किटटी ओनिल कोण आहेत? Kitty O’Neil in Marathi

किटटी ओनिल कोण आहेत? Kitty O’Neil in Marathi

किट्टी ओ’नीलचा 77 वा वाढदिवस आजच्या गुगल डूडल द्वारे साजरा केला जातो आहे.गुगलने आपल्या आॅफिशिअल वेबसाईटवरून किटटी ओनिल यांना आदरांजली देखील वाहीली आहे.

किटटी ओनिल कोण आहेत? Kitty O’Neil in Marathi – google doodle

किटटी ओनिल कोण आहे?

किटटी ओनिल ही एक अमेरिकेत राहत असलेली अमेरिकेतील रहिवासी स्त्री आहे.किटटी ओनिल ह्या स्टंट वुमन आणि रेसर ह्या नावाने देखील आपणास परिचित आहे.

लहानपणापासून मूकबधिर असणारी किटटी ओनिल ही रेसिंग-रेकॉर्ड ब्रेकर आहे तिला जगातील सर्वात वेगवान महिला” म्हणून देखील ओळखले जाते.

किटटी ओनिल यांचा जन्म अणि कुटुंब –

किटटी ओनिल यांचा जन्म अमेरीका देशामधील क्रोपर्स क्रिस्टी टेक्सास येथे झाला होता.किटटी यांच्या पित्याचे नाव जाॅन ओनिल असे आहे.अणि मातेचे नाव पॅटनी क्राॅप्टन ओनिल असे होते.

किटटीला तिच्या लहानपणापासून बहिरेपणा मुकेपणा आल्यामुळे पॅटनी क्राॅप्टन ओनिल यांनी किटटी ओनिल यांना लिपसिंग म्हणजे ओठांच्या हालचाली वरून समोरचा काय बोलतो आहे किंवा बोलणार आहे हे ओळखण्याची कला कौशल्य शिकवले होते.संवादाचे अनेक कौशल्य देखील शिकवले.

किटटी ओनिल हिचे वडील युनायटेड स्टेट्स आर्मी एअर कोर्स मध्ये आॅफिसर पदावर कार्यरत होते.जेव्हा किटटी ओनिल लहान होत्या तेव्हा एका विमान अपघातात त्यांना आपल्या वडिलांना गमवावे लागले होते.

खुप कमी वयात किटटी ओनिल यांना अनेक आजारांनी त्रस्त केले होते.दोन वर्षांची असतानाच किटटी हिला बहिरेपणाची तसेच मुकबधिरपणाची समस्या उदभवली होती.

पण आपल्या आजारपणाला त्रासाला आपल्या स्वप्नांच्या आड किटटीने कधीच येऊ दिले नाही.उलट सर्व त्रास समस्या यांच्याकडे एक संधी म्हणून तिने बघितले.

हिंडेनबर्ग संशोधन काय आहे? Hindenburg research meaning in Marathi

किटटी ओनिल मृत्यु –

किटटी ओनिल यांचा मृत्यू हा २०१८ मध्ये २ नोव्हेंबर रोजी युरेका साऊथ दकोटा येथे नयुमोनिया आजारामुळे झाला होता.अशा प्रकारे किटटी ओनिल यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले.

किटटी ओनिल यांच्या जीवनावर आधारित एक बायोपिक देखील १९७९ मध्ये रिलीज करण्यात आलेला आहे.ज्याचे नाव द किटटी ओनिल स्टोरी असे होते.

किटटी ओनिल हिने आतापर्यंत तयार केलेले रेकाॅर्ड-

किटटी वुमन यांना अलाईव्ह म्हणून मुकुट देऊन सन्मानित करण्यात आले होते.किटटीला हा मुकुट १९७६ मध्ये ५१२.७६ मैल प्रती तास एवढया गतीने अल्व्हाॅर्ड ओलांडण्यासाठी दिला गेला होता.

ओनिलला सगळ्यात पहिले ड्राईव्हिंग करण्याची अत्यंत आवड होती.पण मनगटाच्या दुखापतीमुळे अणि आजारामुळे तिला ड्राईव्हिंग सोडावी लागली.

यानंतर देखील किटटी थांबली नाही तिने मोटारसायकल रेसिंग अणि वाॅटर स्कीईंग करायला प्रारंभ केला.हे एक हाय स्पीड स्पोर्टस आहे.

किटटी आग लावताना उंचावरून खाली पडणे उंचावर असताना हेलिकॉप्टर मधुन उडी मारणे असे अनेक भयानक स्टंट देखील केले होते.

७० व्या शतकामध्ये किटटीने द ब्लुज ब्रदस द वंडर वुमन बायोनिक वुमन अशा अनेक लोकप्रिय सिरीयल तसेच मुव्ही मध्ये स्टंट डबल म्हणुन बडया पडद्यावर इंट्री केली.तिने महिलांचा लॅणड स्पीड रेकार्ड देखील २०० मैल प्रती तास अंतराने मोडला आहे.

स्टंट अनलिमिटेड नावाच्या टाॅप स्टंट परफाॅमनस संस्थेत प्रवेश घेणारी ओनिल ही पहिली महिला स्टंट परफाॅमर आहे.

ज्यांना आपल्या ध्येयाच्या प्राप्ती मध्ये शारीरिक आर्थिक मानसिक अशी कुठलीही अडचणी येत आहेत शारीरिक आजार घरगुती समस्यांना तोंड द्यावे लागत आहे

अशा लोकांसाठी किटटी ओनिल एक खुप मोठी प्रेरणा ठरू शकते.जिने कधीही आपल्या आजारपणाला आपली कमजोरी बनु दिले नाही.