प्रधानमंत्री लखपती दीदी योजना काय आहे? Lakhpati Didi yojna in Marathi
लखपती दीदी योजनेअंतर्गत दोन करोड पेक्षा अधिक महिलांना लखपती बनवून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले जाणार आहे.
लखपती दीदी योजनेंतर्गत जवळपास 15,000 पेक्षा अधिक महिला बचत गटांना ड्रोन चालवण्याचे काम शिकविण्यात येणार आहे आणि सोबतच महिलांना ड्रोनची दुरुस्ती करण्याचे काम देखील प्रशिक्षण देऊन शिकवले जाणार आहे.
लखपती दीदी योजनेअंतर्गत गावपातळीवर स्थापन झालेल्या महिलांच्या बचत गटांना तांत्रिक कामांचे प्रशिक्षण दिले जाईल तसेच त्यांच्यासाठी रोजगाराच्या विविध संधी देखील निर्माण केल्या जातील.
सध्या कृषी क्षेत्रातही ड्रोनचा वापर अधिकतम प्रमाणात वाढू लागला आहे,त्यामुळे हे तंत्रज्ञान शेतात काम करणाऱ्या अनेकांसाठी चांगली संधी बनू शकते.
सदर योजनेअंतर्गत प्रशिक्षण प्राप्त केल्यानंतर महिला आपल्या शेतात देखील ह्या ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकतात.
ह्या योजनेमुळे आपला देश आर्थिक दृष्ट्या सक्षम तर बनेलच शिवाय याने आपल्या देशातील कृषी तंत्रज्ञान क्षेत्रास देखील अधिक बळकटी प्राप्त होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले होते की जेव्हा आपण एखाद्या गावखेडयात जात असतो तेव्हा तिथे आपणास अंगणवाडी मधील दीदी,बॅक मधील तसेच औषध देणारी दीदी दिसुन येत असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्र लखपती दीदी योजनेअंतर्गत गावात दोन करोड लखपती दीदी बनवणे आहे.लखपती दीदी योजना ही महिलांशी संबंधित बचत गटाशी जोडण्यात आलेली महत्वाची योजना आहे.
ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे महिलांना ड्रोन चालविण्याचे तसेच त्यांची दुरूस्ती करण्याची ट्रेनिंग देऊन त्यांना रोजगार प्रदान करणे अणि आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनवणे आहे.
शासनाच्या ह्या योजनेमुळे महिला लखपती दीदी बनुन आत्मनिर्भर तर बनतील शिवाय देशाच्या आर्थिक प्रगतीत विकासात पुरूषांच्या बरोबरीने वाटा घेताना दिसुन येतील.
सध्या ही योजना अनेक राज्यांत सुरू देखील करण्यात आली आहे ह्या योजनेअंतर्गत महिला आपली प्रगती करताना दिसुन येत आहे.आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील करत आहे.