सचिन तेंडुलकर विषयी जाणुन घ्यायची काही महत्वाची रोचक तथ्ये Important facts about Sachin Tendulkar in Marathi

सचिन तेंडुलकर विषयी जाणुन घ्यायची काही महत्वाची रोचक तथ्ये Important facts about Sachin Tendulkar in Marathi

आज आपण सचिन तेंडुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विषयी काही रोचक तथ्ये जाणुन घेणार आहोत.

  1. सचिन तेंडुलकर याने भारत देशासाठी मॅच खेळण्या अगोदर पाकिस्तान देशाकडुन मॅच खेळली होती.
  2. २० जानेवारी १९८७ मध्ये भारत अणि पाकिस्तान दरम्यान एक प्रदर्शन एक्झिबिशन मॅच झाली होती तेव्हा सचिन तेंडुलकर याला इम्रान खानच्या संघातुन सबस्टीटयुट पर्याय म्हणून खेळवण्यात आले होते हीच सचिन तेंडुलकर याने खेळलेली पहिली मॅच होती.
  3. सचिन तेंडुलकर याने त्याची पहिली अॅड ही बुस्ट ह्या ब्रॅडसाठी केली होती.
  4. सचिन तेंडुलकर याची सर्वात पहिली कार मारूती एट हंड्रेड ही होती.
  5. सचिन तेंडुलकर याचे वडील हे जुन्या काळातील गायक सचिन देव वर्मन यांचे खुप मोठे फॅन होते म्हणून त्यांनी आपल्या मुलाचे नाव सचिन असे ठेवले होते.
  6. 1990 मध्ये सचिन तेंडुलकर याने जेव्हा त्याचे पहिले अर्धशतक लगावले अणि तो मॅन ऑफ द मॅच ठरला तेव्हा सचिन याला पुरस्कारासोबत एक शॅमपियनची बाॅटल बक्षिस म्हणून देण्यात आली होती.पण सचिन तेंडुलकर हे तेव्हा खुप लहान असल्याने त्यांना ही बाॅटल उघडण्यास शॅम्पेन पिण्यास मनाई करण्यात आली होती.कारण तेव्हा सचिनचे वय अठरा वर्षे इतके पुर्ण झाले नव्हते.
  7. नंतर सचिनने ही बाॅटल त्याच्या मुलीच्या पहिल्या जन्म दिनी खोलली होती.
  8. सचिन तेंडुलकर आपल्या पत्नीला अंजलीला एअरपोर्ट वर भेटला होता तिथे अंजली तिच्या आईला पिक अप करण्यासाठी गेलेली होती.
  9. सचिन तेंडुलकर याने वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त धावा करण्याचे रेकाॅर्ड बनवले आहे.हे रेकाॅर्ड आतापर्यंत कोणीच तोडलेले नाहीये कारण सचिनच्या खालोखाल जेवढे क्रिकेटपटू आहेत ते सर्व क्रिकेट मधुन निवृत्त झाले आहेत.
  10. १९९५ मध्ये सचिन सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू बनला होता.
  11. सचिन तेंडुलकर १.५ किलो वजनाची बॅट घेऊन क्रिकेट खेळायचा.
  12. सचिन तेंडुलकर याला परफ्युम अणि घड्याळ संग्रहित करण्याचा छंद आहे.
  13. लहानपणी सचिन त्याच्या क्रिकेट किट सोबत झोपणे अधिक पसंद करायचा.
  14. सचिन तेंडुलकर याने रणजी दिलिप इराणी ट्राॅफी मध्ये पहिल्याच सामन्यात शतक केले होते.असे करणारा तो भारताचा पहिला अणि एकमेव फलंदाज होता.
  15. सचिनने आपल्या संपुर्ण कारकीर्दीत वेळेचे अणि बीसीसीआयच्या नियमांचे फार सक्तीने पालन केले आहे.म्हणुन त्याला कधीच बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन करण्यासाठी दंड भरावा लागला नव्हता.
See also  First Dental Health approach-Diet