मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना २०२० – (PM KUSUM Scheme online Maharashtra )

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना – उद्देश्य- (PM KUSUMPradhan Mantri Kisan Urja Suraksha evem Utthan Mahabhiyan)

 • शेतकर्‍यांना दिवसा ही सिंचन करणे शक्य व्हावे.
 • राज्य शासनाची पारंपरिक पध्दतीने कृषीपंप जोडणी साठी लागणार्‍या खर्चची बचत होणे॰
 • अनुदान व क्रॉस सबसिडी मधील बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे.
 • डिझेल पंप च वापर टाळून वायु,ध्वनि प्रदूर्षण कमी करणे.

मुख्यमंत्री सौर कृषीपंप-(PM KUSUM) योजना करता अर्ज कुठे आणि कसा कराल:

PM KUSUM
PM KUSUM- how to apply
 1. लाभार्थीने ऑनलाइन अर्ज MSEDCL Solar Porta करावा – https://offgridagsolarpump.mahadiscom.in/AGSolarPump/AGSolarPump?uiActionName=getA1FormNEW
 2. अर्ज भरून नंतर अर्ज -submitt करावा , आवश्यक ते कागद पत्रे गरजेनुसार uplaod करावी
 3. आधार कार्ड
 4. 7/12 उतारा
 5. जातीचे प्रमाण पत्र
 6. अर्ज केल्यानतर  10 दिवसात, अर्जदारा चे स्थळ परीक्षण करून फील्ड ऑफिसर (MSEB )डिमांड नोट देवून लाभार्थी ची निकाषा नुसार निवड करतील.
 7. डिमांड नोट नुसार पेमेंट केल्या नंतर , लाभार्थी कुठल्या एजन्सी कडून योजना राबवायची त्याचे नाव सुचवू शकते.
 8. महावितरण कडून त्या एजन्सी ला 3 दिवसात LOA दिली जाईन,
 9. एजन्सी ल 90 दिवसात काम पूर्ण करणे बंधन कारक असून , काम पूर्ण झाल्याच्या कमिशन रिपोर्ट, पूर्ण, बिल, फोटो सहित संकेत स्थळा वर uplaod करणे आवश्यक आहे .
 10. अर्जदारास वेळोवेळी योजनेची माहिती mobile sms द्वारे देण्यात येईल.
 11. काम पूर्ण केल्यानंतर ,आणि सर्व निकष पूर्ण केल्यानंतर एजन्सी ल पूर्ण पेमेंट करण्यात येईल.

मुख्यमंत्री सौर कृषीपंप-योजने चे लाभार्थी निवडीचे निकष:  

 • सदर योजने चा लाभ घेण्यासाठी शेतकऱयांकडे पाण्याचा साठा उपलब्ध असावा मात्र अशा शेतकऱयांकडे पारंपरिक पध्दतीने विद्युत जोडणी झालेली नसावी.
  • ५ एकर शेतजमीन धारक शेतकर्‍यास ३ अश्वशक्तीक्षमते सौरकृषी व
  • ५ एकरापेक्षा शेतजमीन धारक शेतकर्‍यास ५ अश्वशक्तीक्षमते चा सौरकृषी पंप देय
 • शेतजमीन ५ एकरापेक्षा जास्त असल्यास शेतकर्‍यास  भौगोलिक  परिस्थिति विचारात घेऊन7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देण्याचा विचार करण्यात येईल.
 • विद्युतीकरण न झालेल,, वन विभाग कडून परवानगी न मिळलेले, महावितरण कडे पैसे भरून ही जोडणी न मिळालेले , येत्या काळात जोडणी लवकर च मिळेल ह्याची खात्री नसलेले अश्या शेतकर्‍यांना ह्या योजनेत  प्राधान्य राहील.
 • वैयक्तिक किंवा सामुदायिक  शेततळे,विहीर , बोअरवेल,बारमाही वाहनरी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीन धारक शेतकरी सुध्दा सक्षम अधिकारयाकडून खात्री केल्या नंतर योजने साठी पात्र राहतील.
See also  PM-KMY - PM-KISAN योजनांची वैशिष्ट्ये-माहिती

सदर PM KUSUM -योजनें अंतर्गत सौरकृषी पंपसंच किमतीच्या

 • सर्व साधार गट च्या लाभार्थ्यांने – १० टक्के  
 • अनुसूचीत जाती /अनुसूचीत जमातीच्या च्या लाभार्थ्यांने –  5 टक्के लाभार्थी हिस्सा भरणे आवश्यक आहे –

फोन- 1800-102-3435 or 1800-233-3435 आणि   ईमेल-  agsolar_support@mahadiscom.in

अधिक माहिती साथी कृपया क्लिक करा

PM-KUSUM scheme