Email मधील cc आणि bcc काय आहे आणि त्यातील फरक ? – cc and bcc meaning in Marathi

Email मधील cc आणि bcc काय आहे आणि त्यातील फरक ?

आपण सर्वजण ईमेल च वापर करतो.आपल्याला खूप सारे मेल्स येतात आणि आपण खूप सारे मेल्स इमेल्स च्या मदतीने दुसऱ्याला पाठवतो.तुम्हाला ईमेल बद्दल माहिती माहित आहे परंतु CC आणि BCC बद्दल माहिती माहित आहे का ? नसेल माहित ,तर आपण या लेखामध्ये CC आणि BCC बद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

जेव्हा तुम्ही कोणाला ईमेल सेंड करता तेव्हा तिथे तुम्हाला CC आणि BCC असे दोन पर्याय दिसतात.तुम्ही जर जॉब करत असाल तर तुम्हाला दररोज मेल सेंड करावा लागतो आणि तुम्ही जर जॉब करत नसाल तर तुम्हाला कधी न कधी कुणाला ना कुणाला तरी ईमेल सेंड करावा लागतो.

ईमेल च्या मदतीने तुम्ही मेल्स सोबत फोटो आणि व्हिडिओ देखील सेंड करू शकता.यासोबतच ईमेल तुम्हाला एका सोबत जास्त लोकांना एकावेळी इमेल्स सेंड करण्याची सुविधा देतो.

ईमेल मधे CC काय असते ? – cc and bcc meaning in Marathi

CC मधे आपण एकावेळी एकापेक्षा जास्त लोकांना एकाचवेळी मेल सेंड करू शकतो.तुम्ही कितीही मेल लिहू शकता आणि सेंड करू शकता.तुमचा मेल एकाचवेळी तुम्ही सेंड केलेल्या सर्वांना जातो.

CC मधे तुम्ही कुणाकुणाला मेल सेंड केला आहे हे समोरच्या व्यक्तीला समजते आणि तुम्ही किती लोकांना ईमेल सेंड केला आहे त्यांची ईमेल आयडी ही समोरच्याला दिसते.CC

आपण उदा.वरून पाहू:जर तुम्हाला तुमच्या दोन मित्राला एकच ईमेल सेंड करायचा असेल तर ,तुम्ही पहिल्या मित्राच्या ईमेल आयडी ला अड्रस टू मधे टाका आणि दुसऱ्या मित्राला अड्रेस cc मधे टाका.

See also  आदित्य मिशन कधी लाँच करण्यात येईल ? किती दिवसांचे आहे? किती खर्च ? Aditya-L1 mission

ह्यामुळे तुम्ही सेंड केलेला ईमेल दोन्ही मित्राला जाईल आणि तुमच्या दोन्ही मित्राला दोघांचे ईमेल आयडी दिसतील.

ईमेल मधे BCC काय असते ?

BCC आणि to ,CC मधे खूप फरक असतो.

समजा तुम्हाला तुमच्या तीन मित्राला मेल करायचा असेल ,तर तुम्ही

एका मित्राला to मधे ठेवले.दुसऱ्या मित्राला CC. मधे ठेवले आणि तिसऱ्या मित्राला BCC मधे ठेवले.

BCC मधे ईमेल आयडी आणि केलेला मेल फक्त सेंड करणाऱ्याला दिसतो आणि तुम्ही ज्याला BCC मधे ठेवले आहे ,त्यालाच फक्त To आणि CC ची ईमेल आयडी दिसते.

ईमेल मधे CC आणि BCC चा वापर कशा पद्धतीने करावा ?

१) सर्वात आधी ईमेल ओपन करा.
२) ईमेल सेंड करण्यासाठी इमेल पेज वरती तुम्ही compose या पर्यायावर क्लिक करा.
३) त्यानंतर पुढे तुम्हाला CC पर्याय दिसेल.त्या पर्यायावर क्लिक करा आणि तुम्हाला ज्याला कोणाला CC मधे ठेवायचे आहे ,त्याचा ईमेल आयडी टाका.
४) Cc च्या जवळच BCC पर्याय असेल .त्या पर्यायावर क्लिक करा आणि ज्याला कुणाला BCC मधे ठेवायचे आहे त्याचा ईमेल आयडी टाका.
५) त्यानंतर subject पर्यायावर क्लिक करून मेल टाईप करा.
६) आणि send पर्यायावर क्लिक करून ईमेल सेंड करा.

CC आणि BCC मधे फरक काय असतो ?

१) तुम्ही जेव्हा CC चा वापर करता,तेव्हा तुम्ही सेंड केलेल्या सर्व लोकांचा ईमेल आयडी सर्वांना दिसतो.परंतु BCC मधे तो दिसत नाही.
२) Cc मधे रिप्लाय सर्वांना दिसतो ,परंतु BCC मधे रिप्लाय कुणालाही दिसत नाही.
३) जेव्हा एखादा मेल एकापेक्षा जास्त लोकांना सेंड करायचा असेल आणि सगळ्यांना ईमेल आयडी दाखवायची असेल तर CC पर्यायाचा वापर करतात आणि जेव्हा मेल एकापेक्षा जास्त लोकांना सेंड करायचा असतो आणि ईमेल आयडी कुणालाही दाखवायची नसल्यास BCC पर्यायाचा वापर करतात.

CC आणि BCC चे फायदे :

१) Cc चां एक फायदा असा की, तुम्ही एकावेळी एकापेक्षा जास्त लोकांना एकच मेल सेंड करू शकता.
२) BCC मधे ईमेल आयडी सुरक्षीत राहिला जातो.तुम्ही सेंड केलेल्या कुणालाही कुणाचीही ईमेल आयडी दिसत नाही.
३) CC आणि BCC द्वारे आपण ग्रुप मधे ईमेल सहजरीत्या करू शकतो.

See also  इस्रोचे गगनयान मिशन काय आहे? ISRO Gaganyan mission in Marathi