डेटा एन्ट्री ऑपरेटर कसे बनावे?how to become data entry operator in Marathi

डेटा एन्ट्री ऑपरेटर कसे बनावे?how to become data entry operator in Marathi

डेटा एन्ट्री ऑपरेटर हे एक असे काम आहे जे आपल्याला कुठल्याही मोठयातल्या मोठ्या अणि लहानातल्या लहान विभागात देखील उपलब्ध होऊन जाते.

डेटा एन्ट्री ऑपरेटरचे काम आपणास बॅकेत,पोस्ट खात्यात,इतर सरकारी किंवा खासगी कार्यालयात नगरपालिका खाजगी दुकानांमध्ये इत्यादी ठिकाणी सहज प्राप्त होत असते.

पण डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणुन काम करण्यासाठी देखील काही शैक्षणिक पात्रतेच्या अटी असतात.

ज्या पुर्ण करणे आपणास आवश्यक असते तेव्हाच आपणास डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणुन कुठेही काम उपलब्ध होऊ शकते.

आजच्या लेखात आपण डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणजे काय?डेटा एन्ट्री ऑपरेटरचे काम काय असते? डेटा एन्ट्री ऑपरेटर बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असावी लागते? डेटा एन्ट्री ऑपरेटरला वेतन किती दिले जाते? इत्यादी महत्वाच्या बाबींचा आढावा घेणार आहोत.

डेटा एन्ट्री ऑपरेटरचे काम काय असते?

डेटा एन्ट्री ऑपरेटरचे काम कंप्युटरमध्ये डेटाची इंट्री करणे,डेटाला अपडेट करत राहणे,डेटाचा रेकाॅर्ड ठेवणे,डेटाला मेंटेन करणे,डेटा पाठविणे फाॅम फिलिंगचे काम करणे हे असते.

how to become data entry operator in Marathi

डेटा एन्ट्री ऑपरेटर हा कंपनीतील कार्यालयातील सर्व महत्वाच्या फाईल्स कागदपत्रे डेटा वगैरेला कंप्युटरमध्ये सेव्ह करून ठेवतो.

डेटा एन्ट्री ऑपरेटरला कोणत्या गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक आहे?

डेटा एन्ट्री ऑपरेटरला कंप्युटरचे उत्तम ज्ञान असणे गरजेचे आहे कमीत कमी त्याला कंप्युटरचे बेसिक नाॅलेज तरी असायलाच हवे.

त्याला कंप्युटर व्यवस्थित आॅपरेट करता यायला हवा.यासाठी त्याने कंप्युटरशी निगडीत MSCIT,CCC यासारखे मुलभुत माहिती देणारे कोर्स केलेले असणे आवश्यक आहे.

See also  आयकर विभाग भरती मध्ये भरती सुरू- दहावी पास, पदवीधर व खेळाडू करता संधी - Income tax recruitment 2023 in Marathi

याचसोबत त्याला कंप्युटरशी संबंधित सर्व महत्वाच्या बाबींचे नाॅलेज असणे आवश्यक आहे.ज्यात ms word,ms Excel,powerpoint इत्यादी बाबींचा समावेश होतो.

डेटा एन्ट्री ऑपरेटरला इंटरनेटचे वेगवेगळ्या साॅफ्टवेअरचे,ईमेल वगैरेचे नाॅलेज असणे आवश्यक आहे त्यांचा व्यवस्थित वापर करता यायला हवा.

डेटा एन्ट्री ऑपरेटरला वेगवेगळ्या भाषेत कंप्युटरवर डेटा एन्ट्रीचे काम करता येण्यासाठी मराठी हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.

याचसोबत डेटा एन्ट्री ऑपरेटरला टायपिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.त्याचा टायपिंग स्पीड उत्तम असणे आवश्यक आहे.

मराठी हिंदी ३० डबलयु पीएम अणि इंग्रजी टायपिंग स्पीड ३५ डबलयु पीएम असणे आवश्यक आहे.

डेटा एन्ट्री म्हणजे काय?

डेटा एन्ट्री म्हणजे काय?
  • कीबोर्ड माऊस स्कॅनर यांसारख्या कुठल्याही एका इनपुट डिव्हाईस दवारे कंप्युटरमध्ये डेटाची इंटरी करणे याला डेटा एन्ट्री असे म्हटले जाते.
  • हा डेटा टेक्स्ट,इमेज,आॅडिओ, व्हिडिओ,अशा कुठल्याही स्वरूपात असु शकतो.
  • डेटा एन्ट्री ऑपरेटर बनण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता –
  • डेटा एन्ट्री ऑपरेटर बनण्यासाठी आपले किमान दहावी तसेच बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.अणि कंप्युटरचे बेसिक नाॅलेज असायला हवे.
  • याचसोबत आपण कंप्युटरशी निगडीत MSCIT,CCC यासारखा एखादा महत्वाचा कोर्स केलेला असणे आवश्यक आहे.

जर आपणास आपल्या शहरातीलच एखाद्या छोट्या मोठ्या कार्यालयात,संस्थेत,बॅकेत,दुकानांत डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणुन काम हवे असेल तर आपले किमान दहावी बारावी उत्तीर्ण असणे अणि आपणास कंप्युटरचे बेसिक नाॅलेज असणे आवश्यक आहे.

पण याचठिकाणी आपणास एखाद्या मोठ्या कंपनीत डेटा एन्ट्री ऑपरेटर ह्या पदावर नोकरी हवी असेल तर आपले किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.अणि कंप्युटरचे उत्तम ज्ञान असायला हवे.

डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणुन आपणास कोणत्या ठिकाणी नोकरी करता येते?

डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणुन आपणास पुढील क्षेत्रात जाॅबची संधी असते.

१) विविध सरकारी कार्यालये/ विविध खाजगी कार्यालये

२) विविध सरकारी संस्था/खाजगी संस्था

३) नगरपालिका तहसिल कार्यालयात

४) बॅकेत

५) पोस्ट खात्यात

६) खाजगी दुकानांमध्ये शाॅप्समध्ये माॅलमध्ये

७) एखाद्या खाजगी कंपनीत

See also  भारतीय खाण ब्युरो नागपुर येथे कार्यालय अधिक्षक तसेच लॅबरोटरी असिस्टंट पदासाठी भरती सुरू - IBM Nagpur Recruitment 2023 In Marathi

याचसोबत डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणुन आपण एखाद्या विश्वसनीय कंपनीत आॅनलाईन देखील वर्क फ्रॉम होम जाॅब करू शकतो हा जाॅब आपण आपल्या आवश्यकता नुसार फुलटाईम किंवा पार्टटाईम देखील करू शकतो.

डेटा एन्ट्री ऑपरेटरला वेतन किती दिले जाते?

आपल्याच राहत्या शहरातील एखाद्या सरकारी किंवा खासगी कार्यालयात,बॅकेत,नगरपालिका,तहसिल कार्यालय, पोस्ट खात्यात,खाजगी दुकानांमध्ये शाॅप्समध्ये माॅलमध्ये जर आपण डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणुन कामाला लागलो तर आपणास सुरूवातीला किमान १२ ते १५ हजार इतके वेतन दिले जाते.

याचठिकाणी एखाद्या आॅनलाईन कंपनी मध्ये आपण डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणुन लागलो तर आपणास १५ ते २० हजारांपर्यंत सुरूवातीला वेतन दिले जाते.

डेटा एन्ट्री तसेच कंप्युटर ऑपरेटर बनण्यासाठी कोणता कोर्स करायला हवा?

जसे की सुरूवातीला आपण जाणुन घेतले की डेटा एन्ट्री ऑपरेटर बनण्यासाठी आपणास कंप्युटरचे बेसिक नाॅलेज असणे आवश्यक आहे, कंप्युटर व्यवस्थित आॅपरेट करता यायला हवा.

एम एस वर्ड,पावरपाॅईट,एक्सेल इंटरनेट साॅफ्टवेअर ईमेल इत्यादीचे उत्तम नाॅलेज असायला हवे.टायपिंग स्पीड देखील उत्तम असायला हवा.

यासर्व बाबींकरीता आपण खालील दिलेल्या कोर्स पैकी कुठलाही एक कोर्स करू शकतात.खालील दिलेल्या कोर्स मध्ये वरील सर्व गोष्टी शिकवल्या जातात.

१)DCA (diploma in computer application)-

यात आपणास कंप्युटरचे बेसिक फंडामेटल नाॅलेज दिले जाते.आॅपरेटिंग सिस्टम विषयी शिकवले जाते.मल्टीमीडीया,इंटरनेट नोटपॅड,वर्डपॅड,इंटरानेट एम एस पेंट विषयी माहिती दिली जाते.

मराठी हिंदी इंग्रजी मध्ये टायपिंगचे नाॅलेज दिले जाते.याचसोबत एम एस वर्ड,एम एस एक्सेल,एम एस पावरपाॅईट एम एस अॅक्सीस हे फंक्शन पण शिकवण्यात येतात.

हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपणास डेटा एन्ट्री ऑपरेटर तसेच टायपिस्ट म्हणून टायपिंगचे काम सहज प्राप्त होत असते.साधारणत हा कोर्स सहा महिने इतक्या कालावधीचा कोर्स आहे.

२)ADCA (advanced diploma in computer application)

ह्या कोर्सचा एकुण कालावधी एक वर्ष इतका असतो.हया कोर्समधये आपणास कंप्युटरचे बेसिक फंडामेटल नाॅलेज दिले जाते.याचसोबत एम एस वर्ड,एम एस एक्सेल,एम एस पावरपाॅईट एम एस अॅक्सीस हे फंक्शन पण शिकवण्यात येतात.

See also  युपी सरकारचा शिक्षण क्षेत्रातील मोठा निर्णय -UttarPradesh UPBoard CBSEBoard Education news

मायक्रो साॅफ्ट आॅफिस विंडोज ७ अणि मायक्रोसॉफ्ट आॅफिस २०१३ शिकवले जाते.याचसोबत इंटरनेट इमेल कंप्युटर नेटवर्क कन्सेप्ट विषयी माहिती दिली जाते.

कंप्युटर मल्टिमीडिया कन्सेप्ट,बेसिक हार्डवेअर कन्सेप्ट, फायनान्शिअल अकाउंटिंग,एचटी एम एल,टॅली ईआरपी ९ विद टॅक्स,सी अणि सी++ प्रोग्रामिंग अॅडव्हान्सड एक्सेल शिकवले जाते.यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स देखील उपलब्ध करून दिला जातो.

हा कोर्स केल्यानंतर आपणास कंप्युटर ऑपरेटर, डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणुन नोकरी करू शकतो.किंवा आपण स्वताचे सायबर कॅफे सुरू करू शकतो.

वेब डिझायनिंगचे काम करू शकतो.स्वताचे कंप्युटर सेंटर सुरू करून इतर मुलांना शिकवु शकतो.

पहिल्या सत्रात काय शिकवले जाते-

कंप्युटर फंडामेंटल

मराठी हिंदी इंग्रजी टायपिंग

एम एस आॅफिस मध्ये -वर्ड एक्सेल पावरपाॅईट

दुसरे सत्र –

  • डिजीटल फायनान्स
  • आॅपरेटिंग सिस्टम
  • इंटरनेट नेटवर्किंग
  • वेब ब्राउजर
  • सायबर सिक्युरिटी

तिसरे सत्र –

  • फोटो शाॅप
  • कोरल ड्रॉ

वेब डिझायनिंग मध्ये बेसिक नाॅलेज

विंडो इंस्टाॅलेशन

चौथे सत्र –

  • टॅली ईआरपी ९
  • कंप्युटर अॅसेमबलिंग बेसिक
  • मर्ज ई आरपी बेसीक

३)DFA (diploma in financial accounting)

हा कोर्स केल्यानंतर आपणास अकाऊंटंट डेटा एन्ट्री ऑपरेटर कंप्युटर ऑपरेटर म्हणुन कुठेही नोकरी प्राप्त करु शकतो.

डेटा एन्ट्री ऑपरेटर कंप्युटर ऑपरेटर म्हणून जाॅब करू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा उत्तम कोर्स आहे.

अकाऊंटच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक अकाऊंटं संबंधित बेस्ट कोर्स मानला जातो.

हा कोर्स केल्यानंतर आपणास डेटा एन्ट्री ऑपरेटर कंप्युटर ऑपरेटर सोबत अकाऊंटट म्हणून देखील कुठेही नोकरीला लागता येते.

यात सुरूवातीला आपणास कंप्युटरचे फंडामेटल बेसिक नाॅलेज दिले जाते.एम एस वर्ड,एम एस एक्सेल,एम एस पावरपाॅईट एम एस अॅक्सिस देखील शिकवले जाते.

यात आपणास इंटरनेट ईमेल वगैरेचे नाॅलेज दिले जाते.याचसोबत आपणास यात फायनान्शिअल अकाउंटिंगचे बेसिक नाॅलेज दिले जाते.टॅली ईआरपी ९,टॅक्सेशन वगैरे देखील शिकवले जाते.ह्या कोर्सचा कालावधी सहा महिने ते ९ महिने इतक्या कालावधीचा असतो.

४)ADFA(advanced diploma in financial accounting)

यात आपणास DCA,ADCA,DFA कोर्स मध्ये जे घटक शिकवले जातात ते सर्व घटक शिकवले जातात शिवाय अकाउंटिंगचे अॅडव्हान्सड नाॅलेज देखील यात दिले जाते.

ह्या कोर्समध्ये आपणास फायनान्स संबंधित बेसिक पासुन अॅडव्हान्सड लेव्हल पर्यंत पुर्ण माहिती दिली जाते.

हा कोर्स केल्यानंतर आपण कुठल्याही बॅकेत अकाऊंटट म्हणून लागु शकतो.

म्हणुन कंप्युटर ऑपरेटर,डेटा एन्ट्री ऑपरेटर तसेच अकाऊंटट म्हणून कुठेही जाॅबला लागण्यासाठी आपण हा कोर्स करणे अधिक उत्तम ठरते.