चंद्रयान ३ लॅडिंग अपडेट Chandrayaan 3 landing update in Marathi

चंद्रयान ३ लॅडिंग अपडेट Chandrayaan 3 landing update in Marathi

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आपल्या टविटर वरून सर्व भारतीयांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

इस्रोने आपल्या टविटर वरून टविट करत सांगितले आहे की भारताचे चंद्रयान ३ हे चंद्राच्या खुप जवळ पोहोचले आहे.

विक्रम लॅडर रविवारी २० आॅगस्ट २०२३ रोजी पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान चंद्राच्या जवळ पोहोचले होते.
आता विक्रम लॅडर चंद्रापासुन फक्त २५ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

याचसोबत विक्रम लॅडरची दुसरी डिबुस्टींग देखील यशस्वी झाली आहे.

चंद्रयान ३ एकदम योग्य पद्धतीने चंद्राच्या दिशेने जात आहे.असे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने म्हटले आहे.

डिबुस्टींग प्रक्रिया म्हणजे काय?

डिबुस्टींग ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये चंद्रयान ३ चा वेग कमी करण्यात आला आहे.चंद्रयानाचा वेग कमी करण्याची ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर चंद्रयानाला पुढच्या कक्षेत पाठवले जाते.

ह्या प्रक्रियेमुळे चंद्रयान ३ हे चंद्राच्या पृष्ठभागाच्या खुप जवळ आले आहे.

२३ आॅगस्ट रोजी चंद्रयान ३ चंद्रावर यशस्वीपणे लॅंडिग करताना दिसुन येईल.लॅडिगच्या अगोदर ह्या माॅडयुलला काही अंतर्गत चाचणीला सामोरे जावे लागेल.

चंद्रयान ३ सध्या १३० किलोमीटर १५७ किलोमीटर कक्षेतुन २५ किलोमीटर१३५ किलोमीटर ह्या कक्षेत आले आहे.

म्हणजे आता चंद्राच्या पृष्ठभागापासुन विक्रम लॅडर २५ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.

सध्या विक्रम लॅडर रेटरो फायरींग मोशन मध्ये आहे.म्हणजे विक्रम लॅडर आपली उंची आणि वेग कमी करत आहे.

संपूर्ण भारतातील नागरीक भारताचे चंद्रयान ३ यशस्वीपणे पार पडावे म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या पुजा हवन देखील करत आहेत.

चंद्रयान ३ २३ आॅगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजुन ४ मिनिटांनी चंद्रावर उतरणार आहे.चंद्रयान ३ मिशन करीता पुढील २४ तास अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.

चंद्रयान ३ चे लॅडिग करण्याआधी माॅडयुलची तपासणी केली जाईल अणि नियोजित लॅडिग साईटवर सुर्योदयाची वाट पाहीली जाणार आहे.

See also  जगातील पहिल्या शंभर टक्के इथेनॉल वर चालणारया कारचे फायदे तसेच वैशिष्ट्य काय आहेत? World first ethanol car benefits and features

Leave a Comment