मोबाइल वाँलेट म्हणजे काय? ई वाँलेट,डिजीटल वाँलेट चा वापर ,प्रकार व फायदे – संपूर्ण माहीती – Mobile wallet information in Marathi

Table of Contents

मोबाइल वाँलेट म्हणजे काय? ई वाँलेट,डिजीटल वाँलेट चा वापर ,प्रकार व फायदे – संपूर्ण माहीती – Mobile wallet information in Marathi

वाँलेट म्हणजे काय wallet meaning in Marathi

मित्रांनो वाँलेट म्हणजेच पाकिट असा अर्थ होत असतो हे आपल्या सर्वानाच माहीत आहे.म्हणजे असे ठिकाण जिथे आपण आपले पैसे सुरक्षित ठेवत असतो.यात ठेवलेले पैसे आपण खर्चायला वस्तुंची खरेदी रिचार्ज करायला बील पे करायला वापरत असतो.

मोबाइल वाँलेट म्हणजे काय?mobile wallet meaning in Marathi

मोबाइल वाँलेट ही मोबाईलदवारे डिजीटली तसेच कँशलेस स्वरुपात पेमेंट करण्याची एक सुविधा आहे.

ह्या डिजीटल युगात आपल्याला डिजीटल कँशलेस पेमेंटचे नवनवीन प्रकार पाहायला मिळतात.

ज्यात ई वाँलेट,मोबाईल वाँलेट मध्ये फोन पे वाँलेट,पे टियम वाँलेट,ट्रस्ट वाँलेट,गुगल पे वाँलेट,सँमसंग पे,अँपल पे इत्यादी नवनवीन डिजीटल वाँयलेटचा समावेश होतो.

मोबाइल वाँलेटचा वापर कसा करायचा?मोबाईल वाँलेटचा वापर करण्यासाठी कशाची आवश्यकता असते?

मोबाइल वाँलेट हे एक प्रकारचे बँक खाते आहे.जे अँड्राईड स्मार्टफोन वापरकर्ते डिजीटल कँशलेस पेमेंट साठी युझ करू शकतात.

हे अकाउंट अँड्राईड मोबाइलच्या इंटरनेटच्या साहाय्याने ओपन केले जाते.इथे आपणास आपला मोबाइल नंबर अणि अकाऊंट ओपन करण्यासाठी लागणारी सर्व डिटेल फील करावी लागते.

See also  भारतातील सर्वात प्रभावी प्रेरणादायी वक्ते कोण आहेत ?-  Top 10 motivational speakers in India

वाँलेट सर्विससाठी आपले नाव रेजिस्टर करून झाले की आपण आपल्या क्रेडिट तसेच डेबिट कार्डच्या साहाय्याने आपल्या वाँलेट अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो.अणि तेच पैसे आँनलाईन पेमेंट करण्यासाठी वापरू देखील शकतो.

मोबाइल वाँलेटने पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी पैसे पाठवणारा अणि पैसे रिसिव्ह करणारा या दोघांकडे वाँलेटची सुविधा देणारया कंपनीचे मोबाइल वाँलेट अकाऊंट असावे लागते.

मोबाइल वाँलेटमधुन पैसे काढण्यासाठी आपल्याला एखाद्या वाँयलेट एजंटची गरज असते जो आपल्या वाँलेटमधील पैसे कट करून घेतो अणि स्वताच्या वाँलेट अकाउंटवर ती जमा करत असतो.अणि आपल्या वाँयलेटमधील जेवढी रक्कम त्याने कट केली ती आपल्याला तो कँश मध्ये पे करत असतो.

हा वाँलेट एजंट एखादा दुकानदार,सायबर कँफेवाला व्यक्ती देखील असु शकतो.

ई वाँलेट,डिजीटल वाँलेट म्हणजे काय?e wallet digital wallet meaning in Marathi

ई वाँलेट डिजीटल वाँलेट ही एक डिजीटल सुविधा आहे.ज्याचा वापर करून आपण आँनलाईन इलेक्ट्राँनिक माध्यमातुन पैशांची देवाण घेवाण करू शकतो.

वाँलेट बँलन्स म्हणजे काय?Wallet balance meaning in Marathi

वाँलेट बँलन्स म्हणजे वाँलेटमधील उरलेले पैसे शिल्लक रक्कम होय.

मोबाइल वाँलेटचा वापर कुठे अणि का केला जात असतो?

मोबाइल वाँयलेट दवारे आपण कँश लेस मेथडचा वापर करून मोबाइलचा रिचार्ज करू शकतो.टँक्सी भाडे देऊ शकतो,एखादे बील पे करू शकतो जसे की कँफेत तसेच हाँटेलात काँफी वगैरै घेतल्यानंतर देखील बिल पेमेंट करण्यासाठी आपण मोबाइल वाँलेटचा वापर करू शकतो.

विविध ई काँमर्स साईट,आँनलाईन तिकिट बुकिंग साईटवरून एखादे प्रोडक्ट तसेच तिकिट खरेदी केल्यावर आँनलाईन पेमेंट करण्यासाठी आपण मोबाइल वाँलेटचा वापर करू शकतो.

म्हणजेच थोडक्यात सांगायचे म्हटले तर मोबाइल वाँयलेटच्या साहाय्याने कुठलीही व्यक्ती कँश लेस मेथडने खिशात पैसे नसताना देखील आँनलाईन कुठलेही पेमेंट करू शकते.

मोबाइल वाँलेटचे फायदे –

● आपल्याला कुठलेही बिल तसेच खरेदीचे पेमेंट कँशलेस मेथडने मोबाइल व्हाँईलेटच्या मदतीने करता येत असते.यासाठी जवळ पैसै ठेवण्याची गरज पडत नाही.

● मोबाइल व्हाँलेटमध्ये आपण आपल्याला हवे तेवढे पैसे देवाण घेवाणीचे व्यवहार करण्यासाठी ठेवू शकतो.

मोबाईल वाँलेटचे काही प्रमुख प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?Types of mobile wallet in Marathi

भारतात मोबाइल वाँलेटचे सध्या एकुण तीन प्रमुख प्रकार आहेत-

1)क्लोज वाँलेट –

See also  Solar eclipse- २०२३ मध्ये सुर्य ग्रहण कधी आहे? सुर्यग्रहणाची तारीख अणि वेळ काय असणार आहे? -Solar eclipse 2023 in India

2) ओपन वाँलेट –

3) सेमीक्लोज वाँलेट –

1)क्लोज वाँलेट –

क्लोज वाँलेट मध्ये आपण विशिष्ठ सर्विस देत असलेल्या कंपनीच्या वाँलेटमध्येच पैसे ठेवत असतो अणि फक्त त्याचकंपनीच्या सर्विसेस वर आपल्या वाँलेटमधील पैसे खर्च करत असतो.

2) सेमीक्लोज वाँलेट –

सेमीक्लोज वाँलेटदवारे आपण कुठल्याही वस्तु प्रोडक्ट सर्विसच्या खरेदीसाठी पैसे देऊ शकतो.ह्या वाँलेटदवारे आपण इतर आर्थिक सेवेचे व्यवहार सुदधा करू शकतो.

यात आपल्याला फक्त आँनलाईन पेमेंट तसेच खरेदी, तिकिट बुकिंगसाठी वाँलेट सर्विसचा लाभ उठवता येत असतो यातुन आपण रोख पैसे काढु शकत नसतो.

3) ओपन वाँलेट –

ओपन वाँलेटदवारे आपण कुठल्याही वस्तु प्रोडक्ट सर्विसची खरेदी करू शकतो.कुठल्याही आर्थिक सेवेसाठी एखाद्याला पैसे ट्रान्सफर करू शकतो.अणि हवे असल्यास आपण एटीएम वगैरे दवारे कँशमध्ये पेमेंट देखील काढु शकतो.

ओपन वाँलेट हे बँक आपल्या खातेधारकांना आँफर करत असते.

फोन पे वाँलेट काय आहे?phone pay wallet meaning in Marathi

ही एक फोन पे अँपची वाँलेट सुविधा आहे यात आपण आपल्याला हवी तेवढी रक्कम आपल्या फोन पे वाँलेट अकाऊंट मध्ये ठेवू शकतो.अणि आपल्याला आवश्यकता असेल तेव्हा आपण ह्या वाँलेटमधील रक्कम कोणालाही आँनलाईन पेमेंट करायला युझ करू शकतो.

याने आपल्याला हा एक फायदा होतो की वारंवार आपणास आपल्या बँख अकाऊंट मधुन दुसरया व्यक्तीच्या बँक अकाऊंटवर पैसे ट्रान्सफर करण्याची आवश्यकता पडत नसते.

यात आपल्याला रिचार्ज वगैरे केल्यावर जे रिवाँर्ड मिळत असतात त्याची देखील रक्कम आपल्या फोन पे वाँलेटमध्ये जमा होत असते.

आपल्या फोन पे वाँलेट अकाऊंटमध्ये पैसे जमा कसे करायचे?

● सगळयात पहिले आपल्या मोबाइल मध्ये इंस्टाँल केलेली फोन पे ही अँप ओपन करायची.

● फोन पे अँप ओपन केल्यावर तिथे खाली दिलेल्या माय मनी ह्या आँप्शनवर क्लीक करायचे.

● माय मनी वर क्लीक केल्यावर आपणास फोन पे वाँलेट नावाचे आँप्शन दिसुन येईल.आपण त्यावर क्लीक करायचे.

● फोन पे वाँलेट आँप्शन वर क्लीक करून झाले की आपल्यासमोर आपल्या फोन पे वाँलेटमध्ये शिल्लक असलेली आधीची रक्कम दिसुन येईल.आपण या आधी कुठलीही रक्कम वाँलेटमध्ये टाकली नसेल तर तिथे झिरो अमाऊंट दिसुन येईल.

See also  बाँक्सिंग डे महत्त्व अणि इतिहास - Boxing Day history and importance in Marathi

● फोन पे वाँलेटमध्ये पैसे टाकायला आपणास इंटर अमाऊंट ह्या आँप्शनवर क्लीक करावे लागते.अणि त्याखाली दिलेल्या टाँप अप आँप्शनवर क्लीक करावे लागेल.

● टाँप अप वाँलेटवर क्लीक केल्यावर आपणास एक पिन विचारला जातो तो पिन नंबर तिथे आपणास इंटर करावा लागतो.

यानंतर आपल्या फोन पे वाँलेट अकाऊंट मध्ये पैसे जमा होऊन जातात.

आपले फोन पे वाँलेट अचानक डिअँक्टीव्हेट का अणि कधी होते?

जेव्हा आपण आपले फोन पे वाँलेट अकाऊंट बंद करण्यासाठी रिक्वेस्ट केलेली असते.एकदा वाँलेट बंद झाल्यानंतर ते पुन्हा अँक्टीव्हेट नही राहत.

जर आपण आपल्या फोन पे वाँलेट अकाऊंटचा 12 महिने पेक्षा अधिक काळ उपयोग नही केला तर आरबी आयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आपले फोन पे वाँलेट अकाउंट इनँक्टिव्ह केले जाऊ शकते.

फोन पे चे वाँलेट अकाऊंटला पुन्हा अँक्टीव्हेट कसे करायचे?

हे इनँक्टिव्ह अकाऊंट अँक्टिव्हेट करायला आपण टाँप अप वाँलेट ह्या पेमेंट स्क्रीनवर जाऊ शकतो.इथे आपणास ओटीपी व्हेरीफिकेशन करून वाँलेट अकाऊंट पुन्हा अँक्टिव्हेट करता येते.

रिअँक्टिव्हेशन ची प्रक्रिया –

● सगळयात पहिले फोन पे मध्ये जाऊन माय मनी आँप्शनवर क्लीक करायचे.

● माय मनी मध्ये फोन पे वाँलेट आँप्शनवर जायचे.

● तिथे दिलेल्या अँक्टिव्हेट वाँलेट आँप्शनवर क्लीक करायचे.

● आपल्या मोबाइल नंबर एक ओटीपी सेंड केला जातो ते तिथे इंटर करायचा.

● व्हेरीफिकेशन करायला ओके आँप्शनवर क्लीक करायचे अणि यानंतर आपले फोन पे वाँलेट अँक्टीव्हेट होऊन जाईल.

फोन पे वाँलेटमधुन पैसे कसे काढायचे?

फोन पे वाँलेटमधुन पैसे काढण्याच्या दोन प्रमुख पदधती आहेत-

पहिली पदधत -फोन पे वाँलेट अकाऊंट बंद करून वाँलेटमधून पैसे काढण्यासाठी

● सगळयात पहिले आपण आपल्या मोबाइल मधील फोन पे अँप ओपन करून घ्यावी.

● मग तिथे दिलेल्या माय मनी आँप्शनवर क्लिक करायचे.

● माय मनी आँफ्शनमधुन फोन पे वाँलेट वर गेल्यावर आपणास डाव्या बाजुला एक क्वेशन आयकाँन दिसेल त्यावर क्लीक करावे.

● हाऊ डु आय क्लोज माय वाँलेट अकाऊंट हे आँप्शन सिलेक्ट करून घ्यावे.

● जर आपणास पैसे काढायचे असतील तर तिथे दिलेल्या क्लोज वाँलेट आ़ँप्शनवर क्लीक करायचे.

● यानंतर आपण विद ड्राँ वाँलेट बँलेन्स हा पर्याय निवडावा.अणि कनफरम डिअँक्टीव्हेट वाँलेट ह्या बटणावर क्लीक करायचे.

● यानंतर डिअँक्टीव्हेट वाँलेट वर क्लीक करायचे अणि शेवटी डन वर क्लीक करायचे आहे.

यानंतर आपल्या फोन पे वाँलेट मधील सर्व पैसै आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात.मग ते पैसे आपण बँकेत जाऊन सायबर कँफेमध्ये जाऊन तसेच एटीएम दवारे देखील काढु शकतो.

दुसरी पदधत -फोन पे वाँलेट मधुन अकाऊंट बंद तसेच डिलीट न करता वाँलेटमधून पैसे काढण्यासाठी

● आपल्याला अशा एका दुकानदार,सायबर कँफेवाल्याकडे जावे लागेल ज्याचे स्वताचे फोन पे वर बिजनेस अकाउंट आहे.

● मग आपल्याला आपल्या वाँलेटमधील रक्कम त्या व्यक्तीच्या खात्यावर ट्रान्सफर करावी लागेल तसे त्या दुकानदारास सांगुन द्यायचे की मी माझ्या वाँलेट मधील इतकी रक्कम तुझ्या खात्यावर ट्रान्सफर करतो अणि त्याबदल्यात तु मला तेवढी कँश दे असे त्याला सांगायचे.

याने आपल्याला वाँलेट अकाउंट पण डिलीट करावे लागत नही अणि आपले वाँलेटमधील पैसे पण मिळुन जात असतात.

Leave a Comment