ESR test म्हणजे काय? ESR test information
ईएस आर टेस्टचा फुलफाॅम Erythrocytes sedimentation test असा होत असतो.ईएस आर टेस्ट ही एक रूटीन रक्तचाचणी परीक्षा असते.यालाच सेडरेट तसेच सेडीमेंटेशन रेट असे देखील म्हटले जाते.
यात इरीथ्रोसाईट सेडीमेंटेशन रेट म्हणजेच आरबीसी आपल्या शरीरात खालच्या भागात किंवा तळाशी किती वेळात बसतात.
ह्या टेस्टमुळे आपणास हे जाणुन घेता येते की आपल्या शरीरात एखादी सुज जळजळ किंवा कुठल्याही प्रकारचे व्हायरल इंन्स्पेक्शन किंवा आजार आहे किंवा नाही.
ही टेस्ट केल्याने आपणास हे लक्षात येते की आपल्या शरीरात कुठल्याही प्रकारची जळजळ inflammation होते आहे किंवा नाही.
पण आपल्याला कुठल्या प्रकारचा आजार झाला आहे हे ह्या टेस्ट मधून आपणास समजत नाही.आपल्याला कोणता आजार झाला आहे हे जाणून घ्यायला आपणास दुसरी एक वेगळी टेस्ट करावी लागते.
ई एसआर टेस्ट दवारे आपण फक्त हे जाणुन घेऊ शकतो की जो आजार आपणास झाला आहे तो आपल्या शरीरात किती विकसित झाला आहे.कुठपर्यत पोहोचला आहे.
ई एसआर टेस्ट मध्ये आपली ईएस आर व्हॅल्यु नाॅरमल पेक्षा अधिक आढळून आल्यास डाॅक्टर आपल्याला ह्या आजारा विषयी जाणुन घेण्यासाठी अजुन एक टेस्ट करावयास सांगत असतात.
इरीथ्रोसाईट सेडीमेंटेशन रेट हे एक असे रेट असते.ज्यामध्ये इरीथ्रोसाईट एका anticoagulated ब्लड सॅपल मध्ये सेटल केले जात असतात.
कोणत्या आजारात आपल्या शरीरातील ईएस आरची पातळी वाढत असते?
गर्भावस्थेत प्रेगनेंसी दरम्यान आपल्या शरीरातील ईएस आरची पातळी वाढत असते.
जेव्हा आपणास अॅनिमियाची समस्या असेल म्हणजे आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर अशा परिस्थितीत देखील आपली ई एस आर पातळी वाढत असते.
जेव्हा आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असते अणि आपल्या शरीरातील आरबीसी मध्ये वाढ झाली आहे तेव्हा देखील आपल्या शरीरातील ईएस आरची पातळी वाढत असते.
जळजळीचा रोग झाल्यास देखील आपल्या शरीरातील ईएस आरची पातळी नाॅरमल वरून कमी होत असते.क्षयरोग झाल्यावर तसेच ब्लड कॅन्सर झाल्यावर देखील ई एसआरची पातळी वाढत असते.
ई एसआरची नाॅरमल रेंज किती असते? ESR test normal range
- पुरूषांमध्ये 50 वर्षाच्या खालील व्यक्तींसाठी याची नाॅरमल रेंज 0 ते 15 एम एम पर हवर इतकी असते.50 वर्षाच्या वरील पुरूषांसाठी याची नाॅरमल रेंज 0.20 एम एम पर हवर इतकी असते.
- महिलांमध्ये 50 वर्षाच्या खालील महिलांमध्ये याची नाॅरमल रेंज 0 ते 20 एम एम पर हवर इतकी असते अणि महिलांमध्ये 50 वर्षाच्या वरील महिलांसाठी 0 ते 30 एम एम पर हवर असते.
- लहान बाळामध्ये याची नाॅरमल रेंज 2 एम एम पर हवर इतकी असते.बारा वर्षे पर्यंतच्या मुलांमध्ये 2 ते 13 एम एम पर हवर इतकी याची नाॅरमल रेंज असते.
ईएस आर टेस्ट कोणत्या पद्धतीने केली जाते?
ईएस आर टेस्ट ही खालील दिलेल्या चार पद्धतीने केली जाते.
1)westergren method-
ह्या टेस्टमध्ये हे बघितले जाते की लाल रक्तपेशी ह्या वेसटर ग्रीन टयुब मध्ये एका तासात किती खाली जातात याचे सरासरी प्रमाण चेक केले जाते.
2) wintrobe method
3) modified westergren method
4) automated method
ई एस आर टेस्ट प्रक्रिया –
सर्वप्रथम आपणास वेसटरग्रीन टयुब मध्ये रक्ताचा नमुना झिरो मार्कपर्यत घ्यायचा आहे.हा झिरो मार्क वरच्या बाजूला असतो.
यानंतर वेसटरग्रीन टयुब मध्ये घेतलेल्या रक्ताच्या नमुन्याला न सांडता वेसटरग्रीन रॅक तसेच स्टॅड वर फिक्स करायचे आहे.
यानंतर स्टाॅप वाॅचवर एक तासाचा अलार्म सेट करून स्टाॅप वाॅच स्टार्ट करून घ्यायचे आहे.एक तासानंतर आपणास आपला प्लाझ्मा लेव्हल चेक करायचा आहे.एक तासानंतर जी काही रिडींग दिसुन येईल तोच आपल्या ईएस आर टेस्टचा रिपोर्ट असतो.
ई एस आर टेस्ट साठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते?
ई एस आर टेस्ट करीता खालील दिलेल्या बाबी आवश्यक असतात.
1) anticoagulated blood sample
2) westergren rack
3) westergren tube
4) stopwatch
5) ESR sucking ball