आंब्याचे औषधी गुणधर्म – Mango Health Benefits Marathi

Mango Health Benefits Marathi

आंब्याचे औषधी गुणधर्म –

भारतात जगाच्या ४६ टक्के आंबा उत्पादन होते. कोकणातील रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबा पिकतो. या चार जिल्ह्यांत बऱ्याच प्रमाणात प्रक्रिया प्रकल्प आहेत.

आंबा म्हटला की, आधी हापूस डोळ्यापुढे येतो. आंब्याच्या ५५० जाती भारतात आहेत. परंतु हापूस, केशर, तोतापुरी या जातीच्या आंब्यांवरच प्रक्रिया केली जाते. हापूस आंब्यापासून पल्प, लोणची, मुरांबे, आमचूर पावडर, आंबावडी, आंबा मावा, कैरी. कछुदा आदी अनेक पदार्थ बनविले जातात.

मात्र, जगात सर्वाधिक आमरसाला आहे. त्यापासून बर्फी, मिल्कशेक, ज्यूस, आइस्क्रीम, पेढे आदी लोकप्रिय पदार्थ बनतात. जॅम, चीज आणि बेकरी उत्पादनांमध्येही आमरसाचा वापर करतात.

भारतातून मोठ्या प्रमाणात आमरस निर्यात होतो. २००६-०७ च्या उपलब्ध आकडेवारीनुसार १.५६ लाख टन आमरस निर्यात झाला होता. हापूस व अन्य आंब्यांना वैद्यकीयदृष्ट्याही महत्त्व आहे.

आंब्यात प्रामुख्याने ‘अ” जीवनसत्त्व असते. आमरस वातपित्तताशक, रुचिकारक, बलदायक, वीर्यवर्धक आणि पाचक आहे.

पूर्ण तयार झालेला आंबा झाडावरून उतरवल्यावर तो रायपनींग चेंबर किंवा नैसर्गिकरीत्या पिकविण्यास ठेवला जातो. साधारणत: ८ ते १० दिवसांनी स्टार्चचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होऊन आंबा पिकला असे समजावे. त्यानंतर हा आंबा प्रक्रिया केंद्रात आणला जातो.

त्या ठिकाणी नासका व खराब आंबा काढून चांगला आंबा स्वच्छ धुतला जातो. त्याची साल काढन ते आंबे पल्परमध्ये टाकले जातात.

बाजूला कोयी व दुसऱया बाजूला आमरस बाहेर पडतो. कोयी नर्सरीसाठी व सालपटे कंपोस्ट खतासाठी उपयोगात येतात. आमरस १०० अंश सेल्सिअसपर्यंत उकळल्यानंतर तो यांत्रिक पद्धतीने डब्यांमध्ये भरला जातो. डबे स्टरलायसिंग करण्यासाठी ९० ते १०० अंश सेल्सिअस पाण्यात तापवले जातात. थंड करून डबे लेबलिंगसाठी पाठवले जातात. याचप्रमाणे २२० लिटर आमरसाची बॅरल भरून मोठ्या कंपन्यांना ज्यूससाठी निर्यात केला जातो.

हापूस आंबा हवाबंद डब्यातील मुख्य घटक असल्याने आंब्याच्या दरावर डब्याचा दर ठरतो. तोतापुरी व केशरपेक्षा हापूसचा दर अधिक असल्याने हापूससाठीचा डबा महाग असतो. त्यात साखर व आमरस असे दोन घटक असतात. डबे रिफॉर्मिग करण्यासाठी त्यासाठी यंत्रसामग्री घेणे आवश्यक असते. काही वेळे चांगली प्रत नसलेला व प्युअर हापूस आमरस नसलेला डबा बाजारात मिळतो व खूप स्वस्त असतो. निर्यातीसाठी बाजारात आणण्यासाठी व्यापाऱ्यांची गरज असते.

See also  मधुमेहाची लक्षणे-Diabetes Symptoms In Marathi

या उद्योगातील सुमारे १ हजार लहान व ५७० मोठे व्यापारी भारतात आहेत. इंटरनेट सुविधेमुळे मार्केटिंग आता काहीसे सुलभ झाले आहे.

आंबा औषधी गुणर्धम – Mango Health Benefits Marathi

आंबा हे फळ आरोग्यवर्धक आहे.त्याचे औषधी गुणर्धम अनेक रोगांवर उपयुक्त आहेत. आंब्याचे आयुर्वेदात अनेक उपयुक्त औषधी गुणधर्म सांगितले आहेत. पिकलेल्या फळांमध्ये वात व पित्तावर गुणकारी, पाचक, थंड, शक्तिवर्धक गुणधर्म आहेत.

आंब्याच्या कच्च्या फळामध्ये दाह कमी करणारे, अपचन दूर करणारे, रक्तपित्तावर उपयुक्त गुण आहेत. कोयीतला मगज वातावर खोकल्यावर, मूत्राशयाच्या आजारावर उपयुक्त आहे. आंब्याचा मोहोर (फुले) वातावर, मलावरोधावर उपयुक्त असून खोकला,कफावरही गुणकारी आहे.

कोय उलटी, अतिसार, हदयविकारावर गुणकारी आहे. तर साल मलावरोध, वात, पित्त खोकल्यावर गुणकारी आहे. कोयीच्या मगजापासून काढलेले तेल खोकला, वात आणि तोंडाचे रोग यावर उपयुक्त असून हे तेल स्वादिष्ट असते.

 • कोयीतील मगजापासून काढलेले तेल केसांना लावल्यास केस लवकर पांढरे होत नाहीत. शिवाय त्यांची गळती थांबते.
 • आंब्याची ४0 ग्रॅम पाने ४०0 मिली. पाण्यात उकळून चार भाग करून हळूहळू प्याल्यास कंठस्वर सुधारतो.
 • पक्क आंबा थोडासा उकळून खाल्ला तर कोरडा खोकला कमी होतो.
 • आंबा फळांची साल आणि पाने यांचा लगदा तोंडात धरल्यास अगर चूळ भरल्यास दात व हिरड्या मजबूत होतात.
 • पिकलेल्या आंब्याचा ताजा रस २५० ग्रॅम, गाईचे धारोष्ण दूध, ५० मिली., चमचाभर आल्याचा रस काचेच्या भांड्यात घुसळा. हा रस दोन-तीन आठवडे प्याल्यास डोकेदुखी, डोके जड होणे, डोळ्यांची खाज, अंधाऱ्या येणे आदी त्रास थांबतो. यकृतासाठी हा रस गुणकारी असतो.
 • आंब्याची कोवळी पाने सावलीत वाळवून घेतल्यास मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुणकारी ठरतात.
 • आंब्याच्या पाल्याचा, मोहोराचा धूर केल्यास मच्छर होत नाहीत. गर्भवती मातांना रस अगर पन्हे वरचे वर दिल्यास फायद्याचे ठरते. जुन्या कोयीतील मगज ४-४ ग्रॅम मधातून जेवण्याच्या अगोदर तासभर गर्भवर्तीनी खावा.
 • कोवळी पाने आठ-दहा, दोन-तीन काळी मिरी पाण्यात घोटून तयार केलेली गोळी खाल्ल्यास कोणत्याही औषधाने न थांबणारी उलटी बंद होते. मोहोराचा काढा अतिसार, रक्तदोष, मळमळ, दाह, पित्त यावर गुणकारी आहे.
 • आंब्याचा कोवळा पाला तोडल्यानंतर निघणारा स्राव डोळ्यांना लावल्यास नेत्रविकार नष्ट होतात.
 • आंब्याची झाडावरच पिकलेली पिवळी ११ पाने लिटरभर पाण्यात १-२ विलायची घालून अर्धा लिटर पाणी होईपर्यंत उकळावे. ते उतरवून त्यात साखर आणि चहा पावडर घालून केलेला चहा प्यायल्यास शरीरातल्या सर्व अवयवांना तरतरी येऊन शक्ती मिळते.
 • कोयीतील मगजामध्ये प्रोटिन, कार्बोहायड्रेडइस जास्त असल्याने ते एक पौष्टिक खाद्य आहे.पाने जाळून तयार केलेले भस्म भाजलेल्या जखमेवर लावल्यास जखम लवकर खपली धरते.
 • कच्च्या आंब्याच्या कोयीतील मगज ५0 ग्रॅम दह्याबरोबर खाल्यास जंत, कृमी पूर्णतः नष्ट होतात.
 • आंब्याच्या झाडाचा चीक (पातळ स्राव) गरम करून फोडावर लावल्यास पस निचरा होऊन जखम लवकर भरून निघते.
 • कड्चा आंबा उगाळून गराचा लगदा घामोळ्यांवर लावल्यास घामोळ्या नाहीशा होतात.
 • आंब्याची कोय पाण्याबरोबर दगडावर घासून तयार होणारा लगदा विचूदंश, माशी दंशावर लावल्यास वेदना कमी होतात. जास्त प्रमाणात कच्चे आंबे खाण्याने विषमज्वर, रक्तविकार, नेत्ररोग होतात.
 • यकृताच्या आणि जलोदर असलेल्या रुग्णांनी आंबे खाऊ नयेत. आंबे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. तसेच जास्त आंबे खाल्ल्यानंतर अपचन झाल्यावरही पाण्याऐवजी दूध प्यावे. चिमूटभर सुंठ-मीठ खावे. अगर उपलब्ध असल्यास तीन-चार जांभळे खावीत.
See also  ऑर्थोपेडिक म्हणजे काय | What is orthopedic doctor In Marathi

संदर्भ – शेतकरी मासिक


SIP KNOWLEDGE