विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व विकासासाठी ५ महत्वाच्या टिप्स Personality development tips for students

विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व विकासासाठी ५ महत्वाच्या टिप्स Personality development tips for students

पर्सनॅलिटी ही चांगले दिसणे, चांगले राहणीमान ठेवणे+चांगले कपडे परिधान करणे,व्यवस्थित केस विंचरणे यासारख्या कुठल्याही एक दोन गोष्टीने बनणारी बाब नसते.

आपण कशा पद्धतीने विचार करतो,आपली वागणुक कशी आहे?आपली बोलण्याची पद्धत यावरून आपले व्यक्तीमत्व कसे आहे हे ठरत असते.आपल्या व्यक्तीमत्त्वात असलेल्या हयाच गुणांमुळे आपण इतरांपेक्षा वेगळे ठरत असतो.

आपल्याला प्रत्येकाला वाटते की आपले व्यक्तीमत्व उठावदार अणि प्रभावी दिसायला हवे.लोकांनी आपल्याला जास्तीत जास्त महत्व द्यायला हवे कोणीही आपल्याकडे बघुन आपल्याला दुर्लक्षित करू नये.

पण असे आकर्षक प्रभावी व्यक्तीमत्व बनवण्यासाठी आपण काय करायला हवे कोणकोणत्या टिप्स फाॅलो करायला हव्यात हेच आपल्याला माहीत नसते.

ज्यामुळे आपल्याला आपल्या व्यक्तीमत्त्वात पाहीजे तसा विकास घडवून आणता येत नाही.

आजच्या लेखात आपण विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तीमत्त्वात विकास घडवून आणण्यासाठी कोणकोणत्या बाबी करायला हव्यात?कोणकोणत्या बाबी करणे टाळायला हवे हे जाणुन घेणार आहोत.

Personality development tips for students
Personality development tips for students

१) सकारात्मक विचार ठेवा –

कोणतीही गोष्ट करताना मी हे करू शकत नाही माझ्यातुन हे अजिबात होणार नाही असे न म्हणता सकारात्मक दृष्ट्या विचार करून स्वताला सांगायचे हे कार्य मी करू शकतो अणि मी करून दाखवणारच.

कुठल्याही अडी अडचणीत संकटात डोक्याला हात लावून बसणे सोडावे अणि ह्या अडचणीतुन संकटातून बाहेर पडण्यासाठी मी काय करू शकतो याचा विचार आपण करायला हवा.

आपल्याला आपल्यातील क्षमता अणि कमजोरी विषयी संपूर्ण माहित असायला हवे.जेणेकरून आपल्याला त्यात सुधारणा करता येईल.

आपण नेहमी स्वताला appreciate करायला हवे.स्वताविषयी सकारात्मक विचार ठेवायला हवे मी कुठल्याही कामाचा नाही,माझ्यातुन काहीच होत नाही असे स्वताविषयी असलेले नकारात्मक विचार डोक्यातुन काढुन टाकायला हवे.

कारण आपले विचार सकारात्मक असले तर कुठल्याही गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असला तर आपल्या वागण्यात बोलण्यात वर्तवणुकीत देखील सकारात्मकता झळकत असते.याने आपले व्यक्तीमत्व अधिक आकर्षक आणि प्रभावी बनते.

See also  पॅन कार्डचा फुलफाॅम काय होतो - Pan card Full form in Marathi

२) कुठल्या समारंभात,पार्टीत कार्यक्रमात जाताना कुठली वेशभूषा परिधान करावी हे समजुन घेणे –

कोणत्याही कार्यक्रमात,लग्न समारंभात,पार्टी वगैरे मध्ये जाताना आपण प्रसंगानुसार कपडे परिधान करायला हवे

यासाठी कुठल्या कार्यक्रम समारंभात आपण कोणते कपडे परिधान करायला हवे याचे आपल्याला उत्तम नाॅलेज असायला हवे.

कुठेही कशाही प्रकारचे कपडे परिधान करून गेले तर आपले व्यक्तीमत्व उठावदार प्रभावी आकर्षक दिसत नाही.अणि आपला इतरा़ंवर वाईट प्रभाव पडतो.

उदा, एखाद्या लग्न समारंभात जाताना कसे कपडे परिधान करायचे?पार्टीत जाताना कसे कपडे परिधान करायचे? काॅलेजला जाताना कसे कपडे परिधान करायचे हे आपणास माहीत असावे.

आपण नेहमी प्रसंगानुरूप कपडे परिधान करायला हवे.अणि आपल्या पर्सनॅलिटीला शोभुन दिसतील असे मॅचिंग कलरचेच कपडे आपण परिधान करायला हवे.

जे कपडे आपल्याला फिटिंग मध्ये व्यवस्थित बसतात असेच कपडे परिधान करायला हवे.काॅलेजात जाताना आपल्या पर्सनॅलिटीला शोभुन दिसेल असा टी शर्ट जिंज पॅन्ट परिधान करायला हवी.

३) वागण्या बोलण्याची तसेच चालण्याची पद्धत –

चालताना नेहमी आपले लक्ष समोर ठेवून चालावे.इतरांशी बोलताना रस्त्याने चालताना आपल्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास झळकायला हवा.

चालताना बसताना आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून सावधान स्थितीत चालावे बसावे झुकुन किंवा खाली मान घालून वृदध व्यक्तींसारखे चालु तसेच बसु नये.

बोलताना वागताना आपल्या बोलण्यात वागण्यात सकारात्मकता नम्रता झळकायला हवी.बोलताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला हवे याने आपला आत्मविश्वास झळकत असतो.

नेहमी कमी बोलायला हवे अणि जास्त ऐकायला हवे आपल्याला समोरची व्यक्ती काय बोलते आहे हे व्यवस्थित समजुन घेणे अधिक सोपे जाईल अणि आपल्याला त्याच्याशी उत्तमरीत्या संवाद साधता येईल

४) केस विचरण्याची पद्धत –

फॅशनच्या नावाखाली कसेही वेडेवाकडे पद्धतीने केस विंचरणे, विनाकारण केसाला कलर करणे टाळावे.

5) बाॅडी बनवणे -शरीर सुदृढ

बाॅडी बनवण्यासाठी आपण जिम जाॅईन करायला हवी रोज जिमला जायला हवे.

See also  पोस्ट आँफिस मधुन कर्ज कसे घ्यावे ?- How To Get Loan From Post Office In Marathi

आपले शरीर धष्टपुष्ट अणि मजबुत असेल तर आपले व्यक्तीमत्व अजुन जास्त उठावदार प्रभावी अणि आकर्षक दिसत असते.