वाय प्लस अणि झेड प्लस सुरक्षा मध्ये काय फरक असतो?Difference between z+ and y+ security in Marathi
सोशल मिडिया वर नुकतीच एक बातमी समोर आली आहे की ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली आहे.
न्युज वर असे सांगितले जाते आहे की आदित्य ठाकरे अणि उद्भव ठाकरे यांची सुरक्षा झेड प्लस वरून वाय प्लस करण्यात आली आहे.
ठाकरे कुटुंबियांना मातोश्री बंगल्यावर देण्यात आलेल्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली आहे अणि एक एसकाॅर्ट व्हॅन देखील काढुन घेण्यात आली आहे.
आपल्यातील खुप जणांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की झेड प्लस सुरक्षा म्हणजे काय?वाय प्लस सुरक्षा म्हणजे काय?या दोघांमध्ये काय फरक असतो?
आजच्या लेखात आपल्या मनातील निर्माण होणाऱ्या ह्याच प्रश्नांची उत्तरे आपण थोडक्यात जाणुन घेणार आहोत.
भारतातील प्रमुख व्यक्तींना कोणकोणत्या प्रकारच्या सुरक्षा प्रदान केल्या जातात?
देशातील महत्वपुर्ण व्यक्तींच्या जीवितास धोका निर्माण होण्याची परिस्थिती उद्भवते अशा वेळी त्यांना शासनाकडून सुरक्षा प्रदान केली जाते.
पण ही सुरक्षा देत असताना सदर व्यक्तीच्या जीवितास किती धोका आहे हे बघितले जाते मग त्याला कोणत्या प्रकारची सुरक्षा प्रदान करायची हे ठरविण्यात येत असते.
एसपीजी,एक्स,वाय,झेड झेड+हे शासनाकडुन भारतातील प्रमुख व्यक्तींना दिले जाणारे काही महत्वाचे सुरक्षेचे प्रकार आहेत.हया सुविधा देशातील कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाला दिल्या जात नसतात.
ह्या सुविधा केंद्राचे राज्याचे मंत्री,सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयातील न्यायाधीश अशा देशातील प्रमुख व्यक्तींना देण्यात येते.
देशातील कुठल्याही प्रमुख व्यक्तीला सुरक्षा प्रदान करण्याआधी समिती गठित केली जाते त्या समितीदवारे त्या प्रमुख व्यक्तीच्या जीवाला कितपत धोका आहे याचे सखोलपणे परीक्षण तसेच अभ्यास केला जातो.
मग समितीने सादर केलेल्या अहवालानुसार त्या व्यक्तीला कोणत्या प्रकारची सुरक्षा देण्यात यावी हे ठरवले
जाते.
वाय प्लस सुरक्षा कोणाला प्रदान करण्यात येत असते?
भारत देशातील राजकीय पक्षांच्या नेत्यांना मंत्र्यांना ही सुरक्षा देण्यात येत असते.यात सिक्युरिटी साठी ११ जण तैनात केले जात असतात.यात एक नॅशनल सिक्युरिटी गार्ड असतो.
दोन पर्सनल सिक्युरिटी अधिकारी देखील रोटेशन बेसेसवर आजुबाजुला तैनात राहत असतात.हया सिक्युरिटीची जबाबदारी सीआरपीएफ कडे सोपविण्यात आलेली असते.
वाय सुरक्षा –
यात एकुण सिक्युरीटी आॅफिसर सुरक्षेसाठी तैनात केले जातात.यात कमांडो अणि पोलिस अधिकारी देखील असतात.
यात दोन पर्सनल सिक्युरिटी अधिकारी रोटेशनल बेसिसवर सुरक्षेसाठी तैनात करण्यात येतात.
एक्स सुरक्षा –
यात दोन किंवा तीन पोलिस अधिकारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात येतात.
झेड प्लस सुरक्षा कोणाला प्रदान करण्यात येत असते?
झेड प्लस सुरक्षा ही एसपीजी नंतर दिली जाणारी सर्वोच्च सुरक्षा मानली जाते.ही देशातील महत्वपुर्ण व्यक्तींना दिली जाणारी सुरक्षा आहे.
झेड प्लस सुरक्षा ही देशातील पंतप्रधान,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, राष्ट्रपती,केंद्रीय गृहमंत्री यांना प्रदान करण्यात येत असते.यात दहापेक्षा अधिक एन एस जी कमांडो सुरक्षेसाठी तैनात करण्यात येते.
यात दोन सुरक्षा कवच प्रदान करण्यात येत असतात पहिले सुरक्षा कवच देण्याची जबाबदारी एन एस जी कडे सोपविण्यात येते.
तर दुसरे सुरक्षा कवच देण्याची जबाबदारी एसपीजी कमांडो यांची असते.यात आयटीबीपीएफचे अणि सीआरपीएफचे सैन्य देखील असते.यात एक एसकाॅर्ट व्हॅनची सुविधा देखील प्रदान केली जाते.
झेड +सुरक्षा देण्यासाठी २० लाखापर्यंतचा खर्च येतो जो शासनाकडून केला जातो.
झेड सुरक्षा कोणाला प्रदान करण्यात येत असते?
झेड सुरक्षा ही राज्यातील मंत्र्यांना किंवा माजी मुख्यमंत्री यांना जेव्हा त्यांच्या जिवाला खुप जास्त प्रमाणात धोका असतो तेव्हा दिली जाते.
यात एकुण पाच एन एस जी कमांडो,एक दोन पोलिस कर्मचारी अणि २२ सैनिक सुरक्षेसाठी तैनात करण्यात येत असतात.
झेड सुरक्षा ही दिल्ली पोलिस, सीआरपीएफ अणि आयटीबीपीएफ कडुन प्रदान करण्यात येते.
झेड सुरक्षा देण्यासाठी १५ ते १६ लाखापर्यंतचा खर्च येतो जो शासनाकडून केला जातो.
एसपीजी सुरक्षा कोणाला प्रदान करण्यात येत असते?
एसपीजी ही आपल्या भारत देशातील प्रमुख व्यक्तींना दिली जाणारी सर्वोच्च सुरक्षा आहे.special protection group ही सुरक्षा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे.
एसपीजी हा भारतातील एक विशेष संरक्षण गट आहे ज्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी तैनात राहणे आहे.
यात देशातील नॅशनल सिक्युरिटी गार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत.
या अगोदर ही सुरक्षा राजीव गांधी यांच्या हत्येनंतर १९९१ मध्ये राहुल गांधी,प्रियंका गांधी सोनिया गांधी यांना देण्यात आली होती.नुकतीच तीन वर्षे अगोदर ही सुरक्षा त्यांच्याकडुन काढुन घेतली गेली आहे.