लिपिकाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या कोणत्या आहेत?लिपिकाला वेतन किती प्राप्त होते?Duties, responsibilities and salary of clerk in Marathi

लिपिकाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या-?लिपिकाला वेतन किती प्राप्त होते?Duties, responsibilities and salary of clerk in Marathi

प्रत्येक सरकारी खाजगी कार्यालयात किंवा शाळा महाविद्यालयात एक अशी विशेष व्यक्ती कामासाठी नेमण्यात येत असते जी कागदपत्रांशी संबंधित महत्वाची माहिती देण्यासाठी उपलब्ध असतो.

शाळा महाविद्यालयात असलेले क्लर्क हे विद्यार्थ्यांना अॅडमिशन विषयी माहिती देत असतात,अॅडमिशन घेण्यासाठी तसेच शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतील याची माहिती देत असतात.

समजा आपल्याला एखादे जुने डाॅक्युमेंट काढायचे असले तेव्हा देखील आपण क्लर्कची मदत घेत असतो.

आजच्या लेखात आपण एक क्लार्कला आॅफिसात कोणकोणते काम करावे लागतात?हे जाणुन घेणार आहोत.

जेणेकरून आपण देखील एखाद्या आॅफिसात क्लार्क बनले तर क्लार्कला कोणकोणती कामे करावी लागतात हे आपणास माहीत असायला हवे.कारण प्रत्येक विभागात ह्या पदासाठी भरती केली जात असते.

लिपिक कोण असतो? What is clerical work

क्लार्क लिपिक हा कुठल्याही विभागातील खाजगी तसेच सरकारी आॅफिसात कार्यालयात गृप सी मध्ये काम करणारा एक कर्मचारी असतो.यालाच आपण त्रितीय श्रेणी कर्मचारी असे देखील म्हणू शकतो.

Duties, responsibilities and salary of clerk

कुठल्याही विभागात क्लार्क लिपिक पदाची भरती गृप सी अंतर्गत केली जात असते.लिपिकाची नोकरी ही मुख्यकरून डेस्क जाॅबची असते.

आज कुठल्याही शासकीय तसेच खासगी कार्यालयात देखील लिपिक ह्या पदासाठी भरती केली जाते.दरवर्षी ह्या पदाकरीता विविध शाळा महाविद्यालयात विविध क्षेत्रात, शासकीय खाजगी कार्यालयात भरती निघत असतात.

See also  आर्मीचा फुलफाँर्म - Army Full Form In Marathi

लिपिकाचे काम काय असते?

कोणत्याही खाजगी विभागात किंवा सरकारी विभागात काम करत असलेल्या क्लार्कचे काम कारकुनाचे (clerical work)असते.

कुठल्याही शाळा,महाविद्यालयात,संस्थेत,खाजगी तसेच सरकारी आॅफिसात लिपिक पदावर काम करत असलेल्या व्यक्तींना संगणकावर म्हणजेच कंप्युटरवर बसुन काम करावे लागते.

यात लिपिकाला कंप्युटरवर टाईपिंग करावी लागते,विविध डेटा रेकाॅड कंप्युटरमध्ये प्रविष्ट करणे त्यांची नोंद ठेवणे, अहवाल तयार करणे,अधिकारी वर्गाच्या बैठकीसाठी निविदा तयार करणे,संगणक प्रिंटर कॉपी आणि फॅक्स मशीन इत्यादींची देखभाल करणे ही सर्व कामे आॅफिसात काम करत असलेल्या लिपिकाची असतात.

लिपिकाचे प्रकार किती अणि कोणकोणते आहेत?

वेगवेगळ्या संस्था शाळा महाविद्यालय,शासकीय तसेच खाजगी कार्यालयात लिपिक पदाच्या विभिन्न प्रकारांसाठी भरती केली जाते.

क्लार्कचे काही मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे आहेत-

  • १)अकाऊंट क्लार्क-
  • २) लोअर डिव्हीजन क्लार्क-
  • ३) क्लार्क कम असिस्टंट-
  • ४) आॅफिस असिस्टंट-
  • ५) क्लार्क कम टायपिस्ट-
  • ६) कमर्शियल क्लार्क-
  • ७) अप्पर डिव्हीजन क्लार्क –

कोणत्या विभागात लिपिक पदासाठी भरती केली जाते?

क्लार्क पदासाठी पुढीलप्रमाणे विविध क्षेत्रात विविध विभागात भरती निघत असते.

१) रेल्वे विभाग –

रेल्वे मध्ये आर आरबी एनटीपीसी तसेच इतर श्रेणीमध्ये देखील क्लार्क पदासाठी भरती निघत असते.

२) पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो मध्ये

३) सीबीआय मध्ये

४) सेंट्रल ट्रान्सपोर्ट आॅफिस मध्ये

५) बॅकिंग क्षेत्रात तसेच पोस्ट खात्यात

६) संरक्षण क्षेत्रात

७) शाळा महाविद्यालयात विद्यापीठात

८) खाजगी तसेच सरकारी संस्थेत

९) भारतीय निवडणूक आयोग

१०) सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेशन ट्रयुबिनल

११) कॅण्टिन स्टोअर डिपार्टमेंट

१२) हायकोर्टात तहसिल कार्यालयात

लिपिक पदावर भरती होण्यासाठी शैक्षणिक पात्रतेच्या अटी काय आहेत?

लिपिक पदावर भरती होण्यासाठी आपण १२ वी उत्तीर्ण असणे अणि पदवीचे शिक्षण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.

काही विभागात १२ वी उत्तीर्ण उमेदवारांची क्लार्क पदासाठी भरती केली जाते तर काही विभागात क्लार्क पदासाठी ग्रॅज्युएशन पूर्ण असलेल्या उमेदवारांची भरती केली जाते.

See also  माणसाला किती जागेची आवश्यकता असते?- How much land does man need short story in Marathi

रेल्वे सीआरपीएफ बीएस एफ सारख्या ठिकाणी क्लार्क पदावर भरती होण्यासाठी आपले किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असते अणि बॅकेत क्लार्क म्हणून लागण्यासाठी आपले पदवीधर असणे आवश्यक आहे.

लिपिक पदावर भरती झाल्यावर आपणास संगणकावर काम करावे लागत असल्याने आपला टायपिंग स्पीड इंग्रजी मध्ये ३५ डबलयु पीएम अणि हिंदी मराठी मध्ये ३० डबलयु पीएम इतका असणे आवश्यक आहे.

याचसोबत आपल्याकडे कंप्युटर सर्टिफिकेट देखील असायला हवे.

लिपिक पदासाठी निवड कशी केली जाते?

लिपिक पदासाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी लेखी परीक्षा घेतली जाते.तसेच उमेदवाराला कंप्युटरचे नाॅलेज किती आहे त्याचा कंप्युटरचा कोर्स वगैरे झाला आहे का त्याचा टायपिंग स्पीड कसा आहे हे बघुन लिपिक पदासाठी उमेदवारांची अंतिम निवड केली जाते.

संरक्षण क्षेत्रात एस सी एम ह्या क्लार्क सारख्या पदासाठी निवड करताना उमेदवारांची शारीरिक चाचणी देखील घेतली जाते.

लिपिक पदासाठी जी लेखी परीक्षा घेतली जाते त्यात इंग्रजी हिंदी मराठी भाषेत प्रश्न विचारले जातात.यात जनरल नॉलेज मॅथमॅटिक्स वर आधारित अणि कंप्युटरशी संबंधित प्रश्न विचारले जातात.

लिपिक पदावर भरती झाल्यावर आपणास वेतन किती प्राप्त होते?

वेगवेगळ्या विभागात क्लार्क पदासाठी वेगवेगळे वेतन निर्धारित केले जात असते.

लिपिक पदावर भरती झाल्यावर आपणास साधारणतः कुठल्याही विभागात १५ हजार ते २० हजार रुपये इतके सुरूवातीला मासिक वेतन दिले जाते.जसजसा आपला अनुभव वाढतो आपल्या वेतनात देखील वाढ केली जाते.

Leave a Comment