सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देव का मानले जाते? -God of Cricket
जेव्हा भारतीय क्रिकेटचे नाव निघते तेव्हा सर्वांच्या तोंडात सगळ्यात पहिले सचिनचे नाव येत असते.
आजही सचिन निवृत्त झाल्यानंतर देखील क्रिकेटचा देव म्हणुन सचिन तेंडुलकर याला ओळखले जाते.आजही घराघरात सचिनच्या फलंदाजीचे कौतुक केले जाते.
सचिन तेंडुलकर याच्या नावावर अनेक असे विश्वविक्रम रेकाॅर्ड नोंदवले गेले आहे जे अद्याप कोणीही नोंदवले नाही
सचिनने असे पुरस्कार देखील प्राप्त केले आहेत जे अद्याप कोणा खेळाडूला दिला गेला नाही.
आजच्या लेखात आपण सचिनला क्रिकेटचा देव का मानले जाते हे थोडक्यात जाणुन घेणार आहोत.
सचिन तेंडुलकर हा जगातील एकमेव असा क्रिकेटपटू आहे ज्याचे क्रिकेट करीअर २२ वर्षांपेक्षा अधिक राहीलेले आहे.
सचिनने आतापर्यंत ३४ हजार ३५७ रण बनवले आहेत सचिनचा हा रेकाॅर्ड आतापर्यंत कोणीच तोडु शकले नाहीये.
सचिनने त्याच्या संपूर्ण करिअर मध्ये २०० आंतरराष्ट्रीय कसोटी सामने अणि ४६३ ओडिआय मॅच खेळल्या आहेत.यात देखील तो पहिल्या क्रमांकावर आहे.
हया दोनशे कसोटी सामन्यात त्याने १५ हजार ९२१ रण तसेच ४६३ ओडिआय मध्ये १८ हजार ४२६ रण त्याने बनवले आहेत.दोघा प्रकारच्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे.हे देखील सचिनने केलेले वल्ड रेकाॅर्ड मानले जाते.
सचिन एकमेव असा फलंदाज आहे ज्याने शंभर शतके लगावली आहेत अणि त्याने १९५ पेक्षा अधिक वेळा पन्नास पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
सचिन तेंडुलकर याने सगळ्यात जास्त मॅन ऑफ द मॅच अणि मॅन ऑफ द सीरीज बनण्याचा सर्वोत्कृष्ट विक्रम देखील सचिनच्या नावावर आहे.
सचिन तेंडुलकर याला ६२ वेळा मॅन ऑफ द मॅच अणि १५ वेळा मॅन ऑफ द सीरीजचा किताब देण्यात आला आहे.
सचिन जगातील एकमेव असा क्रिकेटपटू आहे ज्याने आॅस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका सारख्या बलाढ्य देशाविरूदध सर्वाधिक रण बनवले आहेत.
सर्व फलंदाजांपेक्षा अधिक प्रमाणात वल्ड कप मध्ये शतके लगावण्याचा धावा करण्याचा पराक्रम सचिनने केला आहे.
सचिन तेंडुलकर यांच्या नावावर टेस्ट अणि वन डे क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त शतक लावण्याचा रेकाॅर्ड आहे.
सचिनच्या नावावर टेस्ट मध्ये ५१ शतक अणि वन डे मध्ये ३९ शतक त्याने केले आहेत.
सचिन तेंडुलकर हा टेस्ट क्रिकेट मध्ये बारा हजार तसेच बारा हजार पेक्षा अधिक रण करणारा जगातील पहिला फलंदाज आहे.तसेच वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक १० हजार रण बनवणारा जगातील पहिला खेळाडू आहे.
सचिन हा टेस्ट खेळणारया जगातील सर्व देशाविरूदध शतक लावणारा जगातील तिसरा फलंदाज आहे.
सचिन तेंडुलकर याने क्रिकेट मध्ये आपले अमुल्य योगदान देऊन देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे केले आहे त्यासाठी त्याला भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारा सचिन हा पहिला क्रिकेटपटू आहे.असे अनेक मोठमोठे रेकाॅर्ड विश्वविक्रम सचिनच्या नावावर आहे म्हणून त्याला आजही क्रिकेटचा देव म्हटले जाते.