डेटा साइंटिस्ट कसे बनावे?- How to become data scientist

डेटा साइंटिस्ट कसे बनावे?how to become data scientist

सध्या डेटाच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी संधी विपुल प्रमाणात वाढत आहे.ज्यामुळे डेटा साइंटिस्टची मागणी देखील बाजारात दिवसेंदिवस अधिक वाढत आहे.

डेटा साइंटिस्टची आवश्यकता मोठमोठ्या दिग्दज कंपन्यांमध्ये असते.

एवढेच नव्हे तर मोठमोठ्या ईकाॅमर्स इंडस्ट्री,स्टार्ट अप बिझनेसमध्ये देखील उद्योग व्यवसायाचे कस्टमरचे विश्लेषण करण्यासाठी यांची खुप आवश्यकता असते.

आजच्या लेखात आपण डेटा साइंटिस्ट कसे बनायचे? डेटा साइंटिस्ट बनण्यासाठी आपल्याकडे काय शैक्षणिक पात्रता कोणते कौशल्य असणे आवश्यक आहे इत्यादी गोष्टी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

डेटा साइंटिस्ट कोण असतो?डेटा साइंटिस्टचे काम काय असते?

डेटा साइंटिस्ट हा एक डेटा तज्ञ तसेच विशेषज्ञ असतो.डेटा साइंटिस्ट हा संरचित तसेच असंरचित डेटाच्या मोठमोठ्या सेटसला सर्वप्रथम संग्रहित करीत असतो.अणि मग त्या संग्रहित केलेल्या डेटाचे विश्लेषण करत असतो.

हया सर्व कामांसाठी एका डेटा साइंटिस्टला मॅथमॅटिक्स, स्टॅटिसटिक्स,कंप्युटर सायन्सचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.

अणि मग जी काही माहिती संग्रहित केलेल्या कंपनीच्या सर्व डेटामधून त्याच्या विश्लेषणातुन समोर येत असते.त्यानुसार कुठलीही कंपनी आपल्या बिझनेस साठी नवनवीन स्ट्रॅटेजी तयार करीत असते.

डेटा साइंटिस्टचे मुख्य काम हे म्हणजे कुठल्याही कंपनीच्या कस्टमरचा जो काही संरचित तसेच असंरचित डेटा असतो त्याला कलेक्ट करायचे अणि मग त्या संग्रहित केलेल्या असंरचित डेटाला एका उपयुक्त स्वरूपात आणायचे.

See also  सरकारी नोकरी प्राप्त करण्यासाठी करावयाचे महत्वाचे उत्तम कंप्यूटर कोर्स -Best computer courses for government job

अणि मग त्याडेटाचे योग्य रीत्या विश्लेषण करून त्यातुन कंपनीला आपल्या व्यवसाय उद्योगात वाढ करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व महत्वाची माहिती प्राप्त करायची.

जेणेकरून त्या कंपनीला आपल्या व्यवसाय धोरणात आवश्यक ते बदल घडवून आणत अधिक प्रगती करता येईल.आपल्या टार्गेट कस्टमर्सला जाणुन घेता येईल.

डेटा साइंटिस्ट कुठल्याही कंपनीला आपल्या प्रतिस्पर्धी पेक्षा व्यवसाय उद्योगात अधिक वाढ अणि अधिक प्रगती करण्यासाठी मदत करतात कंपनीला त्यांच्या टार्गेट कस्टमर्सला जाणुन घेण्यास मदत करीत असतात.

डेटा साइंटिस्ट बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते?

डेटा साइंटिस्ट बनण्यासाठी आपल्याकडे मॅथमॅटिक्स, स्टॅटिसटिक्स,बिझनेस स्टडीज,फायनान्स,इकाॅनाॅमिक, कंप्युटर सायन्स,इत्यादी मध्ये बॅचलर डिग्री प्राप्त असणे आवश्यक आहे.

याचसोबत आपण मोठ्या कंपनीत चांगली जाॅबची संधी प्राप्त होण्यासाठी एखाद्या कंपनीत इंटर्नशीप देखील करू शकतो.

समजा आपल्याकडे यात मास्टर डिग्री किंवा डाॅक्टरेंट डिग्री असेल तर आपल्याला एका मोठ्या दिग्दज कंपनीत डेटा साइंटिस्ट म्हणून चांगल्या पगाराची नोकरी मिळु शकते.आपल्याला अधिक उत्तम करीअरची संधी प्राप्त होऊ शकते.

डेटा साइंटिस्ट बनण्यासाठी आपण कोणकोणते कोर्स करू शकतो?

आज दिवसेंदिवस उद्योग व्यवसायांमध्ये वाढ करण्यासाठी,अधिक प्रगती करण्यासाठी डेटा साइंटिस्टची मागणी बाजारात कंपन्यांकडून वाढत असल्याने ह्या करिअर क्षेत्राचा स्कोप देखील आता वाढत आहे.

ज्यामुळे वेगवेगळ्या संस्था देखील डेटा साइंटिस्ट बनण्यासाठी आपणास बाजारात विविध प्रकारचे कोर्स उपलब्ध करून देत आहेत. उपलब्ध असलेले डेटा साइंटिस्टचे काही महत्वाचे कोर्स –

उपलब्ध असलेले डेटा साइंटिस्टचे काही महत्वाचे कोर्स –

१)बी एस सी इन डेटा सायन्स –

हा तीन वर्षे इतक्या कालावधीचा फुल टाईम कोर्स आहे. कंप्युटर सायन्स,आर्टिफिशियल इंटलिजन्स,बिझनेस अॅनेलिटिक्स ह्या मध्ये याचा समावेश होतो.

बीएससी इन डेटा सायन्स करीता प्रवेश घेण्यासाठी आपले १२ वी सायन्स विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.यात फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स ह्या तिन्ही विषया़ंचा समावेश असणे आवश्यक आहे.

See also  मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना २०२० - (PM KUSUM Scheme online Maharashtra )

मोठमोठ्या टेक कंपनी, मार्केट रिसर्च कंपनी,एनर्जी सेक्टर इत्यादी मध्ये हया कोर्सला खुप डिमांड आहे.

हया कोर्समध्ये आपणास मशिन लर्निग,क्लाउड कंप्युटिंग, डेटा व्हिज्युअलाईझेशन, वेगवेगळ्या आॅपरेटिंग सिस्टम प्रोग्राम लॅग्वेज इत्यादी गोष्टी देखील शिकवल्या जातात.

बीएससी इन डेटा सायन्स हा कोर्स करण्यासाठी भारतातील काही नामांकित संस्था –

इंद्रप्रस्थ इंस्टीटयुट आॅफ टेक्नाँलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट नवी दिल्ली

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हार्डवेअर टेक्नाँलॉजी लिमिटेड नवी दिल्ली

एपी एल एल सेंटर नवी दिल्ली

बीएसी इन डेटा सायन्स कोर्स करण्यासाठी लागणारी फी –

बीएससी इन डेटा सायन्स हा कोर्स करण्यासाठी आपणास तीन ते चार लाख इतका खर्च येऊ शकतो.

एम एस सी इन डेटा सायन्स हा कोर्स करण्यासाठी भारतातील काही नामांकित संस्था –

बीएसी इन डेटा सायन्स हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्या नाॅलेज मध्ये अधिक वाढ होण्यासाठी तसेच आपल्या फिल्डचे एक्सपर्ट बनण्यासाठी आपण एम एस सी इन डेटा सायन्स देखील करू शकतो.

याने आपल्याला करीअरचे बेस्ट आॅप्शन प्राप्त होत असतात.मोठया कंपनीमध्ये चांगले सॅलरी पॅकेज प्राप्त होते.

एम एस सी इन डेटा सायन्स हा कोर्स करण्यासाठी आपले बीएससी इन कंप्युटर सायन्स, बीएससी इन मॅथमॅटिक्स, बीएससी इन स्टॅटिसटिक्स,बीई/बीटेक इत्यादी पैकी कुठलीही एक बॅचलर डिग्री प्राप्त करणे आवश्यक आहे.

एम एस सी इन डेटा सायन्स करण्यासाठी भारतातील काही नामांकित संस्था –

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मंगलोर

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वारंगल

युनिव्हसिर्टी आॅफ हैदराबाद

डेटा साइंटिस्ट बनण्यासाठी आपल्या अंगी कोणकोणते कला कौशल्य असणे आवश्यक आहे?

आपणास वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग लॅगवेजचे नाॅलेज असायला हवे.विशेषकरून पायथाॅनचे.

मशिन लर्निग मॅथमॅटिक्स स्टॅटिसटिक्स इत्यादी गोष्टींचे नाॅलेज असायला हवे.

उपलब्ध डेटा मधून उत्तर शोधता येण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे.

डेटा साइंटिस्ट बनल्यावर आपणास कोणकोणत्या ठिकाणी नोकरी करता येते?

डेटा साइंटिस्ट बनल्यावर आपण टेलिकाॅम इन्शुरन्स,बॅकिंग, फायनान्शिअल सर्विस इत्यादी क्षेत्रात नोकरी करू शकतो.

See also  इन्साईड सेल्स अणि आऊट साईड सेल्स म्हणजे काय? Inside sales and outside sales information

डेटा साइंटिस्ट बनल्यावर कोणकोणत्या पदावर आपणास काम करता येते?

१) डेटा अॅनॅलिस्ट

२) डेटा इंजिनिअर

३) मशिन लर्निग इंजिनिअर

४) डेटा साइंटिस्ट

डेटा साइंटिस्ट पदावर भरती करणारया कंपन्या –

अॅमेझाॅन, पेटीएम,ओरॅकल,पेपाल इत्यादी मोठमोठ्या कंपन्या डेटा साइंटिस्ट पदावर मोठ्या प्रमाणात भरती करीत असतात.

डेटा साइंटिस्ट बनल्यावर वेतन किती प्राप्त होते?

डेटा साइंटिस्ट बनल्यावर आपणास वेतन किती प्राप्त होईल हे आपल्या स्कील अनुभव तसेच जाॅब लोकेशन वरून ठरत असते.

परदेशात डेटा साइंटिस्टला भारतातील डेटा साइंटिस्ट पेक्षा अधिक वेतन दिले जाते.परदेशात डेटा साइंटिस्टला महिन्याला तीन ते चार लाख इतके सुरूवातीला वेतन दिले जाते.

भारतात डेटा साइंटिस्ट बनल्यावर आपणास महिन्याला ३० ते ४० हजार इतके वेतन सुरूवातीला दिले जाते अणि नंतर अनुभव स्कील नुसार यात वाढ केली जाते.