सरकारी नोकरी प्राप्त करण्यासाठी करावयाचे महत्वाचे उत्तम कंप्यूटर कोर्स -Best computer courses for government job

सरकारी नोकरी प्राप्त करण्यासाठी करावयाचे महत्वाचे उत्तम कंप्यूटर कोर्स best computer courses for government job

आज आपल्याला प्रत्येकालाच सरकारी नोकरी प्राप्त करण्याची तीव्र इच्छा असते.प्रत्येकाला वाटते की आपण सरकारी जाॅब करावा.

पण आता जागोजागी सर्व काही डिजीटल होत असल्याने संगणकाचे महत्व वाढले असल्याने सरकारी नोकरी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना संगणक साक्षर असणे देखील गरजेचे झाले आहे.

कारण कुठल्याही सरकारी नोकरीच्या ठिकाणी पहिले आपणास कंप्यूटर येते का कंप्यूटरचे नाॅलेज आहे का हाच प्रश्न विचारला जात असतो.

म्हणून सरकारी नोकरी प्राप्त करण्यासाठी कंप्यूटर कोर्स करणे देखील अत्यंत महत्वाचे झाले आहे.

पण सरकारी नोकरी प्राप्त करण्यासाठी कुठला संगणकाचा कोर्स आपण करायला हवा कोणता कोर्स करणे आपल्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल,कोणता कोर्स केल्याने आपणास सरकारी नोकरी प्राप्त होईल हेच आपल्याला माहीत नसते.

आपल्या ह्याच समस्येला दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही अशा कोर्सेस विषयी माहिती देणार आहोत जे करून आपण सरकारी नोकरी प्राप्त करू शकतात.

१) ट्रीपल सी -course on computer concept

Best computer courses for government job
Best computer courses for government job

ह्या कोर्सचा कालावधी एकूण सहा महिने इतका असतो.हा कोर्स केलेली व्यक्ती कुठल्याही सरकारी कार्यालयात लिपिक,लघुलेखक पटवारी म्हणून नोकरी करू शकतो.

हा सर्टिफिकेट कोर्स NIELIT कडुन आपणास उपलब्ध करून देण्यात आला आहे.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक अॅण्ड इनफरमेशन टेक्नॉलॉजी असा याचा फुलफाॅम होतो.

हा कोर्स केल्यानंतर आपणास राज्य स्तरीय सरकारी पातळीवर ज्युनिअर क्लास असलेल्या सरकारी नोकरी करीता प्रयत्न करू शकतो.

प्रत्येक ठिकाणी राज्यस्तरीय सरकारी नोकरी प्राप्त करण्यासाठी हा कोर्स विचारला जातो.

एन आय ई एल आयटीकडुन सर्टिफिकेट प्राप्त केल्यानंतर आपणास कुठल्याही सरकारी नोकरी साठी अर्ज करता येऊ शकतो.

२) बीसीए – bachelor of computer application

हा तीन वर्षे इतका कालावधी असलेला पदवी अभ्यासक्रम आहे.यात एकुण सहा सत्र असतात.हा कोर्स आपणास बारावी नंतर करता येईल.

See also  JEE - जेईई मुख्य परीक्षा ऍडमिट कार्ड 2023 विषयी माहिती -JEE mains admit card 2023 in Marathi

हा बॅचलर डिग्री कोर्स केल्यानंतर आपण रेल्वे मध्ये बॅकेत किंवा महसुल तसेच आयकर विभाग मध्ये देखील सरकारी नोकरी प्राप्त करू शकतो.

३) डेटा एंट्री ऑपरेटर तसेच कंप्यूटर आॅपरेटर –

डिप्लोमा इन डेटा एन्ट्री आॅपरेटर हा कोर्स केल्यानंतर आपणास कुठल्याही सरकारी कार्यालयात मंत्रालयात डेटा एन्ट्री आॅपरेटर तसेच कंप्यूटर आॅपरेटर टेक्नीकल असिस्टंट म्हणून नोकरी मिळु शकते.

याचसोबत आपणास रेल्वे, बॅकिंग एस एससी मध्ये देखील नोकरी प्राप्त करता येते.

४) एडीसीए – advanced diploma in computer application

अॅडव्हान्सड डिप्लोमा इन कंप्युटर अॅप्लीकेशन हा कोर्स केल्यानंतर आपणास कुठल्याही विभागात सरकारी नोकरी साठी अर्ज करता येऊ शकतो.

ह्या कोर्सचे सर्टिफिकेट प्राप्त केल्यानंतर आपणास स्टेट तसेच सेंट्रल लेव्हल वरील कुठल्याही सरकारी नोकरी करीता प्रयत्न करता येईल.

हा कोर्स आपणास आॅफलाईन अणि आॅनलाईन या दोन्ही पदधतीने उपलब्ध करून देण्यात आला आहे.

५) ओ लेव्हल कोर्स –

ज्या विद्यार्थ्यांला बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर कुठल्याही सरकारी कार्यालयात मंत्रालयात सरकारी नोकरी
कंप्यूटर क्षेत्रात प्राप्त करायची असेल तर आपण हा कोर्स नक्की करायला हवा.

हा कोर्स देखील NIELIT कडुन उपलब्ध करून दिला जातो याची परीक्षा देखील NIELIT आयोजित करते.