सायबर बुलिंग म्हणजे काय? – Cyber Bullying Meaning In Marathi

सायबर बुलिंग म्हणजे काय? – Cyber Bullying Meaning In Marathi

सायबर बुलिंग हा एक गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे.

याचसोबत हा एक आॅनलाईन गुंडगिरीचा छळवणुकीचा प्रकार आहे.सायबर बुलिंग हे नाव सायबर गुन्ह्यांमध्ये नवीनच समाविष्ट करण्यात आले आहे.

आपल्या दैनंदिन आॅफलाईन जीवनात अनेक व्यक्ती कोणाची तरी गुंडगिरी दादागिरी सहन करत असताना आपणास आढळुन येत असतात.एकदम त्याचप्रमाणे सायबर बुलिंग असते.

आॅनलाईन जगतात असे खुप जण असतात जे ही दादागिरी गुंडगिरी सहन करत असतात.

पण सायबर बुलिंग मध्ये प्रत्यक्ष शारीरिक दृष्ट्या छळ न करता आॅनलाईन डिजीटल प्लॅटफॉर्म जसे की व्हाॅटस अप,फेसबुक इंस्टाग्राम अकाऊंट,सोशल मिडिया वरील विविध चॅटिंग गृप,आॅनलाईन वेबसाईट अशा इत्यादी माध्यमांचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा मानसिकरीत्या छळ केला जात असतो.

सायबर बुलिंग मध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट होत असतात?

Cyber Bullying Meaning In Marathi
Cyber Bullying Meaning In Marathi

एखाद्या व्यक्तीची बदनामी होईल असा एखादा त्याच्या विषयी मजकुर लिहुन आॅनलाईन प्रकाशित करणे,

एखाद्या व्यक्तीची सर्व कौटुंबिक तसेच वैयक्तिक माहीती प्राप्त करायची अणि मग तीच प्राप्त केलेली माहीती त्या व्यक्तीच्या नकळत जगासमोर आॅनलाईन तसेच इतर डिजीटल प्लॅटफॉर्म दवारे प्रसिद्ध करायची,जगजाहीर करायची.

एखाद्या व्यक्तीला कोणत्याही बाबतीत ब्लँकमेल करायचे त्याचे वैयक्तिक फोटो एखादी गुप्त माहीती जगजाहीर करून त्याला बदनाम करण्याची धमकी द्यायची हया सर्व गोष्टी सायबर बुलिंगच्या मध्ये येत असतात.

सायबर बुलिंगच्या प्रकारामध्ये अनेक स्त्रियांना अश्लील मॅसेज तसेच फोटो व्हिडिओ पाठवले जातात त्यांना जीवे मारण्याची,बदनामी करण्याची धमकी दिली जाते त्यांच्या वर बलात्कार करण्याची सुदधा धमकी दिली जाते.मागील वेळेस एकदा एका महिला पत्रकार सोबत हा आॅनलाईन सायबर बुलिंगचा प्रकार घडुन आला होता.

See also  बायोकंप्युटर म्हणजे काय? - BIO COMPUTER MEANING IN MARATHI

सायबर बुलिंग मुळे एखाद्या व्यक्तीवर काय अणि कितपत मानसिक अणि भावनिक परिणाम होऊ शकतो?

  • सायबर बुलिंग हा एक प्रकारचा मानसिक छळवणुकीचा पिळवणुकीचा प्रकार आहे ज्यामुळे एखाद्या पीडीत त्रस्त व्यक्तीला मानसिक भावनिक आघात देखील पोहचु शकतो.अणि त्याची मानसिक तसेच भावनिक स्थिती बिघडत असते.अणि अशी व्यक्ती आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय देखील घेऊ शकते.
  • सायबर बुलिंगचा शिकार झालेल्या व्यक्तीच्या जीवनावर याचा दिर्घकाळ परिणाम होताना दिसुन येत असतो.अशा व्यक्तीला स्वताच्या विषयी राग घृणा अणि लाज वाटत असते.
  • सायबर बुलिंगचा शिकार झालेल्या व्यक्ती ह्या नेहमी निराश राहू लागते कोणत्या ना कोणत्या भीतीमध्ये तसेच चिंतेमध्ये व्यस्त असतात.
  • सायबर बुलिंगने पीडीत असलेल्या व्यक्ती यांना कोणत्याच गोष्टींमध्ये रूची राहत नसते.असे व्यक्ती स्वतःला एकटे समजुन एकटेपणा स्वीकारतात.अणि सतत स्वताला कुठल्याही गोष्टीसाठी दोष देत असतात.ही व्यक्ती स्वताला निराधार तसेच असहाय्य समजू लागते.ज्याचे परिणाम स्वरुप ही व्यक्ती स्वताचा स्वाभिमान देखील गमावून बसत असते.ही व्यक्ती कुठलेही काम करताना स्वताच्या पात्रतेवर,क्षमतेवर योग्यतेवर शंका देखील घेऊ लागते.
  • सायबर बुलिंगने त्रस्त असलेली व्यक्ती जीवनात नैराश्य येऊन नाउमेद होते अणि अशी व्यक्ती स्वताला ह्या त्रासापासून जीवनापासून मुक्त करण्यासाठी अखेरीस आत्महत्या करण्याचे ठरवत असते.

सायबर बुलिंगचा धोका कोणाला अधिक असतो?

सायबर बुलिंगचा अधिक धोका हा आपल्या घरातील लहनगया मंडळींना म्हणजेच लहान मुले यांना अधिक असल्याचे दिसून येते.तसेच हा धोका तरूणांना देखील असतो.

कारण हे सतत नेहमी सोशल मिडिया वर अॅक्टिवह राहत असतात.आॅनलाईन गेम खेळत असतात वेगवेगळ्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा गृपचा चॅटिंग वगैरे इत्यादी करीता दैनंदिन जीवनात उपयोग करत असतात.

कधीकधी पालकांच्या नकळत देखील लहान मुले याचा शिकार बनत असतात.म्हणुन‌ पालक वर्गाने देखील आपल्या मुलांच्या मोबाईल वापरण्यावर काही ठाराविक प्रमाणात बंदी घालणे गरजेचे आहे त्यांच्यावर ब़ंधन ठेवणे गरजेचे आहे.

See also  Web 3.0 म्हणजे काय ? Web3 Next generation internet Marathi information

उदा, आॅनलाईन गेम खेळताना चॅटिंग करताना एखाद्या कडुन हिणवले जाणे धमकावले जाणे असे प्रकार लहान मुलांच्या बाबतीत घडू शकतात.अणि यामुळे मुलांच्या मानसिकतेवर दिर्घकाळ गंभीर परिणाम होऊ शकतो.

सायबर बुलिंगचे कोणकोणते महत्वाचे प्रकार आहेत?

१)ट्रोलिंग –

हा सायभर बुलिंगचा एक प्रकार आहे.यामध्ये पीडीत व्यक्तीला त्रास देण्यासाठी त्याच्या विरूद्ध आॅनलाईन वेबसाईट तसेच सोशल मिडिया माधयमादवारे आक्षेपार्ह अशी पोस्ट टाकली जाते किंवा त्याच्या बाबत एखादी टिप्पणी करून त्याला मानसिक हानी पोहचवली जाते.

२) सायबर स्टाॅकिंग –

यात पीडीत व्यक्तीच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवले जाते.त्याचा पाठलाग केला जातो शिवाय त्याला बदनाम करण्याच्या जिवे मारण्याच्या धमक्या सुद्धा दिल्या जात असतात.

३) व्यक्तीची फसवणुक करणे –

यात गोड बोलुन आधी एखाद्या व्यक्तीचा विश्वास संपादीत केला जात असतो.त्याची महत्वाची वैयक्तिक माहिती डेटा प्राप्त केला जातो मग नंतर त्यांची फसवणुक केली जाते ह्या प्रकारात आपली वैयक्तिक माहिती डेटा जगजाहीर करून आपली बदनामी करण्याची,वैयक्तिक माहिती डेटाचा गैरवापर करण्याची धमकी सुद्धा दिली जाते.अणि अनेक प्रकारात आपल्या डेटा माहीतीचा दुरूपयोग सुद्धा केला जात असतो.

४) निर्दशनास न येणारी सायबर बुलिंग –

सायबर बुलिंगचे असेही प्रकार आहेत जे कधीही आपल्या लक्षात येत नसतात.जसे की बोलता बोलता एखाद्याला जाणुन बुजुन मनाला लागेल असे टोमणे मारणे, मन दुखवेल असा वाईट शब्द वापरणे.

५) सतत होत असलेली सायबर बुलिंग –

यात पीडीत व्यक्तीचा सोशल मिडिया तसेच आॅनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नेहमी सतत पिच्छा म्हणजेच पाठलाग केला जातो त्याला फाॅलो केले जाते अणि त्याला सतत त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवर धमकीचे संदेश दिले जातात समाजामध्ये बदनाम करण्याची धमकी दिली जाते.

६) पर्मनंट सायबर बुलिंग –

सायबर बुलिंगच्या ह्या प्रकारामध्ये एक कायमस्वरूपी निशाणी म्हणजेच फुटप्रिंट सोडली जात असते.

म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीविरूदध आॅनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून काही आक्षेपार्ह बदनामी होईल अशी पोस्ट टाकली असेल तसेच एखादी चुकीची टिप्पणी आॅनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केली असेल तर ही आक्षेपार्ह पोस्ट टिप्पणी कधीच आॅनलाईन प्लॅटफॉर्म वरून डिलीट करण्यात येत नाही.

See also  बिजगुरुकुल – Bizgurukul -Chance to Change – Learn Personality Development Skills

म्हणुन अशा प्रकारच्या सायबर बुलिंगला पर्मनंट सायबर बुलिंग असे म्हटले जाते.