CJI – सी जे आय (विषयी माहीती -CJI information in Marathi

CJI – सी जे आय (विषयी माहीती -CJI information in Marathi

सी जे आयचा फुलफाँर्म काय होतो?CJI full form in Marathi

सी-जे आयचा फुलफाँर्म Chief Justice of India असा होत असतो.

सी जे-आय म्हणजे काय? CJI meaning in Marathi

भारताच्या मुख्य न्यायाधीशास सी जे आय म्हणजेच मुख्य न्यायाधीश,चीफ जस्टीस आँफ इंडिया असे म्हणतात.सी जे आय हा भारतीय न्यायपालिकेचा तसेच सर्वोच्च न्यायालयाचा अध्यक्ष असतो.

सर्वोच्च न्यायालय ही भारत देशातील न्यायप्रक्रियेची सर्वोच्च उच्च संस्था म्हणुन ओळखली जाते.इथे न्यायविषयक तसेच इतर मोठे मोठे खटले प्रश्न सोडविण्यात येत असतात.

भारताचे मुख्य न्यायाधीश हे प्रशासकीय कामकाज देखील सांभाळत असतात.खटल्यांची वाटणी करणे घटनात्मक खंडपीठाची नियुक्ती करणे कायदेशीर महत्वपूर्ण प्रकरणांना सोडविणे ही सर्व कामे भारताचे मुख्य न्यायाधीश करीत असतात.

भारताच्या राज्यघटनेत अशी तरतुद देखील केली गेली आहे की भारताच्या राज्यघटनेत मुख्य न्यायाधीश,सरन्यायाधीश आहे.

राज्यघटनेमधील दिलेल्या कलम 145 नुसार अणि सर्वोच्च न्यायालयाचे नियम असलेल्या कलम 1966 अंतर्गत असे सांगितले गेले आहे की इतर न्यायाधीशांच्या कामाची वाटणी ही सुदधा भारताच्या मुख्य न्यायाधीशांकडुन केली जाईल.

सी जे-आयची नियुक्ती कोण करत असते?

सी-जे आय म्हणजेच भारताच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती ही भारत देशाचे राष्टपती करत असतात.

See also  इन्कम स्टेटमेंट विषयी माहीती - Income statement information in Marathi

भारतीय राज्यघटनेच्या अधिनियम 124 मधील दितीय कलमनुसार ही नियुक्ती केली जात असते.

सी जे आयची CJI नियुक्ती कशी केली जात असते?

सर्वोच्च न्यायालयामधील सर्व न्यायाधीशांची निवड नियुक्ती राष्टपतींच्या हस्ते केली जात असते.

सीजे आयची नियुक्ती करण्याआधी राष्टपती हे सर्वोच्च न्यायालयाच्या काँलेजिअमसोबत याविषयी चर्चा करीत असतात.सल्ला मसलत करीत असतात.

यात भारताचे इतर सीजे आय देखील राष्टपतींना याबाबत आपला सल्ला देत असतात म्हणजेच नवीन सीजी आयच्या नियुक्तीसाठी शिफारस करीत असतात पण याआधी ते चार ते पाच ज्येष्ठ अनुभवी जजच्या गृपचा सल्ला घेत असतात.मग ज्येष्ठ न्यायमूर्तींच्या सल्ल्यानुसार सी जे आय आपले मत राष्टपतींसमोर मांडत असतो.मग नवीन मुख्य न्यायाधीशाची निवड करून त्याच्याकडुन राष्टपतींच्या उपस्थितीमध्ये शपथ घेतली जात असते.

पण ह्या सल्ल्याचे पालन करण्याचे कुठलेही बंधन राष्टपतींवर नसते.

पण जेव्हा इतर जजेसची नियुक्ती केली जात असते तेव्हा राष्टपतींना भारताच्या मुख्य न्यायाधीशांच्या मताचे पालन करावेच लागत असते.हे त्यांच्यासाठी अनिवार्य असते.

सुप्रिम कोर्टातील सगळयात सिनिअर जर्जला मुख्य न्यायाधीश पदासाठी निवडले जात असते.मुख्य न्यायाधीशाची निवड करताना त्याचे वय न बघता कामाचा अनुभव बघितला जात असतो.

सी जे आयची प्रमुख कार्ये कोणकोणती असतात?

● सी जे आय म्हणजे भारताचा मुख्य न्यायाधीश हा सर्वोच्च न्यायालय मधील एक अत्यंत प्रमुख व्यक्ती असतो.म्हणुन सर्व प्रशासकीय कामकाज त्याच्याच उपस्थितीमध्ये पार पाडले जात असते.म्हणजेच त्याला एक प्रशासकाची भुमिका देखील पार पाडावी लागत असते.

● सर्वोच्च न्यायालय मध्ये जेवढेही कामकाज चालते कार्य केले जाते त्याची परवानगी सर्वप्रथम सीजे आय देत असतो.मग ते कार्य केले जाते.

● सीजे आय हा रोस्टरची देखरेख करण्याचे काम देखील करीत असतो.याचसोबत तो न्यायालयामधील अधिकारींची नियुक्ती करण्याचे काम देखील करीत असतो.

सी जे आयची जबाबदारी काय असते?

● सी जे आयची सर्वप्रथम जबाबदारी असते न्यायालयीन प्रक्रियेतील सर्व खटले,केस,प्रकरण यांचा लवकरात लवकर निकाल लावणे.त्यांचा निकाल लावण्यात जास्त विलंब न करणे.

See also  दिनविशेष - 5 मे – Din Vishesh 5 May 2023

● भारतीय न्यायालयातील जेवढेही खटले केस प्रकरण अनेको वर्षापासुन प्रलंबित आहेत त्याविषयी सविस्तर कृती आराखडे तयार करावे अणि हे सर्व घटले केस प्रकरण लवकरात लवकर सोडवणे.ही सी-जे आयची दुसरी जबाबदारी असते.

● भारतातील नागरीकांचा न्यायालयीन प्रक्रियेवरील न्यायपालिकेवरचा विश्वास अधिक वाढावा यासाठी भारताच्या मुख्य न्यायाधीशाने सी जे आयने काही योग्य पाऊले उचलणे गरजेचे असते.

● सर्व प्रलंबित खटल्यांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी निकाल लावण्यासाठी उच्च तसेच कनिष्ठ न्यायालयात जी न्यायाधीशांची कमतरता जाणवते आहे ही कमरतरता सी-जे आयने लवकरात लवकर योग्य ती पाऊले उचलून भरून काढावी.

● विविध जुन्या प्रलंबित खटल्यांचा केस प्रकरणांचा निकाल लावण्यात होत असलेल्या विलंबावर विचार विनिमय करून योग्य तो तोडगा काढणे.अणि त्या खटल्यांचा लवकरात लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न करणे.ही सुदधा सी जे आयचीच मुख्य जबाबदारी असते.

सी जे आय कसे बनावे?

● सी-जे आय बनण्यासाठी आपल्याला प्रथम कोणत्याही एका शाखेतुन बारावी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

● यानंतर आपणास कायद्यात बँचलर डिग्री प्राप्त करावी लागते.कारण सुप्रिम कोर्ट जज बनण्यासाठी अणि त्यानंतर सीजे आय बनण्यासाठी आपणास कायद्याची सी-एल एटी सारख्या परीक्षा देऊन डिग्री घ्यावी लागते.

● मग एल एलबी झाल्यानंतर आपणास लाँयर म्हणुन काही वर्षे प्रँक्टिस करावी लागते.

● मग लाँयर बनल्यानंतर आपणास हाय कोर्ट मध्ये जर्ज बनण्याची संधी प्राप्त होत असते.यात आपणास भारतातील कुठल्याही राज्यात ज्युडिशिअल आँफिसमध्ये काम करावे लागते.किंवा कोणत्याही राज्यातील हायकोर्टमध्ये अधिवक्ता म्हणुन १० वर्ष काम करण्याचा अनुभव प्राप्त करावा लागतो.

सी जे आय बनण्यासाठी आपल्यात काय पात्रता योग्यता आवश्यक असते?

● आपण भारत देशाचे नागरीक असणे गरजेचे आहे.

● सदर उमेदवाराला कमीत कमी पाच वर्षाचा उच्च न्यायालय मधील म्हणुन काम केल्याचा अनुभव असावा.

● किमान पाच वर्षे इतका कालावधी त्याने दोन पेक्षा अधिक न्यायालयांमध्ये काम केलेले असावे.

See also  जगातील सर्वात मोठया कंपन्या- Biggest Companies In The World

● सलग दहा वर्ष उच्च न्यायालय तसेच कुठल्याही न्यायालयात वकिली करण्याचा अनुभव असावा.

● सदर व्यक्तिस कायद्याचे उत्तम ज्ञान असावे.तो कायद्यात पारंगत तसेच कायदेतज्ञ असावा.

सुप्रिम कोर्टातील सर्व न्यायाधीश किती वय झाल्यानंतर निवृत्त होऊ शकतात?

सुप्रिम कोर्टातील सर्व न्यायाधीश 65 वय झाल्यानंतर निवृत्त होऊ शकतात.

वर्तमानात भारताचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?

वर्तमानात भारताचे मुख्य न्यायाधीश उदय ललित आहेत

Leave a Comment