2022 मध्ये गुरू पौर्णिमेला आपल्या गुरूंना गिफ्ट देण्यासाठी गिफ्ट आयडीया- Guru Purnima Best Gift Ideas For Teachers

2022 मध्ये गुरू पौर्णिमेला आपल्या गुरूंना गिफ्ट देण्यासाठी गिफ्ट आयडीया- Guru Purnima Best Gift Ideas For Teachers

आपल्या जीवणाच्या वाटचालीत आपली अमुल्य भुमिका पार पाडणारया आपल्या गुरूंचे आभार व्यक्त करण्यासाठी आपण गुरूपौर्णिमेच्या दिवशी दक्षिणा म्हणुन त्यांना अशी काही तरी चांगली भेटवस्तू देत असतो.जी त्यांच्या नेहमी आठवणीत राहील अणि कामात देखील येईल.

आज आपण गुरू पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना भेटवस्तु देण्यासाठी काही चांगल्या गिफ्ट आयडीयाज विषयी जाणुन घेणार आहोत.

गुरू पौर्णिमेच्या दिवशी आपल्या शिक्षकांना गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आयडिया –

आपल्या शिक्षकांना गुरूपौर्णिमेच्या दिवशी फुलांचा गुच्छ ग्रिटींग कार्ड तसेच आँनलाईन विक्रिस आलेली एखादी महागडी फँशनेबल वस्तु देणे ही सामान्य गोष्ट झाली आहे.

पण मित्रांनो आपण आज दिलेले फुल उद्या कोमेजुन जाईल अणि आपले गुरू ते फेकुनही देतील.आपण दिलेले ग्रिटींग कार्ड तसेच महागडे गिफ्ट देखील त्यांच्या घरात एका कोपरयात पडुन राहील.

म्हणुन आपण आपल्या शिक्षकांना गुरूपौर्णिमेला अशी वस्तु भेट म्हणुन द्यायला हवी ज्याची खरच त्यांना आवश्यकता आहे अणि ती वस्तु रोज त्यांच्या उपयोगात देखील येईल.

चला तर मग जाणुन घेऊया आपण आपल्या शिक्षकांना नेहमी उपयोगात पडतील अशा कोणत्या वस्तु त्यांना गिफ्ट म्हणुन देऊ शकतो.

1)एखादे नवीन प्रेरणादायी विचार असलेले पुस्तक-

एक शिक्षकाला शिक्षण विदया अणि पुस्तके यांचा खुप लळा तसेच जिव्हाळा असतो.

म्हणुन कुठल्याही विदयार्थ्यांला आपल्या गुरूस एखादी चांगली भेटवस्तु द्यायची असेल जी त्यांच्या जीवनात अखेरपर्यत कामे येईल तर ती आहे पुस्तक.

पुस्तक हे भलेही काही वर्षानी फाटुन जाते पण त्यातील वाचलेला एक एक प्रेरणादायक विचार,शब्द आपल्या व्यक्तीमत्वात आत्मसात होत असतो.आपले चरित्र घडवत असतो.

एवढी ताकद विचारांमध्ये असते.अणि मुलांना व्यवस्थित शिकविण्यासाठी शिक्षकांना देखील नियमित वाचन करणे आवश्यक असते.हे तर आपल्या सर्वानाच माहीत आहे.

See also  दिब्रुगड जेलविषयी जाणुन घ्यायच्या १० महत्वाच्या गोष्टी - What is Dibrugarh jail famous for?

म्हणुन आपणास आपल्या गुरूला काही चांगली भेट द्यायची असेल तर आपण एखादे बाजारात आलेले त्यांच्या आवडत्या लेखकाने लिहिलेले नवीन छान प्रेरणादायी पुस्तक गिफ्ट म्हणून द्यायला हवे.

यात आपण एक पुस्तक न देता आपले बजेट असेल त्यांच्या आवडत्या लेखकाने लिहिलेल्या नवीन पुस्तकांचा मोठा संच त्यांना गिफ्ट करू शकतो.

2) रोजनिशी –

समजा आपल्या शिक्षकांना लिहिण्याची देखील आवड असेल रिकाम्या वेळात ते लेखन सुदधा करत असतीलच मग आपण त्यांना एखादी रोजनिशी म्हणजेच डायरी गिफ्ट करू शकतो.

ज्यात ते दिवसभरात त्यांच्या सोबत काय चांगल्या गोष्ठी घडल्या काय वाईट गोष्टी घडल्या,कोणते चांगले अनुभव प्राप्त झाले कोणते वाईट अनुभव प्राप्त झाले.हे सर्व काही लिहु शकतात.

3) पेनाचा सेट किंवा खडुंचा बाँक्स –

आपल्याला जर पुस्तकांचा सेट डायरी न देता आपल्या शिक्षकांना दुसरी काही अशी भेटवस्तु द्यायची असेल जी त्यांच्या नेहमी कामात येईल तर ती आहे खडुंचा बाँक्स किंवा पेनाचा सेट.

कारण आपल्याला वर्गात शिकवताना नेहमी लिहिताना खडु लागत असतो अणि खडु संपल्यावर नवीन खडु आणावा लागतो पण जर आपण आपल्या शिक्षकांना खडुंचा मोठा बाँक्सच गिफ्ट केला तर त्यांची दोन तीन महिन्यांची खडुची चिंताच मिटेल.

याव्यतीरीक्त आपण त्यांना एखादा पेनांचा बाँक्स देखील गिफ्ट करू शकतो.कारण लिहिण्यासाठी रोज त्यांना पेन लागत असतो.

अशातच आपण त्यांना पेनांचा बाँक्सच गिफ्ट दिला तर त्यांना वारंवार पेन विकत घेण्याची तसदी घ्यावी लागणार नाही.

4) डस्टर किंवा बोर्ड :

मित्रांनो आपण पुर्णिमेच्या दिवशी फळा पुसण्यासाठी आपल्या शिक्षकांना एखादे डस्टर गिफ्ट करू शकतो जेणेकरून जेव्हाही आपले शिक्षक त्या डस्टरने फळा पुसतील तेव्हा पहिले त्यांना आपली आठवत येत जाईल की हे डस्टर माझ्या विदयार्थ्याने मला गिफ्ट दिले होते.

याचसोबत आपण पोर्टेबल बोर्ड ज्यावर ते लिहित असतात अणि आपणास शिकवत असतात तो व्हाईट बोर्ड तसेच त्यावर लिहिण्यासाठी वापरला जाणारा लाईट पेन देखील गिफ्ट करू शकतो.

See also  कोलँबोरेशन म्हणजे काय? - Collaboration Meaning In Marathi

5) त्यांच्या आवडीच्या छंदाशी निगडीत तसेच रोज उपयोगात येतील अशा भेटवस्तु –

किंवा याव्यतीरीक्त आपण आपल्या शिक्षकांना गुरूपौर्णिमेला अशी एखादी भेटवस्तु देऊ शकतो जी त्यांच्या आवडत्या छंदाशी निगडीत असेल.किंवा त्यांना ती वस्तु रोज उपयोगात पडेल.

कारण आपल्या रोजच्या कामात विदयाथ्यांंच्या हिताचा विचार करण्यात आपले शिक्षक कुठेतरी स्वताचा छंद जोपासणे विसरून जात असतात.

आपले हे गिफ्ट त्यांना पुन्हा त्यांच्या छंदाला जोपासायची आठवण देऊ शकेल.फक्त यासाठी आपणास आधी त्यांचा छंद जाणून घेणे गरजेचे आहे.

उदा, त्यांना वाचनाची लेखनाची आवड असेल तर पुस्तक गिफ्ट करणे.

त्यांना म्युझिकची गायनाची,गाणे ऐकण्याची आवड असेल तर आपण त्यांना त्यांच्या आवडत्या गाण्यांच्या कँसेटचा सेट.किंवा एखादे म्युझिकल इंस्टुमेंट गिफ्ट देऊ शकतो.ज्याने त्यांचा छंद त्यांना रिकाम्या वेळात जोपासता येईल.

2 thoughts on “2022 मध्ये गुरू पौर्णिमेला आपल्या गुरूंना गिफ्ट देण्यासाठी गिफ्ट आयडीया- Guru Purnima Best Gift Ideas For Teachers”

Comments are closed.