जागतिक हवामान दिवस महत्व अणि इतिहास – World meteorological day history and importance in Marathi

जागतिक हवामान दिवस महत्व अणि इतिहास world meteorological day history and importance in Marathi

दरवर्षी २३ मार्च रोजी जागतिक हवामान संघटनेच्या वर्धापनदिन निमित्त म्हणजेच स्थापणा दिवसानिमित्त हा दिवस संपुर्ण जगभरात जागतिक पातळीवर साजरा केला जातो.

WMO (World meteorological organization) जागतिक हवामान संस्थेची स्थापना ही १९५० मध्ये २३ मार्च ह्या तारखेला करण्यात आली होती.

दरवर्षी २३ मार्च रोजी हवामान दिनानिमित्त हवामानाविषयी विशेष चर्चा मसलत केली जाते.

ज्यात हवामानात घडुन आलेले परिवर्तन अणि त्यावर केल्या जात असलेल्या उपाययोजना इत्यादी विषयांवर सामुदायिक रीत्या चर्चा तसेच मंथन करण्यात येते.

जागतिक हवामान संस्थेचे प्रमुख कार्यालय हे स्वीत्झलॅड या देशात जिनिव्हा येथे आहे.

जागतिक हवामान संस्थेचे मुख्य कार्य हे जागतिक पातळीवर भुकंप,पुर दुष्काळ, इत्यादी ह्या ज्या नैसर्गिक आपत्ती तसेच नैसर्गिक संकटे विपदा निर्माण होत असतात.यांचा सखोलपणे अंदाज आढावा घेणे हे असते.

WMO म्हणजेच जागतिक हवामान संस्था ह्या संस्थेचे आतापर्यंत संपूर्ण जगभरातील १९३ देशांनी सभासदत्व स्वीकारले आहे.

जागतिक हवामान संस्थेकडुन दरवर्षी २३ मार्च रोजी जागतिक हवामान दिनानिमित्त एक थीम निवडली जाते.

अणि ह्या थीमनुसार वर्षभरात जागतिक हवामान संस्थेला कोणकोणती कार्ये पार पाडावी लागणार आहे कोणते उपक्रम राबवायचे आहे हे ठरविण्यात येत असते.

आपल्या ह्या पृथ्वीतलावर जेवढयाही समस्या अडीअडचणी समस्या आहेत जसे की वनतोड, जागतिक तापमान वाढ अशा ह्या जमिनीवरील सर्व महत्वाच्या समस्यांवर आजच्या दिवशी विशेष लक्ष केंद्रित केले जाते.

पुर दुष्काळ भुकंप अशा अनेक नैसर्गिक संकटाचा आपत्तींचा हवामानावरून अंदाज लावण्याचे काम जागतिक हवामान संस्था करते.जेणेकरून लोकांना येणारया नैसर्गिक आपत्ती संकटाविषयी आधीपासून सुचित करता येईल अणि भविष्यात भुकंप दुष्काळ पुर यामुळे होणारी वित्तहानी जीवहानी टाळता येईल.

हा दिवस पर्यावरणीय स्थिती विषयी जनतेमध्ये सजगता जागृकता निर्माण व्हावी यासाठी खुप महत्वाचा ठरत असतो.

हा दिवस आपणास हे देखील सांगण्याचा प्रयत्न करतो की जर मानवाने योग्य ती काळजी घेतली तर पृथ्वीवरील विविध समस्या अडचणींवर वेळ असता उपाययोजना केली तर पृथ्वीवरील नैसर्गिक समतोल बिघडणार नाही,पर्यावरणाची कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही.अनेक अन्नसाखळी जिवांचे देखील आपणास रक्षण करता येईल.

जागोजागी वातावरणात आता दिवसेंदिवस बदल घडुन येताना आपणास दिसून येते आहे.ज्यामुळे आपणास कुठे अवकाळी पाऊस पडताना दिसुन येत आहे तर काही ठिकाणी पाऊस न पडल्याने दुष्काळाची स्थिती निर्माण होताना दिसुन येत आहे.

अमेरिकेतील आर्थिक संकटाचा फटका आता भारतातील आयटी कंपन्यांना बसणार

जलप्रदूषण वायुप्रदूषण यात देखील दिवसेंदिवस अधिक वाढ होत आहे.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर निसर्गाच्या साधनसंपत्तीचा गैरवापर करण्याचे,जंगलतोड करण्याचे पाण्यात प्लास्टिक टाकण्याचे निसर्गाला हानी पोहोचण्याचे चांगलेच भयंकर परिणाम मानवाला मोजावे लागत असल्याचे दिसून येत आहे.

म्हणुन निसर्गाचे नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी वनतोड रोखण्यासाठी वाढत्या जल वायु प्रदुषणाला आळा घालण्यासाठी अणि हवामान योग्य राखण्यासाठी त्यात संतुलन राखण्यासाठी आपण काही महत्वाचे पाऊल उचलणे गरजेचे झाले आहे.

आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतातील अनेक हवामान अभ्यासक याचकरीता हवामाना संदर्भात सखोल अभ्यास करीत आहे.

हवामान चांगले ठेवण्यासाठी आपण सर्वांनी काही विशेष दक्षता पाळणे आवश्यक आहे.

२०२३ मधील जागतिक हवामान दिवसाची थीम काय आहे?

भविष्यातील हवामान याचसोबत हवामान अणि पाण्याचे भविष्य ह्या थीमवर २०२३ मधील जागतिक हवामान दिवस साजरा केला जाणार आहे.