क्रेडिट कार्ड बददल माहीती – Credit card information in Marathi

क्रेडिट कार्ड बददल माहीती Credit card information in Marathi

क्रेडिट कार्ड म्हणजे काय?Credit card meaning in Marathi

आज आँनलाईन खरेदी शाँपिंग करायला आपण क्रेडिट कार्ड वापरत असतो.

क्रेडिट कार्ड ही एक सुविधा तसेच कर्ज आहे हे जे आपणास बँकेकडुन तसेच कुठल्याही वित्तीय संस्थेकडुन तात्पुरता शाँपिंग करण्यासाठी किंवा एखादी वस्तु खरेदी करण्याकरीता प्राप्त होत असते.

क्रेडिट कार्ड हे एक प्लँस्टिकचे कार्ड असते जे डेबिट कार्ड पेक्षा वेगळे असते.क्रेडिट कार्ड हे आपणास आपला क्रेडिट स्कोर अणि हिस्ट्री हे जाणुन घेऊन त्याच्या अनुसार दिले जात असते.

क्रेडिट कार्डला लायबिलिटी म्हणुन देखील ओळखले जाते.कारण याने आपल्या खिशात पैसे येत नसतात तर उलट आपल्या खिशातुन पैसे जात असतात.

पण आपण याच्या नियमावली नीट समजून घेतल्या अणि त्यांचे काटेकोरपणे व्यवस्थित पालन केले तर हे आपले उत्तम अँसेट देखील बनु शकते.

क्रेडिट कार्ड लिमिट म्हणजे काय? – Credit card limit meaning in Marathi

क्रेडिट कार्डचे सुदधा एक विशिष्ट लिमिट असते.ज्याला क्रेडिट लिमिट असे म्हणतात.ह्या लिमिटनुसारच आपण क्रेडिट कार्डचा वापर करून त्यावरून कुठलीही वस्तु आँनलाईन खरेदी करू शकतो.

क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे कोणकोणते असतात?credit card advantage in Marathi

● जेव्हा आपल्या बँक अकाउंटवर आपल्याला कुठलीही वस्तु खरेदी करता येईल इतकी रक्कम शिल्लक नसते.तेव्हा क्रेडिट कार्ड सुविधा वापरून आपण ती वस्तु तत्काळ खरेदी करू शकतो.

See also  राष्ट्रीय CAD दिवस | National CAD Day Information In Marathi

● क्रेडिट कार्ड ह्या सुविधेचा वापर करून आपण कुठलीही महाग वस्तु देखील खरेदी करू शकतो ते ही आपल्या बँक खात्यात पुरेशी कँश उपलब्ध नसताना.

● क्रेडिट कार्डचा वापर करून आपल्याला लगेच जी वस्तु खरेदी करायचे आपण ती खरेदी करू शकतो.

● क्रेडिट कार्ड दवारे शाँपिंग खरेदी केल्यास आपणास भरपुर डिस्काऊंट मिळतो अणि रिवाँर्डस पाँईण्ट देखील प्राप्त होत असतात.ज्याचा उपयोग आपणास नंतरून शाँपिंग करताना होतो.

● क्रेडिट कार्ड वापरून आपणास एखादी वस्तु ई एम आयवर खरेदी करता येत असते.

● क्रेडिट कार्ड दवारे शाँपिंग करण्याचा अजुन एक फायदा आहे तो म्हणजे आपण कोणती वस्तू कधी खरेदी केली?त्यात किती रूपये खर्च झाले?याची सर्व नोंद केलेले एक बिलशीट आपल्याला देण्यात येते.

● जर एखाद्या व्यक्तीने क्रेडीट कार्ड दवारे अशी वस्तु खरेदी केली जिची किंमत पन्नास हजारपेक्षा अधिक आहे तर त्या व्यक्तीस क्रेडिट कार्डची अँन्युअल चार्ज फी भरावी लागत नाही.त्याला ते माफ केले जाते.

क्रेडिट कार्ड वापरण्याचे तोटे कोणकोणते असतात?credit card disadvantages in Marathi

जसे क्रेडिट कार्डचे अनेक फायदे आहेत तसे काही छोटछोटया समस्या तोटे देखील आहे जे याचा वापर करत असताना आपल्याला उदभवत असतात आपण त्या समस्या कोणकोणत्या आहेत ते जाणुन घेऊया.

● कुठलीही वस्तु तात्पुरता खरेदी करायला आपण बँकेकडुन क्रेडिट वर जी रक्कम उसनी घेत असतो ती जर आपण बँकेने ठरवलेल्या वेळेवर नही फेडली तर बँक त्याचे आपल्याकडुन व्याज घेते.जे खुप जास्त असु शकते.

● जेवढे आपल्या क्रेडिट कार्डचे लिमिट असते त्यानुसार बँकेने ठरवलेला वार्षिक चार्ज आपल्याला बँकेस द्यावा लागत असतो.

● क्रेडिट कार्डवर बँक काही चार्जेस आकारत असते ज्याविषयी आपण अज्ञात असतो अणि त्यामुळे आपण कर्जात अडकु लागतो.

● क्रेडिट कार्डचे बिल कधी फेडायचे हे आपल्याला कळवत नही.अणि मग अचानक बिल पे करायची लास्ट डेट निघून गेली की आपणास लेट फी म्हणजेच दंड भरावा लागतो.

See also  नार्को टेस्ट म्हणजे काय?नार्को टेस्ट का अणि कशापदधतीने केली जाते? What is a narco test?

● जर आपल्या क्रेडिट कार्डला आपण आँटो पे सिस्टममध्ये ठेवले तर आपल्याला न कळता आपल्या अकाऊंटवरून पैसे कट केले जातात.

क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड मध्ये काय फरक असतो?difference between credit card and debit card in Marathi

● डेबिट कार्ड हे आपण भारत देशात कुठेही असलो तरी देखील त्याचा वापर करू शकतो.

क्रेडिट कार्ड हे आपण भारतामध्ये कुठेही असताना तर वापरू शकतोच शिवाय परदेशात असताना देखील आपण हे वापरू शकतो.हे दोन प्राथमिक फायदे क्रेडिट कार्ड वापरण्याचे आहेत.

● डेबिट कार्ड ही बँकेकडून बँक खातेधारकांना देण्यात आलेली सुविधा असते.जिचा वापर करून आपण आपल्या खात्यावरून एटीएमदवारे पैसे काढु शकतो

क्रेडिट कार्ड ही सुविधा देखील बँकच आपल्या खातेधारकांना देत असते पण हे एक प्रकारचे कर्ज असते जे उचलून आपण तात्पुरता एखादी वस्तु आपल्या खात्यात पुरेसे पैसे नसताना देखील खरेदी करु शकतो.

● क्रेडिट कार्ड वरील आकारला जाणारा सर्विस चार्ज देखील डेबिट कार्ड पेक्षा जास्त असतो.

ATM Card,Debit Card आणि Credit Card या तिघांमध्ये काय फरक आहे? – Types of Bank Cards and Their Features

ATM Card,Debit Card आणि Credit Card या तिघांमध्ये काय फरक आहे? – Types of Bank Cards and Their Features