पोस्ट ऑफिस जीडीएस परीक्षेची पहिली मेरीट लिस्ट जाहीर | Post Office Gds Exam First Merit List 2023 In Marathi
पोस्ट ऑफिस जीडीएस भरती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.सर्व परीक्षार्थी यात आपले नाव दिलेले आहे किंवा नाही चेक करू शकतात.
पोस्ट ऑफिस जीडीएस भरती परीक्षा मधील पहिली मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे.
सदर जीडीएस परीक्षेचा जाहीर झालेला निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना पोस्ट खात्याच्या Indiapostgdonline.Cept.Gov.In ह्या वेबसाईटवर जायचे आहे.
सदर वेबसाईटवर गेल्यावर पुर्ण भारतातील जीडीएस परीक्षेचा निकाल येथे आपणास पाहावयास मिळणार आहे.
आपणास आपला निकाल डाऊनलोड करण्यासाठी स्क्रीनवर डाव्या बाजूला दिलेल्या शाॅर्ट लिस्टेड कॅंडिडेट आॅप्शनवर जाऊन आपले राज्य सिलेक्ट करायचे आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्य ह्या आॅप्शनवर क्लिक करायचे आहे.
यानंतर महाराष्ट्र राज्यातील जीडीएस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या म्हणजे शाॅर्ट लिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांची पहिली मेरीट लिस्टची पीडीएफ डाऊनलोड होईल.
ह्या मेरीट लिस्ट मध्ये जाऊन आपण शाॅर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांच्या नावांच्या यादीत आपले नाव आहे किंवा नाही हे चेक करू शकतात.
ह्या पीडीएफ मध्ये ज्या डिव्हीझन मधुन अॅप्लाय केला आहे ते बघता येते उमेदवाराचे नाव बघता येते,उमेदवार पुरुष आहे किंवा महिला, उमेदवाराची कॅटॅगरी काय आहे कट आॅफ किती लागला आहे शाॅर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांपैकी कोणाचे डाॅक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे कोणत्या ठिकाणी केले जाणार आहे हे सर्व देखील यात दिले आहे.
ज्या उमेदवारांचे पहिल्या मेरीट लिस्ट मध्ये नाव समाविष्ट आहे त्यांनी २१/३/२०२३ पर्यंत आपले डाॅक्युमेंट व्हेरीफिकेशन करून घेण्यास देखील इथे सांगितले आहे.
ज्या उमेदवारांना सिलेक्ट करण्यात आलेले आहे त्यांना एस एम एस किंवा ईमेल द्वारे डाॅक्युमेंट सिलेक्शन व्हेरिफिकेशन बाबद एक मेल पाठविला जाईल.
तसे पाहायला गेले तर काल फक्त आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान अशा इतर काही राज्यातील जीडीएस परीक्षेचा निकाल सध्या जाहीर करण्यात आला होता.
पण आता महाराष्ट्र राज्यातील जीडीएस परीक्षेचा निकाल देखील काही तासांपुर्वी जाहीर केला गेला आहे.
अणि आता महाराष्ट्र विभागातील जीडीएस परीक्षा २०२३ मधील शाॅर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांच्या निकालाची पहिली मेरिट लिस्ट पीडीएफ देखील ह्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेली आहे.
त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील जीडीएस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या शाॅर्ट लिस्ट उमेदवारांची यादी पाहायला गेल्यास आपणास २०२३ जानेवारी मधील नवी यादी पाहायला मिळणार आहे.