फक्त एकदा गुंतवणूक करून महिलांना बचतीवर मिळणार ७.५ टक्के इतके व्याज । Mahila Sanman Saving Certificate Scheme In Marathi

Mahila Sanman Saving Certificate Scheme In Marathi

फक्त एकदा गुंतवणूक करून महिलांना बचतीवर मिळणार ७.५ टक्के इतके व्याज  – Mahila Sanman Saving Certificate Scheme In Marathi

आर्थिक वर्ष २०२३-२०३४ मध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी खास महिलांसाठी एक एक बचत योजनेची घोषणा केली आहे जिचे नाव महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना असे आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी खासकरून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम अणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी फक्त महिला गुंतवणूकदारांकरीता हया छोट्याशा बचत योजनेचा आरंभ केला आहे.

ह्या योजनेमध्ये महिला तसेच मुली या दोघांनाही गुंतवणूक करून आर्थिक दृष्ट्या सक्षम अणि स्वावलंबी बनता येईल.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ह्या योजनेमध्ये महिला वर्गाला किमान दोन वर्षाकरीता दोन लाख इतकी गुंतवणूक करता येणार आहे.

 महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ह्या योजनेमध्ये गुंतवणूक करणारया प्रत्येक महिला गुंतवणूकदारास वार्षिक ७.५ टक्के इतका परतावा प्राप्त होतो.

ह्या योजनेमध्ये गुंतवणूक करणारया महिला गुंतवणूक दारास सुकन्या समृद्धी योजना,एन एस सी,पीपी एफ इत्यादी योजनांपेक्षा अधिक रिटर्न्स प्राप्त होतात.

Mahila Sanman Saving Certificate Scheme In Marathi
Mahila Sanman Saving Certificate Scheme In Marathi

सी आय एस एफचा फुलफाॅम काय होतो

  1. आयकर कायदा कलम सी अंतर्गत आपणास यात टॅक्स सवलत देखील दिली जाते.हया योजनेअंतर्गत महिला गुंतवणूक दारांना अंशत म्हणजेच गरज पडल्यास थोडेफार पैसे काढण्याची सुविधा देखील प्रदान करण्यात आली आहे.
  2. ह्या योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी महिला गुंतवणूक दारांना कुठल्याही एका पोस्ट खात्यात किंवा बॅकेत जायचे आहे अणि आपले अकाऊंट ओपन करून घ्यायचे आहे.
  3. ह्या योजनेची आणखी एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे महिला सम्मान बचत प्रमाणपत्र ह्या योजनेमध्ये गुंतवणूक करणारया महिला उमेदवारांना बॅक एफडी पेक्षा अधिक प्रमाणात व्याज प्राप्त होते.
  4. कारण स्टेट बँक वगळता इतर बॅक जसे की कोटक महिंद्रा बँक,एच डी एफसी,आयसी आयसीआय बॅक आपल्या कस्टमरला दोन वर्षांसाठीच्या मुदत ठेवीवर फक्त तीन ते ७ टक्के इतके व्याज देतात पण
  5. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र मध्ये सर्व महिला गुंतवणूकदारांना ७.५ टक्के इतके व्याज दिले जाणार आहे.
  6. ही एक सरकारी योजना आहे त्यामुळे यात गुंतवणूक करण्यात महिलांना कुठलीही रिस्क देखील नाहीये.हया योजनेचा कालावधी मार्च २०२५ मध्ये संपुष्टात येणार आहे.
  7. म्हणजे ह्या योजनेअंतर्गत मार्च २०२३ पासुन गुंतवणूक करणारया महिलांना मार्च २०२५ पर्यंत आपल्या केलेल्या दोन लाख इतक्या गुंतवणुक तसेच बचतीवर ७.५ टक्के इतके व्याज दिले जाणार आहे.
  8. सदर योजनेत गुंतवणूक करण्यासाठी महिलांना कुठलीही वयाची अट ठेवण्यात आली नाहीये.कोणत्याही वयोगटातील महिलांना मुलीला ह्या बचत योजनेमध्ये गुंतवणूक करता येणार आहे.
  9. सरकारच्या ह्या बचत योजनेमध्ये गुंतवणूक करून ज्या महिलांचे उत्पन्न कमी आहे त्यांना कमी कालावधीत जास्त रिटर्न्स मिळणार आहेत.
  10. ह्या योजनेमधील गुंतवणूक करण्याचे नुकसान एकच आहे की महिलांना फक्त ह्या योज अंतर्गत दोन लाख रूपये इतकीच गुंतवणूक करता येणार आहे.त्यापेक्षा अधिक गुंतवणूक करता येणार नाही.म्हणजे उच्च उत्पन्न असलेल्या  महिलांना ह्या योजनेचा कुठलाही विशेष लाभ होणार नाहीये.