BSF RECRUITMENT 2023 – सीमा सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल पदाच्या 26 जागांसाठी भरती सुरू – BSF RECRUITMENT 2023 IN MARATHI

सीमा सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल पदाच्या 26 जागांसाठी भरती सुरू – BSF RECRUITMENT 2023 IN MARATHI

सीमा सुरक्षा दलामध्ये विविध पदांवर भरती केली जात आहे.या भरतीसाठी अर्ज मागविणे सुरू आहे.

सर्व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आॅनलाईन पद्धतीने आपापले अर्ज सादर करायचे आहे.

ज्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल त्यांना संपूर्ण भारतात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

पदांचे नाव –

1)हेड कॉन्स्टेबल/व्हेटनरी

एकुण जागा -18

2) काॅन्स्टेबल/केनेलमन

एकुण जागा -8 जागा

हेड कॉन्स्टेबल व्हेटनरी अणि काॅन्स्टेबल केनेलमन ही दोघे पदे मिळुन एकुण 26 जागांसाठी भरती केली जात आहे.

शैक्षणिक पात्रतेची अट –

1)हेड कॉन्स्टेबल व्हेटनरी या पदासाठी उमेदवाराचे किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.अणि त्याने व्हेटनरी असिस्टंट या पदाचा कोर्स देखील केलेला असावा.

सदर पदासाठी किमान एक वर्ष अनुभव असणे देखील गरजेचे आहे.

2)काॅन्स्टेबल केनेलमन पदासाठी उमेदवाराचे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पशुवैद्यकीय शासकीय प्राणी हाॅस्पिटल दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय तसेच सरकारी फार्म मध्ये किमान दोन वर्षे हाताळणीचा अनुभव असायला हवा.

शारीरिक पात्रतेची अट –

पुरूषांची उंची 165 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे तर महिलांची उंची 150 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे.

पुरुषांसाठी छाती 76/81 सेंटीमीटर इतकी असणे आवश्यक आहे.

वयाची अट –

20 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्ष इतके असणे आवश्यक आहे.

वयातील सवलत –

जे उमेदवार ओबीसी कॅटॅगरी मधील आहेत अशा उमेदवारांना वयामध्ये तीन वर्षे इतकी सुट देण्यात आली आहे तर एस सी एस टी कॅटॅगरी मधील उमेदवारांना पाच वर्षे इतकी वयात सुट देण्यात आली आहे.

See also  प्रधानमंत्री लखपती दीदी योजना काय आहे? lakhpati didi yojna in Marathi

वेतन –

ज्या उमेदवारांची हेड कॉन्स्टेबल व्हेटनरी पदासाठी अंतिम निवड केली जाईल त्यांना 25 हजार 500 ते 81 हजार 100 इतके वेतन प्राप्त होणार आहे.

ज्या उमेदवारांची काॅन्सटेबल केनेलमन पदासाठी अंतिम निवड केली जाईल त्यांना 21 हजार 700 रूपये ते 69 हजार 100 रूपये इतके वेतन प्राप्त होणार आहे.

अर्ज करण्याची फी शुल्क –

जे उमेदवार ओबीसी तसेच ईडबलयुएस कॅटॅगरी मधील आहेत त्यांना 100 रूपये इतकी अर्ज फी भरावी लागणार आहे.

जे उमेदवार एस सी एस टी कॅटॅगरी मधील आहेत त्यांना अणि महिलांना कुठलीही अर्ज फी भरावी लागणार नाहीये.

अर्ज करण्याची सुरूवात –

सदर दोन्ही पदांच्या भरतीसाठी अर्ज करावयास 3 फेब्रुवारी 2023 पासुन सुरूवात होणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख –

सर्व पात्र उमेदवारांनी 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत आॅनलाईन पदधतीने आपला अर्ज सादर करायचा आहे.

उमेदवारांनी कुठल्याही पदासाठी अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यायची आहे.अणि पदासाठी अंतिम तारीख संपण्याच्या आधी अॅप्लाय करायचे आहे.

अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्र देखील जोडायचे आहे अर्ज करताना कागदपत्रे नीट स्कॅन करायचे आहेत मग अपलोड करायचे आहे.

पदासाठी अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात

अर्ज सादर

https://rectt.bsf.gov.in/registration/basic-details?guid=e91d74f3-962d-11ed-bb00-0264d54d41fa