लेक लाडकी योजना –प्रत्येक मुलीला मिळणार ९८ हजार रुपये | Lek Ladki Yojana 2023 In Marathi
महाराष्ट्राच्या २०२३ मधील अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च रोजी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
ह्या अनेक महत्त्वाच्या घोषणांपैकी एक महत्वाची घोषणा म्हणजे लेक लाडकी योजनेचा प्रारंभ करणे.
मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम अणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी स्वताच्या पायावर उभे राहता यावे आपल्या शिक्षणासाठी आर्थिक हातभार प्राप्त व्हावा याकरीता महाराष्ट्र शासनाने ही योजना पुन्हा आरंभित केलेली आहे.
- लेक लाडकी ह्या योजनेमध्ये मुलींना आपल्या रेशन कार्डच्या आधारावर आर्थिक मदत दिली जाणार आहे.म्हणजेच ज्या मुलींचे परिवाराचे रेशन कार्ड हे केशरी अणि पिवळे आहे त्यांनाच ह्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
- लेक लाडली ह्या योजनेअंतर्गत ज्या पालकांना मुली आहेत त्यांना आपल्या मुलीच्या नावाने सरकारकडुन आर्थिक मदत केली जाणार आहे.
- जेणेकरून मुलींना आपल्या शिक्षणाचा दैनंदिन जीवनातील पालनपोषणाचा उदरनिर्वाहासाठी लागणारा खर्च स्वता करता येईल.आपल्या खर्चासाठी कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.
- हया योजनेअंतर्गत केशरी अणि पिवळे रेशनकार्ड असलेल्या ज्या कुटुंबात मुलगी जन्माला येईल त्या कुटुंबाला पाच हजार रुपये इतकी रक्कम सुरुवातीला दिली जाते.
- मग पुढे जाऊन मुलगी शाळेत जायला लागली अणि पहिलीत गेल्यावर तिला शासनाकडून चार हजार रुपये इतकी रक्कम दिली जाते.
- मुलगी सहाव्या इयत्तेत गेल्यावर मुलीला शासनाकडुन ह्या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये दिले जातात.नंतर अकरावीला गेल्यावर मुलीला आठ हजार रुपये दिले जातात.
- अणि जेव्हा मुलगी अठरा वर्षाची पुर्ण होते तेव्हा तिला लेक लाडकी योजनेअंतर्गत ७५ हजार रुपये इतकी रक्कम दिली जाते.

लाडकी लेक हया योजनेअंतर्गत-
- पहिलीत असताना ४ हजार
- सहावीत असताना ६ हजार
- अकरावीला असताना ८ हजार
- अठरा वर्षे पुर्ण झाल्यावर ७५ हजार
एकुण ९८ हजार रुपये इतकी रक्कम ह्या योजनेअंतर्गत मुलींना आर्थिक साहाय्य म्हणून दिली जाते.
लेक लाडकी योजनेअंतर्गत अठरा वर्षाच्या आधी दिल्या जात असलेल्या आर्थिक मदतीची रक्कम २३ हजार असणार आहे.हया योजनेअंतर्गत दिली जात असलेली सर्व रक्कम लाभार्थी मुलीला तिच्या बँक खात्यात पाठविली जाते.
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून दोनच महत्वाच्या अटी ठेवण्यात आल्या आहेत.
योजनेचा लाभ घेत असलेली मुलगी ही महाराष्ट्र राज्यातील मुळ रहिवासी असावी तिचा जन्म महाराष्ट्र राज्यातील असावा.तसेच तिच्या परिवाराकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असायला हवे.
पांढरे रेशनकार्ड असलेल्या मुलींना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे असणार आहेत-
- मुलीचे आधार कार्ड
- मुलीचे बॅक खाते पासबुक किंवा तिच्या आईवडिलांचे बँक खाते पासबुक
- उत्पन्न प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- कुटुंबाचे केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड
- दोन पासपोर्ट साईज फोटो
- संपर्क क्रमांक
लेक लाडकी ही योजना सध्या सरकारने नवीनच घोषित करण्यात आलेली योजना आहे.म्हणुन ह्या योजनेची कुठलीही आॅफिशिअल वेबसाईट तयार करण्यात आलेली नाहीये.जेव्हा ह्या योजनेची आॅफिशिअल वेबसाईट तयार केली जाईल तेव्हा आपण यासाठी आॅनलाईन अर्ज करू शकतात.
लवकरच ह्या योजनेकरीता शासन निर्णय काढला जाणार आहे.मग सर्व पात्र उमेदवारांना ह्या योजनेसाठी योजनेकडुन दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल.
Good