जागतिक जल दिन का साजरा केला जातो? – जागतिक जल दिनाचे महत्त्व अणि इतिहास काय आहे? – World water day 22 March

World water day 22 March

जागतिक जल दिन का साजरा केला जातो? – जागतिक जल दिनाचे महत्त्व अणि इतिहास काय आहे?

मित्रांनो जल हे जीवन आहे ह्या पृथ्वीतलावर राहत असलेला जगातील असा कुठलाच सजीव प्राणी,व्यक्ती नाही जो पाण्याशिवाय जीवंत राहु शकतो.आपल्याला प्रत्येकाला जिवंत राहण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते.

पण आज देखील लाखो करोडो लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई सहन करावा लागत आहे पिण्याच्या पाणी मिळविण्यासाठी एका गावातुन दुसऱ्या गावात लांब अंतरावर पायी चालत जावे लागते आहे.

अणि पिण्याचे पाणी प्राप्त करण्यासाठी एवढी झटपट करून देखील काही काही जणांना पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नाहीये अनेक जणांच्या जीवनात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झालेला दिसुन येतो.

यामुळे आता नागरीकांना पिण्याच्या पाण्याचे महत्त्व पटवून देणे आता फारच गरजेचे झाले आहे.पिण्याच्या पाण्याचे संवर्धन करायला लावणे आवश्यक झाले आहे.

लोकांमध्ये पाण्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी लोकांना पिण्याच्या पाण्याचे महत्त्व कळावे,लोकांनी पाण्याचा जपुन अणि आवश्यकता आहे तेवढाच वापर करावा यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक विशेष दिवस साजरा केला जातो ज्याला आपण जागतिक जल दिन असे म्हणतो.

जागतिक जल दिन हा दरवर्षी २२ मार्च रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.या दिवशी लोकांमध्ये पाण्याविषयी जागरूकता निर्माण केली जाते त्यांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले जाते.

फेक लोन अ‍ॅप्स म्हणजे काय? | Fake loan apps information in Marathi

या दिवशी पाण्याच्या बाबतीत निर्माण होत असलेल्या समस्या अडचणी संकटांविषयी लोकांमध्ये जनजागृती केली जाते.हया संकटातुन बाहेर पडण्यासाठी सर्व संस्था,संघटना अणि शासन यांनी एकत्र येऊन गंभीर अणि महत्वाचे पाऊल उचलले पाहीजे हे सांगण्याचा हा दिवस आहे.भविष्यात येणाऱ्या जलसंकटाबददल लोकांना जागरूक केले जाते.

पाणी हा आपल्या मानवी जीवनातील सर्वात महत्वाचा स्त्रोत आहे.पाण्याचा वापर आपण फक्त पिण्यासाठी करत नसतो तर कपडे धुणे,खरगटी भांडी धुणे अशा अनेक घरगुती वापरासाठी आपण पाण्याचा आपल्या दैनंदिन जीवनात रोज वापर करत असतो.

एवढेच नव्हे तर शेतीमध्ये देखील पिकांच्या योग्य वाढीसाठी पिकांना पाण्याची आवश्यकता असते.

पण आजही बर्याच ठिकाणी जनतेला स्वच्छ अणि आवश्यकता आहे तेवढे पाणी उपलब्ध होत नाहीये.ज्यामुळे दुषित पाण्याचे सेवन केल्यामुळे लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते आहे.काही जणांचा तर यात मृत्यू देखील होत असतो.

जागतिक जल दिन हा दिवस आपणा सर्वांना हया गोष्टीची जाणीव करून देतो की आपल्या आजुबाजुच्या आपल्या सभोवतालच्या प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ अणि आवश्यकता आहे तेवढे पाणी उपलब्ध व्हावे हे सुनिश्चित करणे ही आपणा सर्वांची मुख्य जबाबदारी आहे.

आज जागोजागी वाढत्या औद्योगिकरणामुळे पिण्याच्या पाण्याचा अतिवापर करण्यात येत आहे ज्यामुळे मानवास पाण्याचा अभाव टंचाई भासु लागली आहे.हे संकट भविष्यात अधिक वाढु नये म्हणून आपण ठोस उचलणे आवश्यक आहे.हे सांगणारा हा दिवस आहे.

पाण्याच्या गरजेविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून संयुक्त राष्ट्राने हा दिवस साजरा करण्यास सर्वप्रथम आरंभ केला होता.

१९९२ मध्ये ब्राझील ह्या देशामधील रिओ दी जानेरो ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्र विकास अणि पर्यावरण ह्या एका परिषदेमध्ये हा जल दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जावा असा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

यानंतर मग पुढे जाऊन १९९३ मध्ये पाण्याविषयी लोकांमध्ये सामुदायिक जागृकता निर्माण करण्यासाठी लोकांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर संपुर्ण जगभरात साजरा केला जाऊ लागला.

पहिला जागतिक जल दिन हा १९९३ मध्ये २२ मार्च रोजी साजरा करण्यात आला होता.

2 thoughts on “जागतिक जल दिन का साजरा केला जातो? – जागतिक जल दिनाचे महत्त्व अणि इतिहास काय आहे? – World water day 22 March”

    • पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि जागतिक जलसंकटाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन पाळला जातो. हा दिवस साजरा करण्याचा प्राथमिक उद्देश SDG 6 च्या यशाला चालना देणे आहे, ज्याचे उद्दिष्ट 2030 पर्यंत प्रत्येकासाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छता उपलब्ध करून देण्याचे आहे.

Comments are closed.