टीईटी परीक्षेचा निकाल उद्या २४ मार्च रोजी घोषित केला जाणार – TAIT exam result in Marathi

टीईटी परीक्षेचा निकाल उद्या २४ मार्च रोजी घोषित केला जाणार Tait exam result in Marathi

महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वतीने घेतल्या जात असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल उद्या घोषित केला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वतीने हा निकाल मार्च महिन्यात २५ मार्चपर्यंत कधीही घोषित केला जाईल असे कळवले होते.

खुप वाट पाहुनही निकाल लागल नसल्याने परीक्षेस बसलेल्या अनेक परीक्षार्थी उमेदवारांची मने नाराज व्हायला लागली होती.पण आता अचानक निकालाची तारीख घोषित झाल्याने सर्व उमेदवारांना आनंदाचा धक्का बसला आहे

महाराष्ट्र राज्यामधील जेवढयाही सरकारी, निमसरकारी,अनुदानित शाळा आहे तिथे शिक्षक म्हणून नियुक्ती होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला ही परीक्षा देणे गरजेचे असते.

ही परीक्षा यासाठी घेतली जाते कारण शाळेला एक उत्तम दर्जेदार शिक्षक प्राप्त व्हायला हवा.जेणेकरून विद्यार्थ्यांना देखील उत्तम दर्जाचे शिक्षण प्राप्त होईल.

ज्यांना शाळेमध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती हवी आहे असे उमेदवार ही परीक्षा देत असतात.

फेब्रुवारी मध्ये घेण्यात आलेल्या ह्या परिक्षेचा निकाल पाच मार्च रोजी जाहीर केला जाणार होता पण काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे निकालाची तारीख लांबणीवर टाकण्यात आली होती.

अणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेत जे प्रश्न विचारले गेले परीक्षेस बसलेल्या कित्येक उमेदवारांनी त्यास विरोध दर्शविला त्यामुळे देखील निकाल लांबणीवर पडला असल्याचे सांगितले जात आहे.

ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती त्यांना आपल्या सोडविलेल्या पेपर मध्ये प्राप्त झालेल्या गुणांची माहीती लाॅग इन वर उपलब्ध करून देण्यात आली होती.

पण उमेदवारांना प्रत्यक्ष निकाल हातात अद्याप प्राप्त झालेला नव्हता जो आता २४ मार्च रोजी प्राप्त होणार आहे.

सर्व उमेदवारांना आपला निकाल “Maharashtra State Council of Examination” https://www.mscepune.in ह्या महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वेबसाईटवर जाऊन पाहता येणार आहे.

काही तांत्रिक कारणांमुळे निकाल घोषित करण्यात आला नाही निकाल पुढे ढकलण्यात आला तर महाराष्ट्र राज्य परिषदेच्या आॅफिशिअल वेबसाईटवर https://www.mscepune.in याबाबत उमेदवारांना नोटीफिकेशन दिले जाईल.असे महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

See also  महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजना २०२३ विषयी माहिती - Maharashtra Berojgar Bhatta scheme 2023

पण अद्याप असे कुठलेही नोटीफिकेशन आलेले नाहीये म्हणून निकाल उद्या घोषित होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

टेटच्या परीक्षेसाठी २ लाख ४९ हजार सातशे २६ इतक्या उमेदवारांनी आपली नोंदणी केली होती.अणि परीक्षेला २ लाख ४९ हजार सातशे २६ इतके विद्यार्थी बसले होते.

ज्या उमेदवारांनी एकदा सोडून दोन वेळा तीन वेळा म्हणजे डबल फाॅम भरले होते त्यांना बाजुला काढुन दोन लाख २८ हजार ८४ इतके उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले होते.काही उमेदवारांना डबल प्रवेशपत्र देखील प्राप्त झाले आहे.

प्रवेशपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांमध्ये २ लाख १६ हजार ४४४ उमेदवारांनी परीक्षा दिली होती.म्हणजे २ लाख १६ हजार ४४४ इतक्या उमेदवारांना उद्या आपला रिझल्ट पाहायला मिळणार आहे.

सर्व उमेदवारांना एकाच ठिकाणी आपला रिझल्ट एका पीडीएफ स्वरुपा मध्ये पीडीएफ लिस्ट मध्ये उपलब्ध करून दिला जाऊ शकतो.

Leave a Comment