एल आयसी एजंट कसे बनावे How to become lic agent

एल आयसी एजंट कसे बनावे How to become lic agent

एल आयसी एजंट बनण्यासाठी पात्रतेच्या अटी काय आहेत?

ज्यांचे १८ वर्षे पूर्ण आहे असे पुरूष तसेच महिला उमेदवार देखील एल आयसी एजंट बनण्यासाठी पात्र ठरतात.

एल आयसी एजंट बनण्यासाठी आपले किमान दहावी+बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

जे व्यक्ती शहरी भागात वास्तव्यास आहेत त्यांना शहरात एल आयसी एजंट बनुन काम करण्यासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अणि जे उमेदवार ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत असे उमेदवार दहावी उत्तीर्ण असुन देखील एल आयसी एजंट बनण्यासाठी पात्र ठरतात.

एल आयसी एजंट बनण्यासाठी कोणत्या महत्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असते?

एल आयसी एजंट बनण्यासाठी आपल्याकडे पुढील काही पाच महत्वाचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

१)आधार कार्ड

२) ड्रायव्हिंग लायसन्स

३) पॅनकार्ड

४) शैक्षणिक प्रमाणपत्र (दहावी तसेच बारावी उत्तीर्ण सर्टिफिकेट)

५) दोन पासपोर्ट साईज फोटो

How to become lic agent
How to become LIC agent

एल आयसी एजंट बनण्यासाठी काय करायचे?

सर्वप्रथम आपणास‌‌ आपल्या राहत्या शहरातील गावातील एल आयसी ब्रांच मध्ये जावे लागेल.

आपल्याला आपल्या शहरात गावात कोणत्या ठिकाणी एल आयसी ब्रांच आहे हे माहीत नसल्यास आपण गुगलवर near by lic branch office असे सर्च करून आपल्या जवळील एल आयसी ब्रांचचा पत्ता इंटरनेट द्वारे मिळवू शकतो.

See also  ब्रॅण्ड प्रमोटरचे काम काय असते त्यांची भुमिका तसेच जबाबदारी काय असते?Brand promoter job description Duties roles and responsibilities

गुगल वरून पत्ता प्राप्त केल्यानंतर आपल्या जवळील एल आयसी ब्रांच मध्ये जायचे अणि तेथील एल आयसी डेव्हलपमेंट आॅफिसरला भेटायचे.

डेव्हलपमेंट आॅफिसरची भेट न झाल्यास आपण तेथील ब्रांच मॅनेजर सोबत देखील याबाबत भेट देऊन बोलु शकतो की मला एल आयसी एजंट बनायचे आहे त्यासाठी काय करावे लागेल.

मग तेथील एल आयसी डेव्हलपमेंट आॅफिसर आपली मुलाखत घेतील मुलाखतीत आपल्याला काही प्रश्न देखील विचारतील.

यात आपणास आपण सध्या काय काम करतो आहे?या आधी आपण इतर कुठे एल आयसी एजंट म्हणून काम केले आहे किंवा नाही.आपल्याला एल आयसी एजंट म्हणून काम करण्याचा अनुभव आहे किंवा नाही.

आपल्याला फुलटाईम एल आयसी एजंट म्हणून काम करायचे आहे का पार्ट टाइम इत्यादी प्रश्न विचारले जातात.

आपली शैक्षणिक पात्रता बघितली जाते.आपण कुठे राहतो आपला सध्याचा पत्ता काय आहे?आपल्या कुटुंबातील इतर व्यक्ती काय करतात?

एल आयसी एजंटचे काम काय असते? त्यांचे जाॅब प्रोफाइल काय असते?एल आयसी एजंटच्या कामा विषयी आपल्याला काय माहित आहे इत्यादी प्रश्न विचारले जातात.

आपली मुलाखत घेतल्यानंतर एल आयसी डेव्हलपमेंट आॅफिसर यांना वाटले की आपण एल आयसी एजंट बनण्यासाठी पात्र आहे तेव्हा ते आपल्याला एल आयसी एजंट बनण्याची पुढील प्रक्रिया काय आहे हे सांगत असतात.

एल आयसी एजंट बनण्यासाठी पात्र ठरल्यानंतरची प्रक्रिया –

१)रेजिस्ट्रेशन –

एल आयसी एजंट बनण्यासाठी पात्र ठरल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला एल आयसी एजंट म्हणून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.नोंदणी प्रक्रियेत 150 ते 200 रूपये रेजिस्ट्रेशन फी भरावी लागते.

२) ट्रेनिंग क्लासेस-

नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एल आयसी एजंट म्हणून कोणकोणते काम करावे लागते हे समजावून सांगण्यासाठी प्रशिक्षण क्लासेस घेतले जातात.याचे 150 ते 200 रूपये आपल्याकडुन घेतले जातात.

हे क्लासेस आॅनलाईन किंवा आॅफलाईन कुठल्याही एका माध्यमातून ५० तासांच्या कालावधीसाठी घेतले जाऊ शकतात.प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आपणास एक प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात येत असते.

See also  साऊथ इंडियन बॅकेत प्रोबेशनरी क्लार्क पदासाठी भरती सुरू - South Indian bank recruitment in Marathi

३) आय आर डीए परीक्षा –

  • ट्रेनिंग घेऊन झाल्यानंतर आपल्याला आय आर डीए(insurance regulatory development authority of India) ही 50 गुणांची परीक्षा कंप्युटरवर द्यावी लागते.
  • ट्रेनिंग मध्ये जे काही शिकवले जाते त्यावरच सर्व प्रश्न ह्या परीक्षेत विचारले जातात.
  • यात ५० एमसी क्यु प्रश्न विचारले जातात.एका प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले असतात.परीक्षेत एका प्रश्नाला एक गुण दिला जातो.
  • परीक्षेत कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते.ही परीक्षा आपण मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही पैकी कुठल्याही एका भाषेत देऊ शकतो.ह्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना ५० पैकी १८ ते २० इतके गुण प्राप्त करणे आवश्यक असते.
  • परीक्षेचा निकाल आॅनलाईन पदधतीने लगेच पेपर झाल्यावर आपणास दिसुन जातो.परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा फी भरून ही परीक्षा देता येते.
  • आय आर डीए परीक्षेची फी 500 ते 600 रूपये दरम्यान असते.
  • ह्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर आपण एक प्रोफेशनल एल आयसी एजंट बनतो.आपल्याला एल आयसी कडुन एक नियुक्ती पत्र अणि एजंट कोड देखील दिला जातो.
  • याचसोबत डेव्हलपमेंट आॅफिसर आपल्याला एल आयसीच्या वेगवेगळ्या इन्शुरन्स प्लॅन विषयी माहिती देत असतात.
  • कोणकोणत्या पाॅलिसी उपलब्ध आहेत त्यांचा प्रिमियम किती असतो कोणत्या इन्शुरन्स प्लॅन साठी कोणता फाॅम भरणे आवश्यक आहे.
  • सदर पाॅलिशा कस्टमरला सेल कशा करायच्या कस्टमरला पाॅलिसी विकत घेण्यासाठी कन्व्हेयन्स कसे करायचे ही सर्व माहिती डेव्हलपमेंट आॅफिसर एल आयसी एजंटला देतो.

एल आयसी डेव्हलपमेंट आॅफिसरचे काम काय असते?

एल आयसी एजंट बनल्यावर आपणास आपल्या शहरातील गावातील ब्रांच मधील एल आयसी डेव्हलपमेंट आॅफिसर मार्गदर्शन करीत असतात.

एल आयसी एजंटला दिल्या जाणाऱ्या सर्व ट्रेनिंग डेव्हलपमेंट आॅफिसर कडुनच दिल्या जातात.कुठला फाॅम कसा भरायचा हे देखील एल आयसी एजंटला डेव्हलपमेंट आॅफिसर सांगत असतात.

एल आयसी एजंटचे काम काय असते?

एल आयसी एजंटचे मुख्य काम हे कंपनीच्या पाॅलिसी विकणे हे असते.हया सर्व विकलेल्या प्रत्येक पाॅलिसी मागे काही टक्के कमिशन एल आयसी एजंटला प्राप्त होते.

See also  इंडियन बँक एसओ २०३ रिक्त जागांसाठी भरती । Indian Bank SO Vacancies 2023 Apply Online

एल आयसी एजंटला जाॅईन झालेल्या महिन्यापासून वर्षभरात बारा पाॅलिसीचे टार्गेट दिले जाते.

हे टार्गेट एल आयसी एजंटला जाॅईन झालेल्या महिन्यापासून बारा महिन्यांत पुर्ण करावे लागते किंवा या जागी आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी तो एक लाखापर्यंतचा प्रिमियम जमा करू शकतो.

एल आयसी एजंटच्या अंगी कोणते कला कौशल्य असणे आवश्यक आहे?

एल आयसी एजंटला लोकांची गरज ओळखून त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांना वेगवेगळ्या इन्शुरन्स पाॅलिसी दाखवून सेल करता येणे आवश्यक आहे.

एल आयसी एजंटला कस्टमरला एल आयसीचे वेगवेगळे प्लॅन व्यवस्थीत समजावून सांगता आले पाहिजे.कस्टमरला पाॅलिसी विकत घेण्यासाठी कन्व्हेयन्स करता आले पाहिजे.

एल आयसी एजंटला कमिशन किती प्राप्त होते?

एल आयसी मध्ये तीन प्रकारचे प्लॅन असतात या तिघांचे एल आयसी एजंटला मिळणारे कमिशन वेगवेगळे असते.

१)इंडोमेंट प्लॅन –

यात पहिल्या वर्षी एल आयसी एजंटला २५ टक्के कमिशन प्राप्त होते.म्हणजे समजा एखाद्या एल आयसी एजंटने एक पाॅलिसी असो किंवा १० त्याचे कुठल्याही एका प्लॅन मध्ये एक लाखापर्यंत प्रिमियम जमा केले आहे.यात एल आयसी एजंटला एक लाखाचे २५ टक्के कमिशन म्हणजे २५ हजार इतके कमिशन मिळते.

याचसोबत एल आयसी कडुन त्याला ४० टक्के कमिशन बोनस देखील मिळत असते.

यानंतर दुसरया अणि तिसरया वर्षी एल आयसी एजंटला ७.५ टक्के इतके कमिशन मिळत असते.

यानंतर चौथ्या वर्षापासून शेवटपर्यंत जो पर्यंत पाॅलिसी धारक प्रिमियम जमा करेल तोपर्यंतच एल आयसी एजंटला पाच टक्के कमिशन प्राप्त होते.पाॅलिसी धारकाने प्रिमियम भरणे बंद केल्यास एल आयसी एजंटला कमिशन मिळणे देखील बंद होते.

२) मनी बॅक प्लॅन-

यात पहिल्या वर्षी एल आयसी एजंटला २० टक्के कमिशन प्राप्त होते.म्हणजे एका लाखाचे प्रिमियम एखाद्या प्लॅन मध्ये जमा केल्यावर त्याला २० हजार रुपये कमिशन पहिल्या वर्षी मिळते.

याचसोबत एल आयसी कडुन त्याला ४० टक्के कमिशन बोनस देखील मिळत असते.यानंतर दुसरया अणि तिसरया वर्षी एल आयसी एजंटला ७.५ टक्के इतके कमिशन मिळत असते

३) सिंगल प्रिमियम प्लॅन –

सिंगल प्रिमियम प्लॅन मध्ये एल आयसी एजंटला दोन टक्के कमिशन प्राप्त होते.