Rice Transplanter यांत्रिक पद्धतीने भात लागवड:

यांत्रिक पद्धतीने (Rice Transplanter) भात लागवडीचा हा यशस्वी प्रयोग आहे शेतकरी श्री रगुनाथ जाधव ह्यांचा – खरीप हंगाम सन -2019-2020,

पेठ सारख्या दुर्गम आदिवासी भागात नाशिक शहारापासून 65 किलोमीटर  अंतरावर हरणगाव हे 1200 लोकवस्तीचे गाव आहे. या निसर्गाच्या कुशीत वसलेले गावाला एक धरण बांधले गेले आणि हरणगावचे नशीब उजळले.

पाण्याची सोय झाली आणि शेतक-यानी वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली त्यातुन भोपळा लागवड, टोमॅटो लागवड, ऊस लागवड, त्यामुळे शेतीसाठी मजुरांची उणीव भासू लागल्यामुळे  मूळ पीक भात असलेल्या या गावात भात पिकामध्ये आपल्या शेतीत अनेक वेगवेगळे उपक्रम व प्रयोग राबवायला सुरवात केली.

भात शेतीसाठी मजूर कमी वेळेवर व आवश्यक प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे  190 हे भात शेती असलेला परिसर मजूर अभावी हैराण झाला.

चार सूत्री भात लागवड व  इतर प्रयोग शेतात सुरूच होते त्यातून कृषी विभागाच्या वतीने राजूर अकोला येथे तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आदेशाने शेतक-यांना  नवीन तंत्रज्ञान आत्मसात व्हावे यासाठी श्री शिलनाथ पवार तत्कालीन तालुका कृषी अधिकारी पेठ यांनी शेतकरी दौरा आयोजित करून भात ट्रान्सप्लांटर बघण्यासाठी तालुक्यातील 30 शेतकरी पाठविले.

हयातून प्रेरणा घेऊन श्री रघुनाथ बळीराम जाधव यांनी यांत्रिकारणातून भात लावणी यंत्र – Rice Transplanter घेतले. यातूनच यांत्रिक पद्धतीने भात लागवड तंत्रज्ञान ची मुहूर्तमेढ तालुक्यात रोवली गेली.

यांत्रिक पद्धतीने भात लागवड तंत्रज्ञान फायदे

  • यंत्राच्या सहाय्याने प्रथम 10 एकर क्षेत्रावर भात लावणी यंत्राने लागवड करण्यात आली.
  • एक एकर क्षेत्रासाठी लागणार  रु 7500/- खर्च रु. 4500/- रुपयांवर आला.
  • 30 किलो बियाण्यात बचत होऊन अवघ्या 12 किलो बियाण्यात लागवड झाली.
  • एकाच वेळी येणारी भात लागवड व त्यातून मनुष्य बळाची कमतरता लक्ष्यात घेता एक एकर क्षेत्राची 2 तासात लागवड झाली.
  • पेरणीनंतर 15 दिवसात रोप लावण्यास आल्याने पिकाचा कालावधी कमी झाला.
  • एका भात रोपाला 45 ते 50 फुटवे निघाले.
  • दोन झाडांमधील व दोन ओळीतील झाडामधील अंतर योग्य व एकसारखे ठेवल्याने रोड व किडीचे प्रमाण कमी झाले. सर्वात महत्वाचे पिकाच्या एकूण कालावधित घट झाली  
  • पिक लवकर कापणीस आले.
  • हेक्टरी सरासरी 35 ते 40 क्विंटल उत्पादन शेतकरी बांधवांना मिळाले जे पारंपारिक पद्धतीने 25 क्विंटल पर्यंत मिळत होते.
  • त्यातून प्रेरणा घेऊन आज पेठ तालुक्यत 100 एकर क्षेत्रावर यांत्रिकीकरणाने भात लागवडीचे नियोजन झाले आहे सामूहिक रोप वटीकेत रोपे टाकली आहेत या सर्व गोष्टीतून शेतकरी बांधवांना यांत्रिक पद्धतीने आर्थिक व इतर फायदा होऊन उत्पन्न वाढल्याचे दिसून आले आहे.
See also  बँलन्स शीट विषयी माहीती -आर्थिक ताळेबंद- Balance Sheet Information In Marathi

पारंपारिक आणि यांत्रिक पद्धतीने लागवड खर्च तुलना –

मनुष्यबळ वापरून लागवडयांत्रिक पद्धतीने लागवड
1 हेक्टर क्षेत्रासाठी – 13 मजूर 2 दिवस कालावधी मजुरी खर्च रु. 300/- प्रती दिन प्रमाणे रु. 7500/-1 हेक्टर क्षेत्रासाठी – 1 यंत्र 5 तास कालावधी पेट्रोल खर्च ताशी 1 लिटर प्रमाणे 5 तासासाठी रु. 80/- प्रती लिटर प्रमाणे रु. 400/-
चटई पद्धतीने रोपवाटिका तयार करण्यासाठी येणारा अतिरिक्त खर्च वजा केल्यास हेक्टरी कमीत कमी रु. 5000/- ची बचत झाली. शिवाय शास्त्रीय पद्धतीने लागवड होत असल्याने पिकाच्या कालावधीत घट तर उत्पादनात वाढ दिसून आली.

संकलन – श्री सुरेश शेळके – कृषि सहाय्यक , पेठ , नाशिक