फ्लोअर टेस्ट म्हणजे काय? -Floor test meaning in Marathi

फ्लोअर टेस्ट म्हणजे काय?floor test meaning in Marathi

फ्लोअर टेस्टला मराठी भाषेत बहुमत चाचणी असे संबोधित केले जाते.

फ्लोअर टेस्टचे स्वरूप कसे असते?फ्लोअर टेस्टदवारे काय ठरवले जाते?

सध्याच्या शासनाकडे म्हणजेच मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्याकडे आपली सत्ता प्रस्थापित करण्याकरीता पाहिजे तेवढे पुरेसे बहुमत आहे का नाही हे ठरविण्यासाठी फ्लोअर टेस्ट घेतली जात असते.यात राज्यपाल हे मुख्यमंत्रींना त्यांच्या पक्षाचे बहुमत सिदध करावयास सांगत असतात.

जेव्हा निवडणुकीमधुन कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळत तेव्हा राज्यपालांकडुन त्या पक्षातील नेत्याची मुख्यमंत्री पदावर निवड केली जात असते.

पण जेव्हा कोणत्याच पक्षाकडे बहुमत नाही असे स्पष्टपणे दिसुन येते तेव्हा अशा परिस्थितीत हजर असलेल्या मतदाता सभासदांपैकी दोन तृतियांश सभासदांचा आपणास पाठिंबा आहे असे सरकारला सिदध करावे लागत असते.

फ्लोअर टेस्टमध्ये राज्यपाल आपला कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करीत नसतात.आणि यात आमदार आणि खासदार देखील उपस्थित राहुन मतदान करत असतात.

जे आमदार निवडुन आलेले असतात त्यांचे मत सरकारचे भवितव्य ठरवत असते.राज्याचा विषय असल्यास ही फ्लोअर टेस्ट विधानसभेत केली जात असते अणि समजा जर लोकसभेचा विषय असेल तर ही फ्लोअर टेस्ट लोकसभेमध्ये घेतली जात असते.

फ्लोअर टेस्ट कोण घेत असते?

फ्लोअर टेस्ट ही स्पीकरकडुन घेतली जाते.कारण हा अधिकार स्पीकरकडे दिला गेलेला असतो.यात राज्यपालांकडुन फ्लोअर टेस्ट घेण्याचा आदेश दिला जात असतो पण त्यांना ह्या टेस्टमध्ये कोणताही हस्तक्षेप करता येत नाही.

प्रोटेम स्पीकर कोण असतो?

फ्लोअर टेस्ट पुर्ण करणे स्पीकरचे काम असते.पण समजा स्पीकरची निवड जर केलीच गेली नसेल तर अशावेळेस प्रोटेम स्पीकरला नियुक्त करण्यात येत असते.प्रोटेम स्पीकरची निवड तात्पुरता केली जात असते.

See also  पी-एम-एल-ए कायदा म्हणजे काय?- PMLA meaning in Marathi

प्रोटेम स्पिकर कधी बनविण्यात येत असतो?

जेव्हा नवीन लोकसभेची तसेच विधानसभेची निवड केली जाते तेव्हा प्रोटेम स्पीकर बनवण्यात येत असतो.

प्रोटेम स्पीकरकडे कोणकोणते हक्क असतात?

● फ्लोअर टेस्टची जी प्रोसेस पार पडत असते ती प्रोटेम स्पीकरच्याच अधिपत्याखाली घडत असते.

● फ्लोअर टेस्टशी निगडीत सर्व निर्णय प्रोटेम स्पिकर हाच घेत असतो.

● मतदान होते तेव्हा आमदारांकडुन कोरम बेलच्या अंतर्गत आवाजी मतदान करून घेतले जात असते.पण यानंतर सभागृहात जेवढेही आमदार उपस्थित आहेत.त्यांची दोन गटामध्ये विभागणी करण्यात येते.मग पक्ष अणि विरोधी पक्ष यांचे आमदार किती आहेत हे मोजले जाते.अणि मग शेवटी निकाल घोषित केला जात असतो.

कंपोझिट फ्लोअर टेस्ट म्हणजे काय?

जेव्हा एकापेक्षा अधिक पक्षांकडुन सत्ता स्थापणेचा दावा केला जात असतो तेव्हा अशा परिस्थितीत कंपोझिट फ्लोअर टेस्ट घेण्यात येते.

जेव्हा कोणाकडे बहुमत आहे हे सिदध होत नाही तेव्हा राज्यपालांकडुन सदनाचे विशेष अधिवेशन भरवण्यात येत असते.यात झालेला विश्वास दर्शक ठरावातुन हे समोर येत असते की कोणाकडे बहुमत आहे.

सर्व सभासदांपैकी किती सभासद हे सदनामध्ये उपस्थित आहेत.अणि आपले मत देत आहे यावरून बहुमताचा आकडा ठरत असतो.

समजा महाराष्टातील विधानसभेतील बहुमत आकडा जर १४५ आहे अणि सभासदांची संख्या ही २८८ आहे.पण सदनातील ४६ आमदार मतदानाला हजरच नसतील किंवा त्यांनी आपले मतदान केले नाही तर अशा परिस्थितीत बहुमताच्या आकडयामध्ये २३ ने घट होत असते.

कंपोझिट टेस्टसाठी कोणत्या दोन पदधतीने मतदान करता येते?

1)आवाजी मतदान –

यात आमदार ओरडुन सांगत असतात की त्यांचे मत ते कोणाला देत आहेत.

2) विभाजित मतदान –

यात प्रत्येक सभासद हा स्वतंत्रपणे आपले मत देत असतो.हे मतदान इलेक्ट्राँनिक मशिनदवारे चिठठीदवारे तसेच बँलेट पेपर अंतर्गत करण्यात येत असते.

यात ज्या पक्षास बहुमत मिळते त्या पक्षाचे सरकार स्थापण केले जाते.पण यात जर दोघा पक्षांना जर सारखी मते प्राप्त झाली तर अशावेळी सदनाचा अध्यक्ष दोघांपैकी एका पक्षाला आपले मत देऊ शकतो.

Whip म्हणजे नेमकं काय ? राजकारणातील व्हिप – What Is A Whip In Politics ?

 

See also  कपालभाती करण्याचे 10 फायदे कोणते - 10 Health benefits of Kapalabhati