इंटरनेट फ्राड आणि फोन स्कॅम पासून स्वतःला सुरक्षित करा – Types of internet fraud and prevention in Marathi

आँनलाईन फ्राँड स्कँम विषयी माहीती – Types of internet fraud and prevention in Marathi

मित्रांनो सध्याचे युग आँनलाईनचे असल्याने आता नोकरी व्यवसायापासुन तर आर्थिक देवाणघेवाणी खरेदी विक्री पर्यतचे सर्वच व्यवहार आँनलाईन घडुन येत आहे.
याने आपल्याला खुप फायदा देखील झालेला आहे यात कुठलीच शंका नाही पण मित्रांनो जिथे फायदे असतात तिथे काही तोटे देखील असतात जे आपणास माहीती असायला हवे.
आज आँनलाईन फ्राँडचे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.याला कारण आपण याच्याविषयी अवगत नसतो की हा फ्राँड कसा होतो?आपली पर्सनल बँक डिटेल यात कशी हँक केली जाते?
आपल्या सोबत देखील असा प्रकार घडु नये आपण ह्या आँनलाईन फ्राँडचे शिकार बनु नयेत यासाठी आज आपण आँनलाईन फ्राँडविषयी सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.

आँनलाईन फ्राँड म्हणजे काय?

इंटरनेटच्या माध्यमातुन झालेल्या कुठल्याही आर्थिक फसवणुकीला आँनलाईन तसेच इंटरनेट फ्राँड असे म्हणतात.
थोडक्यात आँनलाईन वेबसाइटवरून खरेदी तसेच इतर आर्थिक व्यवहार करताना,फेक ईमेल तसेच काँलमुळे जे काही अनैतिक कृत्य घडत असतात.
जसे की बँक डिटेल चोरीला जाणे,बँक खाते रिकामे होणे.क्रेडिट कार्ड डिटेल चोरीला जाणे पैशांसाठी फसवणुक यालाच आँनलाईन फ्राँड असे म्हणतात.

आँनलाईन फ्राँडचे प्रकार किती कोणते आहेत? यापासुन बचाव करण्याचे उपाय कोणते आहेत? – Types of internet fraud and prevention in Marathi

इंटरनेट फ्राड आणि फोन स्कॅम पासून स्वतःला सुरक्षित करा – Types of internet fraud and prevention in Marathi
फेक वेबसाईट घोटाळा

दूरस्थ प्रवेश मोबाइल घोटाळा-remote access mobile scam

यात फ्राँड करणारे हँकर्स हे एखादी फेक वेबसाइट तयार करत असतात.जी आपल्या गरजेनुसार असल्याने आपण तिला व्हिझिट करतो.
ज्यात आपल्याला एखादी लिंकवर क्लीक करायला तसेच अँप डाउनलोड करायला सांगितले जात असते.अणि मग ते अँप आपल्याकडुन आपल्या मोबाइल,लँपटाँप कंप्युटरला अँक्सेस करण्याची परवानगी मागत असते.
अणि आपण त्या अँपला परमिशन दिल्यावर तिला आपल्या मोबाइल लँपटाँप कंप्यूटर इत्यादी मधील सर्व डेटाचा अँक्सेस मिळत असतो.ज्यात आपली बँक डिटेल देखील असते.

See also  पी-एम-एल-ए कायदा म्हणजे काय?- PMLA meaning in Marathi

अशा फ्राँडपासुन वाचण्यासाठी उपाय –

 • म्हणुन आपण कुठल्याही अविश्वसनीय वेबसाइट वर जाऊन तिथे सांगितलेली अँप डाउनलोड करू नये किंवा कुठल्याही लिंकवर देखील जाऊ नये.
 • प्ले स्टोअरवरून देखील आपण अशाच अँप डाऊनलोड कराव्यात ज्या व्हेरीफाईड अणि ट्रस्टेड आहेत.याचसोबत आपण कुठल्याही अविश्वसनीय वेबसाइट वर आपली बँक डिटेल फील करणे टाळावे.
 • आपण आधी खात्री करावी की ती वेबसाइट किती जुनी आहे?ती ट्रस्टेड अणि जेन्युअन आहे का?मगच तिथे आपली बँक डिटेल आँनलाईन खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी फील करावी अन्यथा नाही.

फेक सर्विस वेबसाइट स्कँम –

हा सुदधा एक आँनलाईन फ्राँडचा प्रकार आहे ज्यात देखील एक आपल्या गरजेनूसार इंशुरन्सची तसेच जाँबशी संबंधित,एखाद्या सर्विस संबंधित फेक वेबसाइट डिझाईन केली जाते.
अणि जेव्हा आपण त्या वेबसाइट वर ती सर्विस घेण्यासाठी आपली बँक डिटेल फील करतो आपली सर्व बँक डिटेल स्कँमर्सकडुन हँक केली जाते.
अशा फेक वेबसाइट पासून बचावासाठी उपाय –
● आपण अशा वेबसाइट ज्याविषयी आपल्याला काहीही माहीती नसेल त्यावर कधीही आपली बँक डिटेल कुठल्याही आर्थिक व्यवहारासाठी शेअर करू नये.आधी नीट खात्री करावी की ती वेबसाइट रिअल ट्रस्टेड आहे की फेक.

आयकर परतावा घोटाळा- income tax refund scam –

यात एखाद्या फेक ईमेलवरून आपल्याला कळवले जाते की आपल्याला आयकर विभाग पैसे परत करते आहे ते मिळविण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर व्हिझिट करा
अणि मग त्या लिंकवर गेल्यावर आपली बँक डिटेल भरावयास सांगितले जाते जी भरून झाल्यानंतर आपली सर्व बँक डिटेल स्कँमर्सकडे जाऊन लागते.मग ते सहज त्या डिटेलचा वापर करून आपले बँक अकाऊंट रिकामे करू शकतात.
अशा फ्राँडपासुन वाचण्यासाठी उपाय –

 • जेव्हा आपल्याला असा एखादा पैसे रिफंड करण्याबाबद फेक ईमेल येईल आपण त्याकडे दुर्लक्ष करावे.त्यात दिलेल्या कुठल्याही लिंकवर जाऊन आपली बँक डिटेल फिल करू नये.
 • कारण आपले रिफंडचे पैसे हे कधीही इन्कम टँक्स डिपार्टमेंटकडुन आपल्या खात्यावर डायरेक्ट जमा होत असतात.
See also  एम सी क्यु फुलफॉर्म - MCQ full form in Marathi

केवायसी डिटेल अपडेट फ्राँड –

यात आपल्याला ईमेल करून सांगितले जाते की आपण आपले केवायसी अपडेट करावे यासाठी एक लिंक देखील दिली जाते.
यात जेव्हा आपण ह्या लिंकवर जातो अणि आपली बँक डिटेल मोबाइल वर आलेला ओटीपी टाकुन अपडेट करतो स्कँमर्स आपल्या खात्यावरील माहीती प्राप्त करून आपल्या खात्यातील पैसे काढुन घेत असतात.
अशा फ्राँडपासुन वाचण्यासाठी उपाय –

 • केवायसी अपडेट करताना आपली बँक डिटेल कधीही फिल करू नये.ज्याने आपल्या खात्यावरील पैसे कोणी तिर्हाईत व्यक्ती काढु शकेल.
 • अणि खुपच डाऊट असेल तर आपण हे खरे आहे की खोटे आहे आधी याची शहानिशा करावी मगच आपले बँक डिटेल शेअर करावे.
 • उदा,सीवीवी कोड,कार्डवरील नंबर,जन्मतारीख इत्यादी.

अतिशय सोपा पासवर्ड सेट करणे –

काही लोक पासवर्ड लक्षात ठेवायला अवघड जाते म्हणुन १२३४५ किंवा मोबाइल नंबर,जन्मतारीख घरातील व्यक्ती तसेच आपल्या नावाचा पासवर्ड मोबाइल लँपटाँप तसेच अकाऊंटला सेट करत असतात.
जो अंदाजे शोधुन काढुन क्रँक करणे फ्राँडर्स स्कँमर्सला खुप सोपे जात असते.
अशा फ्राँडपासुन वाचण्यासाठी उपाय –

 • आपला अकाऊंटचा मोबाइल तसेच लँपटाँपचा पासवर्ड कधीही अवघड सेट करावा.कोणीही सहज अंदाज लावू शकेल असा पासवर्ड कधीही सेट करु नये.

फेक युपीआय लिंक –

आज आपण प्रत्येक जण युपीआय लिंकदवारे पेमेंट करत असतो.ज्यात आपण आपला एक युपी आय आयडी बनवत असतो अणि त्याने दुसरया युपीआय आयडीवर आँनलाईन पेमेंट करत असतो.
पण आपण जर गुगल पे फोन पे यसारख्या विश्वसनीय अँप सोडुन दूसरया एखाद्या फेक बनावटी अँप्सवर जाऊन युपी आय आयडी जनरेट केला तर आपली सर्व बँक डिटेल फ्राँडर्सकडे जात असते.अणि ते सहजपणे आपले खाते रिकामे करू शकतात.इंटरनेट फ्राड आणि फोन स्कॅम पासून स्वतःला सुरक्षित करा – Types of internet fraud and prevention in Marathi
अशा फ्राँडपासुन वाचण्यासाठी उपाय –

 • कुठल्याही अनट्रस्टेड अँप्स वेबसाइट वर जाऊन तिथे आपला युपीआय आयडी जनरेट करू नये.
See also  173 कठीण इंग्रजी शब्द मराठी अर्थासह - 173 Difficult English Words With Marathi Meaning

लोन स्कँम –

गुगलवर सर्च केल्यावर आपल्याला अनेक अशा वेबसाइट दिसुन येतील ज्या आपणास लोन देण्याची खात्री देत असतात.
अणि मग लोन देण्याकरीता प्रोसेसिंग फीच्या नावाखाली मोठी रक्कम मागत असतात.अणि मग जेव्हा आपण लाखाचे लोन मिळविण्यासाठी ही २० ते ३० इत्यादी हजाराची रक्कम देत असतो.
अचानक हे फ्राँड पैसे घेऊन गायब होऊन जातात.त्यांचा काँल देखील लागत नाही.मग आपल्याला कळते की आपण फ्राँडचे शिकार झालो आहोत.

अशा फ्राँडपासुन वाचण्यासाठी उपाय –

 • आपण कधीही अशा फ्राँड वेबसाइटच्या तसेच अँप्सच्या जाळयात अडकु नये.आधी त्यांच्याविषयी तपास करावा मगच पुढची प्रोसेस करावी.
 • अणि कुठलीही रिअल लोन देणारी कंपनी आपल्याकडून अलग प्रोसेसिंग फी मागत नसते आपल्याला जे लोन मिळते त्यातुन ही फी कट होत असते.

आँनलाईन जाँब फ्राँड स्कँम –

इंटरनेट वर काही अशा वेबसाइट देखील आहेत ज्या आपणास घरबसल्या डेटा इंट्री कँप्चा इंट्रीचे काम देण्याचा दावा करतात.
अणि मग जेव्हा आपण अशा वेबसाइट वर जाऊन जाँबसाठी अँप्लाय करतो हे आपल्याला काँल करून आपली आधार कार्ड तसेच इतर बँक डिटेल मागत असतात.
अणि मग जे आपणास सात आठ दिवसांचे काही फेक वर्क देतात जे आपल्याकडुन ते पुर्ण देखील होऊ देत नही अणि मग खोटा स्टँम्प तयार करून आपण कामात कामचुकारपणा केल्यामुळे त्यांना इतक्या लाखाची रक्कम देणे लागतो.
असा दावा करतात आणि आपल्याकडुन लाखोंची मागणी करतात पैसे न दिल्यास पोलिसात तक्रार करण्याची धमकी देतात.
हा स्कँम घरबसल्या डेटा इंट्री वगैरे जाँब करू इच्छित महिला तसेच विदयार्थी वर्गासोबत अधिक केला जात आहे.

फेक सरकारी वेबसाइट स्कँम –

सरकारी वेबसाइटच्या नावाखाली यात एक फेक वेबसाइट तयार केली जाते
जिथे आपण जर आपली बँक डिटेल फिल करून लाँग इन केले तर आपली सर्व डिटेल ह्या स्कँमर्सकडे जाऊ शकते.अणि आपले खाते रिकामे होऊ शकते.
अशा फ्राँडपासुन वाचण्यासाठी उपाय –
आधी ती वेबसाइट फेक आहे की रिअल,ती वेबसाइट गर्वमेंट व्हेरीफाईड जेन्युअन आहे की नाही याची खात्री करावी मगच आपली डिटेल तिथे शेअर करावी.

बँक फ्राँडपासुन वाचण्यासाठी उपाय –
● बँकेच्या नावाने काँल करून आपली बँक डिटेल मागणारया फ्राँडसोबत आपली डिटेल कधीच शेअर करू नये.स्वता बँकेत जाऊन तपास करावा.
● ईमेलदवारे लिंक देऊन आपला बँक पासवर्ड डिटेल अपडेट करण्यास सांगणारया फ्राँडपासुन दुर राहावे.अशा खोटया ईमेल्सला बळी पडु नये.
● कुठल्याही हाँटेल रेस्टाँरंट यासारख्या ठिकाणी पेमेंट करायला आपली बँक डिटेल शेअर करताना आधी ती जागा किती सेफ आहे याची खात्री करावी.

ONLINE CYBER CRIME REPORTING PORTAL :घर बैठे करे साइबर क्राइम रिपोर्ट