खुशखबर खुशखबर! आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना सरकार देते आहे ३ लाख रुपये – Maharashtra Inter-Caste Marriage Scheme

आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना सरकार देते आहे ३ लाख रुपये Government scheme in Marathi

ज्या तरूण मुला,मुलींनी आंतरजातीय विवाह केला आहे अशा जोडप्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

महाराष्ट्र सरकारच्या वतीने समाजातील जातीभेद दुर करण्यासाठी अणि आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी अस्पृश्यता निवारण करण्यासाठी,समानता लागु करण्यासाठी सरकार कडुन ही आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना राबविण्यात येत आहे.

ह्या योजनेअंतर्गत ज्या मुलाने किंवा मुलीने आंतरजातीय विवाह केलेला आहे.

म्हणजेच जातीच्या बाहेर अनुसूचित जाती मधील मुलाशी/मुलीशी विवाह केला आहे अशा विवाहीत मुलाला/ मुलीला जोडप्याला सरकारकडून ५० हजार रुपये अणि आंबेडकर फाऊंडेशन कडुन २.५० लाख इतकी प्रोत्साहन पर रक्कम दिली जाणार आहे.

फक्त ह्या योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी सदर विवाहीत जोडप्याकडे आपल्या आंतरजातीय विवाहाचे प्रमाण देणारे विवाह प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

सरकारच्या ह्या योजनेचा लाभ फक्त आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांनाच दिला जाणार आहे.

जो तरुण किंवा तरूणी सर्वसामान्य वर्गातील आहे तिने किंवा त्याने इतर जातीच्या मुलीशी किंवा मुलाशी विवाह केला आहे.अशा जोडप्यांनाच सरकारकडून ह्या योजनेचा लाभ प्राप्त करून दिला जाणार आहे.

ह्या योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी आंतर जातीय विवाह केलेल्या मुलीला तसेच मुलाला हिंदु विवाह कायदा १९५५ तसेच १९५४ नुसार एक वर्षाच्या आत आपल्या विवाहाची नोंदणी करणे आवश्यक आहे.

ज्या व्यक्तीने दुसरा विवाह केला आहे अशा व्यक्तींना ह्या योजनेचा लाभ दिला जात नाही.हया योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी जर कुठल्याही व्यक्तीकडुन चुकीची बनावट खोटी माहिती देण्यात आली तर त्याच्यावर शासनाकडुन कठोर कारवाई केली जाईल.

See also  एनसी व्हीटी आयटी आयचा निकाल जाहीर - NCVT ITI result 2023 in Marathi

ज्या व्यक्तींनी केंद्र अणि राज्य सरकारने राबविलेल्या इतर योजनांचा देखील लाभ घेतलेला आहे अशा व्यक्तींच्या लाभार्थी रक्कमेतुन ती रक्कम कापली जाणार आहे.

शासनाने आतापर्यंत ३.१९ कोटी इतका निधी हया प्रोत्साहन पर योजनेसाठी देण्याचा ठरवले आहे.

आपण देखील आंतरजातीय विवाह केलेला आहे अणि आपल्याला देखील शासनाच्या ह्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन पर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपणास आपल्या विभागातील आमदार तसेच खासदार यांच्या कडे जावे लागेल आणि ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.

किंवा ह्या योजनेसाठी फाॅम भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडुन आपणास जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद येथे जमा करायचा आहे.आपला हा अर्ज मग आंबेडकर फाऊंडेशन कडे पाठविण्यात येणार आहे.

यानंतर आपण अर्जात दिलेली माहीती बरोबर आहे किंवा खोटी याची चौकशी शहानिशा केली जाईल मग दोघे पती पत्नी यांच्या बॅक खात्यामध्ये दीड लाख इतकी रक्कम जमा केली जाते.अणि बाकीच्या एक लाखाची एफडी करण्यात येत असते.

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे –

Maharashtra Inter-Caste Marriage Scheme
Maharashtra Inter-Caste Marriage Scheme
  1. जातीचा दाखला
  2. विवाह नोंदणी दाखला तसेच प्रमाणपत्र
  3. विवाह केला असल्याचे केलेले प्रतिज्ञापत्र
  4. सदर लग्न आपले पहिले लग्न आहे याचा पुरावा देखील देणे आवश्यक आहे.
  5. मुलगा आणि मुलगी दोघांचा शाळा सोडल्याचा दाखला
  6. पती आणि पत्नी दोघांच्या उत्पन्नाचा दाखला लागणार आहे.
  7. दोघांची बॅकेमधली संयुक्त खात्याबाबतची माहीती जसे की अकाऊंट नंबर आय एफसी कोड बॅक पासबुक झेरॉक्स इत्यादी.
  8. दोन पासपोर्ट साईज फोटो

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी –

  1. अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  2. विवाह झालेल्या मुलीचे वय १८ पेक्षा अणि मुलाचे वय २१ पेक्षा अधिक नसावे.
  3. विवाह झालेल्या जोडप्यांमध्ये मुलगा किंवा मुलगी अनुसूचित जाती मधील असणे आवश्यक आहे.
  4. शासनाकडुन विवाहाची प्रोत्साहन पर रक्कम प्राप्त करण्यासाठी जोडप्याने कोर्ट मॅरेज करायला हवे.
See also  एच पी सी एल मध्ये परमनंट भरती सुरू- अनुभवी किंवा फ्रेशर उमेदवार करीता - HPCL recruitment 2023 in Marathi

ह्या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना दिला जाणारा निधी हा केंद्र अणि राज्य सरकारकडुन अणि आंबेडकर फाऊंडेशन कडुन दिला गेलेला आहे.यातील निधीची २५ टक्के इतकी रक्कम राज्य सरकारने दिली आहे व‌‌‌ २५ टक्के रक्कम केंद्र सरकारकडुन देण्यात आली आहे.अणि बाकीची पन्नास टक्के रक्कम आंबेडकर फाऊंडेशन कडुन देण्यात आली आहे.

ह्या योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम लाभार्थी व्यक्तीच्या बॅक खात्यात थेट ट्रान्स्फर केली जाते.म्हणुन‌ ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आपले आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करून घेणे गरजेचे आहे.

3 thoughts on “खुशखबर खुशखबर! आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना सरकार देते आहे ३ लाख रुपये – Maharashtra Inter-Caste Marriage Scheme”

  1. विवाह झालेल्या मुलीचे वय १८ पेक्षा अणि मुलाचे वय २१ पेक्षा अधिक असावे की नसावे?..

  2. अंतर जातीय योजनेचा फायदा नाही मिळाला 2016 केल आहे
    तरी मग ही योजना काय कामाची पेपर जमा करताना काय हालत होते ते जमा करून सुद्धा मिळत नाही 9773598213

  3. जर कोण ही योजनेबादल माहिती असेल तर द्यावी कुठे या साठी चौकशी करावी लागेल ते प्लीज सांगावे 9773598213

Comments are closed.