेल्याने हॅकरला सहजपणे सिस्टम मध्ये प्रवेश करता येतो अणि त्या वेबसाईट वरचा गोपनीय डेटा माहीती चोरता येत असते.अणि कुठेही सार्वजनिक रीत्या लीक देखील करता येते.
अशी अनेक उदाहरणे आतापर्यंत पाहीली गेली आहे जिथे सुरक्षेच्या अभावामुळे काही कंपनींच्या सिस्टम मधील गोपनीय वैयक्तिक डेटा हॅकरकडुन चोरण्यात आला होता
२) इनसाइडर लीक –
डेटा लीक होण्याचे अजुन एक महत्वाचे कारण आहे ते म्हणजे इनसाइडर लीक म्हणजे सिस्टम मधील व्यक्तीच आतुन कोणी जेव्हा कंपनीचा महत्वाचा गोपनीय वैयक्तिक डेटा लीक करत असते सार्वजनिक रीत्या उघड करत असते तेव्हा त्यास इनसाइडर लिक असे म्हटले जाते.
यात एखादा बाहेरचा व्यक्ती कंपनीत कामाला लागतो कंपनीचा विश्वास संपादित करतो कंपनीच्या सिस्टम मधील सर्व गोपनीय माहीती प्राप्त करतो अणि तीच प्राप्त केलेली कंपनीची वैयक्तिक गोपनीय माहिती दुसरया कंपनीला देऊन लीक करत असतो.किंवा स्वता चोरून निघुन जातो.अणि सार्वजनिक रीत्या उघड करत असतो.
३) फिशिंगच्या माध्यमातून डेटा हॅक होणे-
याचसोबत फिशिंगच्या माध्यमातून देखील डेटा लीक तसेच हॅक केला जात असतो.हयात डेटा चोरण्यासाठी हॅकर विशिष्ट व्यक्तीला तसेच एखाद्या कंपनीला देखील टार्गेट करत असतात.
४) कमकुवत सायबर सिक्युरिटी –
कंपनीकडुन सायबर सिक्युरिटी टीम मजबुत करण्यात न आल्याने असे सार्वजनिक रीत्या डेटा लीक होण्याचे प्रकार घडत असतात.
फिशिंगच्या माध्यमातून चोरलेला पर्सनल गोपनीय डेटा सार्वजनिक रीत्या लीक करून विकला जातो किंवा त्या डेटाच्या बदल्यात कंपनीला तसेच त्या व्यक्तीला हॅकरकडुन ब्लँक मेल केले जाते.
फिशिंग मध्ये हॅकर आपल्याला एखादी लिंक व्हिडिओ फाईल वगैरे सेंड करत असतो ही पाठविलेली लिंक अटॅच केलेली फाईल व्हिडिओ मालवेअर इंजेक्ट करण्यासाठी केले जाते.
ह्या लिंकवर क्लिक केल्यावर आपणास काही पाॅप अप स्क्रीनवर ओपन होताना दिसुन येतात.हयावर क्लिक केल्यावर आपला सर्व गोपनीय डेटा हॅकर्स कडे जात असतो.यालाच फिशिंग म्हटले जाते.
५) डेटाच्या सुरक्षेसाठी जुन्या संरक्षण प्रणालीचा वापर –
डेटा हा जून्या संरक्षण प्रणालीचा वापर केल्याने देखील लीक होऊ शकतो.डेटाच्या सुरक्षेसाठी नवीन प्रगत तंत्रज्ञानाचा संरक्षण प्रणालीचा वापर न करणे यामुळे देखील डेटा लीक होऊ शकतो.
वेबसाईट वरील सिस्टम मधील डेटा लीक होऊ नये म्हणून काय उपाययोजना करायला हव्यात?
वेबसाईटची आॅनलाईन पोर्टलची सर्वर सिक्युरिटी मजबुत करणे आवश्यक आहे –
इनसाइड डेटा लीक कडे लक्ष देणे आवश्यक आहे-
फिशिंग पासुन सावधान राहायला हवे.
सर्वर सिक्युरिटी डेटा सिक्युरिटी मजबुत करायला हवी.
डेटाच्या सिक्युरिटीसाठी जुन्या संरक्षण प्रणालीचा वापर करणे टाळावे
सायबर सिक्युरिटी मध्ये अधिक वाढ करणे आवश्यक आहे.
अधिक सुरक्षेसाठी इथिकल हॅकरची आयटी डेटा एक्सपर्टची मदत घ्यावी-
इथिकल हॅकर हा एक लिगल हॅकर जो आपल्या सिस्टममध्ये कुठे कमकुवतपणा आहे हे जाणुन घेण्यासाठी आपल्या परवानगीने आपली वेबसाईट हॅक करत असतो.अणि आपल्या वेबसाईटमध्ये कुठे बग आहे कोणत्या ठिकाणाहून हॅकर आपल्या सिस्टम मध्ये प्रवेश करू शकतो हे जाणुन घेत असतो अणि त्यानुसार आपल्याला मार्गदर्शन करून आपल्या सिस्टमला अधिक सिक्युअर करत असतो