अकाऊंटंट बनण्यासाठी कोणता कोर्स,डिप्लोमा करायला हवा?Which course and diploma best for accounting jobs in Marathi

अकाऊंटंट साठी कोणता कोर्स,डिप्लोमा करायला हवा?Which course and diploma best for accounting jobs in Marathi

आज अकाऊंटिंगशी संबंधित बाजारात असे अनेक कोर्स डिप्लोमा उपलब्ध आहेत जे अकाऊंटट बनण्यासाठी आपण करू शकतो.

ज्यात एक वर्षाचा तसेच दोन वर्षांचा डिप्लोमा आहे.तीन महिन्यांचा अणि चार वर्षांचा कोर्स देखील उपलब्ध आहे.

अकाऊंटंट बनण्यासाठी आपणास अकाऊंट ह्या विषयाची आवड असणे आवश्यक आहे.अकाउंटिंगचे काम करण्याचा चांगला अनुभव असायला हवा.

पण अकाऊंटट बनण्यासाठी ह्या सर्व कोर्समध्ये,डिप्लोमां मध्ये कोणता कोर्स तसेच डिप्लोमा करणे आपल्यासाठी अधिक उत्तम ठरेल हे आपणास माहीत नसते.

ह्याच करीता आजच्या आजच्या लेखात आपण अकाऊंटट बनण्यासाठी कोणता महत्वाचा कोर्स तसेच डिप्लोमा करणे उत्तम ठरेल हे जाणुन घेणार आहोत.

अकाऊंटंट बनण्यासाठी कोणती डिग्री घ्यायला हवी तसेच कोर्स करायला हवा?

अकाऊंटंट बनण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम बी काॅमची डिग्री प्राप्त करणे आवश्यक आहे.यात आपण बी काॅम आॅनर्स देखील करू शकता किंवा साधे बी काॅम देखील करू शकतात.

बी काॅम नंतर आपण एम काॅम ही मास्टर डिग्री देखील प्राप्त करू शकतात

यानंतर बी काॅम एम काॅम डिग्री प्राप्त केल्यानंतर अकाऊंटंशी संबंधित बेसिक नाॅलेज प्राप्त होईल असा एखादा चांगला डिप्लोमा कोर्स आपण करून घ्यायला हवा.ज्यात आपल्याला बेसीक कंप्युटर अकाऊंटिंगची माहीती दिलेली असेल.कमीत कमी दोन ते तीन अकाऊंटिंगच्या साॅफ्टवेअरचे आपणास उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.

बी काॅम नंतर आपण एल एलबी इन टॅक्स केल्यास आपणास प्रोफेशनल टॅक्स लाॅयर टॅक्स सल्लागार बनता येते.

See also  भारतातील सर्वात प्रभावी प्रेरणादायी वक्ते कोण आहेत ?-  Top 10 motivational speakers in India

याचसोबत अकाऊंटिंगच्या कामाचा अनुभव प्राप्त करण्यासाठी आपण टॅक्स वकिल,टॅक्स सल्लागार,सिनिअर अकाऊंटंट,सीए यांच्या हाताखाली किमान

एक दोन वर्षे काम करायला हवे.याने आपल्याला अकाउंटिंगचे कामाचा अनुभव प्राप्त होईल.

Which course and diploma best for accounting jobs in Marathi
Which course and diploma best for accounting jobs in Marathi

अकाऊंटंट बनण्यासाठी आपण कोणता डिप्लोमा करू शकतो?

अकाऊंटंट बनण्यासाठी आपण दोन डिप्लोमा कोर्स करू शकतो.यात एक डिप्लोमा हा बेसिक लेव्हलचा आहे.ज्यात अकाऊंटिंग संबंधित बेसिक नाॅलेज देण्यात आले आहे.

अणि एक डिप्लोमा अॅडव्हान्सड लेव्हलचा आहे ज्यात कंप्युटरचे अकाउंटिंगचे फंडामेटल बेसिक नाॅलेज पासुन अकाउंटिंगचे अॅडव्हान्सड नाॅलेज आपणास देण्यात येते.

अकाऊंटींगचे बेसिक नाॅलेज प्राप्त करण्यासाठी –

 • डिप्लोमा इन फायनान्शिअल अकाउंटिंग-diploma in financial accounting
 • हा कोर्स केल्यानंतर आपणास अकाऊंटंट डेटा एन्ट्री आॅपरेटर कंप्युटर आॅपरेटर म्हणुन कुठेही नोकरी प्राप्त करु शकतो.
 • डेटा एन्ट्री आॅपरेटर कंप्युटर आॅपरेटर म्हणून जाॅब करू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा उत्तम कोर्स आहे.
  अकाऊंटच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक अकाऊंटं संबंधित बेस्ट कोर्स मानला जातो.
 • हा कोर्स केल्यानंतर आपणास डेटा एन्ट्री आॅपरेटर कंप्युटर आॅपरेटर सोबत अकाऊंटट म्हणून देखील कुठेही नोकरीला लागता येते.

यात सुरूवातीला आपणास कंप्युटरचे फंडामेटल बेसिक नाॅलेज दिले जाते.एम एस वर्ड,एम एस एक्सेल,एम एस पावरपाॅईट एम एस अॅक्सिस देखील शिकवले जाते.

यात आपणास इंटरनेट ईमेल वगैरेचे नाॅलेज दिले जाते.याचसोबत आपणास यात फायनान्शिअल अकाउंटिंगचे बेसिक नाॅलेज दिले जाते.टॅली ईआरपी ९,टॅक्सेशन वगैरे देखील शिकवले जाते.

ह्या कोर्सचा कालावधी सहा महिने ते ९ महिने इतक्या कालावधीचा असतो.

अकाऊंटींगचे अॅडव्हान्सड नाॅलेज प्राप्त करण्यासाठी-

 • अॅडव्हान्सड डिप्लोमा इन फायनान्शिअल अकाउंटिंग-advanced diploma in financial accounting
 • यात आपणास DCA,ADCA,DFA कोर्स मध्ये जे घटक शिकवले जातात ते सर्व घटक शिकवले जातात शिवाय अकाउंटिंगचे अॅडव्हान्सड नाॅलेज देखील यात दिले जाते.
 • ह्या कोर्समध्ये आपणास फायनान्स संबंधित बेसिक पासुन अॅडव्हान्सड लेव्हल पर्यंत पुर्ण माहिती दिली जाते.
  हा कोर्स केल्यानंतर आपण कुठल्याही बॅकेत कंपनीत अकाऊंटट म्हणून लागु शकतो.
 • म्हणुन कंप्युटर आॅपरेटर,डेटा एन्ट्री आॅपरेटर तसेच अकाऊंटट म्हणून कुठेही जाॅबला लागण्यासाठी आपण हा कोर्स करणे अधिक उत्तम ठरते.
 • ह्या कोर्सचा कालावधी एक वर्ष इतका असतो.हा कोर्स आपणास दहावी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तसेच पदवीनंतर देखील करता येतो.हया कोर्सची फी १५ ते २० हजार इतकी असते.
 • ज्यांचे काॅमर्स मधुन बारावी उत्तीर्ण केलेली आहे अकाऊंटंट बनण्यासाठी त्यांच्यासाठी हा एक उत्तम कोर्स आहे.
 • यात एम एस वर्डचे एम एस एक्सेलचे अॅडव्हान्सड नाॅलेज दिले जाते.शंभरपेक्षा जास्त एक्सेलचे फाॅरमुले शिकविण्यात येतात.
 • सर्व एक्सेल रिबन आॅप्शन टुलस शिकवले जातात.एम एस एक्सेल २००७,२०१० अणि २०१३ देखील शिकवले जाते.टॅलीचे पुर्ण नाॅलेज दिले जाते.यात आपणास रिअल लाईफ प्रोजेक्ट असाइनमेंट करीता ट्रेनिंग दिले जाते.
 • याचसोबत कंप्युटरचे बेसिक फंडामेटल नाॅलेज प्राप्त करण्यासाठी आपण खालील दिलेला कोर्स करायला हवा.
 • अॅडव्हान्सड डिप्लोमा इन कंप्युटर अॅप्लीकेशन -advanced diploma in computer application
See also  डाँ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्यावर निबंध - Sarvepalli Radhakrishnan Essay In Marathi