12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर एअर होस्टेस कसे बनावे?-How to become Air hostess after 12 th pass in Marathi

12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर एअर होस्टेस कसे बनावे?How to become Air hostess after 12 th pass in Marathi

कोरोना महामारीच्या काळात कामकाज ढप्प झालेल्या विमानचलन उद्योगाने पुन्हा एकदा भरारी घेण्यास सुरुवात केली आहे.ज्यामुळे एअरहोस्टस पदाच्या डिमांड मध्ये देखील अधिकाधिक वाढ होताना दिसुन येत आहे.

आजच्या लेखात आपण एअरहोस्टस बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते?एअर होस्टेस बनल्यावर आपणास किती वेतन दिले जाते?एअर होस्टेसच्या जबाबदारया काय असतात? इत्यादी बाबींविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

जेव्हा आपण टिव्ही मध्ये विमानाने प्रवास करत असलेल्याचा एखादा सीन बघत असतो.

तेव्हा विमानात बसलेल्या प्रवाशांना प्रवासादरम्यान काय हवे काय नको अशी विचारपूस करताना आपणास एक आकर्षक प्रभावी व्यक्तिमत्त्व राहणीमान,मधुर बोली असलेली एक महिला दिसुन येते.ही महिला दुसरे कोणी नसुन एअर होस्टेस असते.

आत्ताच्या अनेक मुलींना एअर होस्टेस बनायचे आहे.एअर होस्टेस बनून जगभर फिरायचे आहे.आकाशात उंच भरारी घेण्याचा आनंद लुटायचा आहे.

एअर होस्टेस हा एक असा जाॅब प्रोफेशन आहे ज्यात आपणास जगभर फिरायला मिळते आणि फिरण्याचा आनंद घेण्यासोबत भरघोस वेतन देखील प्राप्त होते.म्हणुन ह्या करीअरकडे सध्या मुली अधिक प्रमाणात वळताना दिसुन येत आहे.

See also  ICAR केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था गोवा नवीन भरती | CCARI Goa Bharti 2023 In Marathi

एअर होस्टेस कोण असते अणि तिचे काम काय असते?

How to become Air hostess after 12 th pass12
How to become Air hostess after 12 th pass12

एअर होस्टेस ही एक हवाई सुंदरी असते.जी विमानात बसलेल्या प्रवाशांना प्रवासादरम्यान काय हवे काय नको हे बघते.प्रवाशींचे आदरातिथ्य करते.प्रवाशांसाठी खाण्या पिण्याची तजवीज करते.

एअर होस्टेसची नियुक्ती एअरलाईनस कडुन करण्यात येत असते.

विमानात बसलेल्या प्रवाशांना सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सुचना देते.विमानातुन सामान उतरवण्यासाठी प्रवाशांना उतरण्यासाठी साहाय्य करते.

अणि आवश्यकता भासल्यास विमानात बसलेल्या प्रवाशांना एमरजन्सी मध्ये मेडिकल ट्रिटमेंट पुरविण्याचे काम देखील करत असते.

सर्व प्रवासी विमानात प्रवासासाठी बसण्याच्या अगोदर विमानातील सर्व संसाधने व्यवस्थित काम करत आहेत किंवा नाहीत याची चौकशी करते.

विमान उतरल्यावर सर्व प्रवासी सुरक्षितपणे उतरले आहेत किंवा नाहीत कोणाचे सामान विमानात राहीले आहे का हे देखील तपासण्याचे काम एअर होस्टेस करते.

एअर होस्टेस बनण्याचे फायदे कोणकोणते आहेत?

एअर होस्टेस बनल्याने आपणास जगभरातील निसर्गरम्य सुंदर ठिकाण पाहायला मिळतात तसेच ह्या ठिकाणी जाऊन फिरायला मिळते.

एअर होस्टेस बनल्याने आपणास वेगवेगळ्या देशातील संस्कृतीतील परकीय भाषा बोलणारया फाॅरेन मधील लोकांशी संवाद साधण्याची त्यांच्याशी मैत्री करण्याची सुवर्णसंधी प्राप्त होते.

एअर होस्टेस बनल्यावर विमानाने आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत प्रवास करत असताना आपणास प्रवास खर्च अणि तिकिटाच्या पैशात चांगली सुट देखील दिली जाते.

याचसोबत आपणास रोजचे जेवण प्रवासासाठी लागणारा खर्च दिला जातो,आरोग्य लाभ अणि विमा लाभ दिला जातो.अणि सेवानिवृत्तीनंतर पेंशन देखील प्राप्त होते.

एअर होस्टेस मध्ये कोणते गुण कलाकौशल्य असणे आवश्यक आहे?

  1. विमानातील प्रवाशांसोबत उत्तम रीत्या संवाद साधण्याचे कौशल्य एअर होस्टेस मध्ये असायला हवे.
  2. विमानात बसलेल्या वृदध प्रवाशी तसेच लहान मुले यांच्यासोबत तिने सहानुभूती पुर्वक वागणे आवश्यक आहे.
  3. विविध भाषिक विविध संस्कृती असलेल्या व्यक्तींसोबत संवाद साधण्याची कला हवी त्यांच्यात मिळुन मिसळुन राहता यायला हवे.कुठलीही समस्या दूर करण्याचे कौशल्य हवे.
  4. तणावपूर्ण परिस्थिती मध्ये देखील डोके शांत ठेवून विमानातील सर्व प्रवाशी सुरक्षित राहतील याची काळजी घेता यायला हवी.
  5. आपले व्यक्तीमत्व आनंदी अणि भाषा मृदृ स्वरुपाची असायला हवी.
  6. मराठी,हिंदीसोबत आपल्याला आंतरराष्ट्रीय भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.
  7. डोळयांची दृष्टी ६/६ असणे आवश्यक आहे.
See also  गोवा राज्य जैवविविधता मंडळ मार्फत विविध पदांकरीता भरती सुरू- GSBB recruitment 2023 in Marathi

एअर होस्टेस बनण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता –

एअर होस्टेस बनण्यासाठी किमान आपले बारावी पास असणे आवश्यक आहे.बारावीला किमान ५५ टक्के असणे आवश्यक आहे.

याचसोबत अॅव्हीएशन मध्ये पदवी मिळवणे गरजेचे आहे.

याकरीता आपण एखाद्या एअर होस्टेस ट्रेनिंग स्कुल मधुन ट्रेनिंग देखील घेऊ शकतो.बाजारात आज असे अनेक सर्टिफिकेट कोर्स तसेच डिप्लोमा आहेत जे बारावी नंतर करून आपण एअर होस्टेस बनू शकता.ह्या कोर्सेस करीता आपण सदर संस्थेत अर्ज करायचा असतो.

एअर होस्टेस पदासाठी सर्टिफिकेट कोर्स हा सहा ते आठ महिने इतक्या कालावधीचा आहे.अणि डिप्लोमा कोर्सचा कालावधी सहा महिने ते एक वर्ष इतका आहे.

यात पदवी कोर्स करायला आपणास एक ते दोन वर्षे लागु शकतात.

एअर होस्टेस बनण्यासाठी कोर्स करायला लागणारा एकुण खर्च –

एअर होस्टेस बनण्यासाठी कोर्स करायला आपणास तीन ते चार लाख इतका खर्च करावा लागु शकतो.

एअर होस्टेस बनण्यासाठी शारीरिक पात्रता,उंची वयाची अट –

  • एअर होस्टेस बनण्यासाठी आपले वय १८ ते २१ दरम्यान असणे आवश्यक आहे.उमेदवार फिजिकली फिट असायला हवा.
  • आपली उंची किमान पाच फुट दोन इंच इतकी असायला हवी.अणि वजन उंचीनुसार असावे.
  • आपल्या शरीरावर कुठलेही टॅटु वगैरे काढलेले नसावे.
  • प्रवाशांना खाद्य पदार्थ सर्व करताना खाद्य पदार्थांची भरलेली ट्राॅली उचतला यायला हवी.
  • एअर होस्टेस बनण्यासाठी आपण मानसिक दृष्ट्या आजारी नसणे आवश्यक आहे.

याचसोबत एअर होस्टेस म्हणुन निवड करण्याअगोदर आपली बघण्याची ऐकण्याची क्षमता देखील इथे तपासणी जाते.

एअर होस्टेसची निवड कशी केली जाते?

सर्वप्रथम एअरलाईनस कडुन एअर होस्टेस पदाची भरती करण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली जाते.
लेखी परीक्षा+मुलाखत वगैरे घेऊन उमेदवारांची निवड करण्यात येत असते.

एअर होस्टेस बनल्यावर किती वेतन प्राप्त होते?

एअर होस्टेस बनल्यावर आपणास सुरूवातीला देशांतर्गत उड्डाण करण्यासाठी ३० हजार मासिक इतके वेतन दिले जाऊ शकते.देशाबाहेर उड्डाणासाठी आपली निवड झाल्यास महिन्याला ३ लाखापर्यंत वेतन प्राप्त होते.

See also  प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय आहे?pm vishwakarma scheme information in Marathi

आपल्या स्कील अनुभवात वाढ झाल्यावर यात अधिक वाढ केली जाते.

एअर होस्टेस कोर्सचे प्रशिक्षण देणारया भारतातील काही प्रमुख संस्था –

१)जेट एअरवेज ट्रेनिंग अँकॅडमी मुंबई

२) युनिव्हरसल अॅव्हीएशन अकॅडमी चेन्नई

३) बाॅम्बे फ्लाईंग क्लब अॅव्हीएशन मुंबई

४) विंग्ज एअर होस्टेस अॅण्ड हाॅसपिटॅलिटी ट्रेनिंग गुजरात