इन्कम स्टेटमेंट विषयी माहीती – Income statement information in Marathi

इन्कम स्टेटमेंट – Income statement information in Marathi

मित्रांनो मागील एका लेखात आपण बँलन्स शीट विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेतली.

आता पुढील लेखात आपण कुठल्याही कंपनीची आर्थिक स्थिति जाणुन घेण्यासाठी उपयुक्त ठरणारया इन्कम स्टेटमेंट विषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

इन्कम स्टेटमेंट काय असते?

इन्कम स्टेटमेंट हे कुठल्याही कंपनीच्या आर्थिक परिस्थितीचे विवरण असते.

यात एका निश्चित कालावधीत कंपनीने किती नफा प्राप्त केला आहे हे दाखवले जात असते.

अणि त्या नफ्यातुन किती पैसे कंपनीसाठी खर्च झाले किती पैशांचा नफा तोटा कंपनीला झाला हे दाखवले जात असते.

इन्कम स्टेटमेंटला कंपनीच्या नफा तोटयाचे विवरण,महसुल विक्रीचे तसेच कमाईचे विवरण असे देखील म्हटले जाते.

इन्कम स्टेटमेंट किती कालावधीकरीता कंपनीकडुन तयार केले जाते?

कुठलीही कंपनी किमान तीन ते सहा महिन्याच्या कालावधीकरीता तसेच कमाल एक वर्षाच्या कालावधीकरीता तिचे इन्कम स्टेटमेंट तयार करत असते.

इन्कम स्टेटमेंट हे साधारणत कुठल्याही कंपनीच्या वार्षिक अहवालात दाखवले जाते.अणि ह्या स्टेटमेंटचा कालावधी देखील एक वर्ष इतकाच असतो.

इन्कम स्टेटमेंटमध्ये कोणत्या बाबी महत्वाच्या बाबी कंपनीकडुन दाखवल्या जातात?

इन्कम स्टेटमेंटमध्ये कुठल्याही कंपनीच्या दोन महत्वाच्या बाबी दाखविल्या जात असतात.

1)महसुल विक्री- revenue and sales

इन्कम स्टेटमेंटमध्ये कुठल्याही कंपनीचा महसुल अणि विक्री दाखवली जाते.ज्यात हे दाखवले जाते की आतापर्यत कंपनीकडुन किती प्रोडक्ट सर्विसची विक्री करण्यात आली आहे त्यातुन कंपनीला किती महसुल प्राप्त झाला आहे.

2)कंपनीचा एकुण खर्च -total expenses

यात हे दाखवले जात असतात की दिलेल्या एका निश्चित कालावधीत कंपनीला आतापर्यत एकुण किती पैसा खर्च करावा लागला आहे?

See also  ईडी आयचा फुलफाँर्म काय होतो?-EDI full form in Marathi

जर आपणास कंपनीला झालेला एकुण प्राँफिट जाणुन घ्यायचा असेल तर कंपनीच्या एकूण महसूल विक्री मधुन आपण कंपनीचा झालेला एकूण खर्च तसेच नफा तोटा वजा करावा.

हे आपण एका फाँरम्युलानुसार समजुन घेऊ.

Company Revenue sales -company expences=company net worth/profit

3) एखाद्या कंपनीला वर्षभरात नफा झाला आहे की तोटा हे आपणास इन्कम स्टेटमेंटवरून कसे कळते?

जेव्हा एखाद्या कंपनीचा संपुर्ण रिव्हीन्यु कंपनीच्या एकुण खर्चापेक्षा जास्त असेल तर समजुन जावे की ती कंपनी सध्या प्राँफिटमध्ये आहे.

अणि जर कंपनीचा संपुर्ण रिव्हीन्यु एकुण खर्चापेक्षा आपणास कमी दिसुन येत असेल तर समजुन जावे की सदर कंपनी सध्या लाँसमध्ये म्हणजेच तोटयात चालली आहे.

कंपनीचे इन्कम स्टेटमेंट कसे बनविले जाते?

इन्कम स्टेटमेंट बनविण्याच्या एकुण दोन प्रमुख पदधती असतात.

1)single step format –

2) multi step format –

1)single step format –

सिंगल स्टेप फाँरमँटमध्ये सर्वप्रथम त्या कंपनीचा एकुण रिव्हीन्यु दाखवला जातो.मग त्याच्याखाली कंपनीचा एकूण खर्च दाखवला जातो.

मग कंपनीच्या सर्व रिव्हीन्युला कंपनीच्या एकुण खर्चामधुन वजा केले जाते.मग यानंतर कंपनीचे पीबीटी-profit before tax प्राप्त होत असते.

मग पीबीटी मधुन आपण कंपनीचा इन्कम टँक्स वजा करुन घ्यायचा.जेणेकरून आपणास कंपनीचे एकुण नेट प्राँफिट तसेच नेट इन्कम मिळत असतो.

2) multi step format –

मल्टी स्टेप फाँरमँटमध्ये सर्वप्रथम कुठल्याही कंपनीचे एकुण रेव्हेन्यु दाखवले जाते.मग त्याच्याखाली त्या कंपनीचा एकुण खर्च दाखवला जातो.जो वेगवेगळया टप्प्यात विभागला जातो.

हे आपण उदाहरणादखल समजुन घेऊ.

यात कंपनीच्या एकुण कमाईमधुन वस्तुंची विक्री किंमत वजा केली जाते.मग आपणास कंपनीचा ग्राँस प्राँफिट मिळतो.

Company Total revenue -cost of good sold

=company gross profit

मग ग्राँस प्राँफिट प्राप्त झाल्यानंतर त्यामधुन एकुण परिचालन खर्च वजा केला जात असतो.तेव्हा आपणास सामान्यपणे चालत असलेला उद्योग धंद्यातील नफा प्राप्त होत असतो.

See also  जीवनातील यशाचं रहस्य - Earl Nightingale - Strangest secret Summary in Marathi

Gross profit -total operation expence

=operating profit

आँपरेटींग प्राँफिटलाच इबिट असे संबोधित केले जाते.

कंपनीवर एखादे कर्ज असल्यास कंपनीला त्या कर्जाचे व्याज देखील द्यावे लागते.ते कंपनीच्या आँपरेटिंग प्राँफिटमधुनच वजा केले जात असते.मग आपणास पीबीटी-profit before tax प्राप्त होत असतो.

Operating profit -company interest

=profit before tax

मग यानंतर जेव्हा आपण पीबीटी मधुन इन्कम टँक्स वजा करतो तेव्हा आपणास कंपनीचा नेट इन्कम/नेट प्राँफिट मिळत असतो.

Pbt -income tax

=net profit/net income

सिंगल स्टेप अणि मल्टी स्टेप फाँरमँट दोघांचाही वापर इन्कम स्टेटमेंटसाठी तसेच नेट प्राँफिट काढण्यासाठी केला जात असतो.पण बहुतेक कंपन्या सिंगल स्टेपचा अधिक वापर करतात.

मल्टीपल फा़ँरमँटचा वापर कंपनीच्या इन्कम स्टेटमेंटला सविस्तर तपशीलवारपणे बघण्यासाठी केला जातो.

इन्कम स्टेटमेंटमध्ये कंपनीचा नेट प्राँफिट दाखवलेला असतो.अणि त्याच खाली ईपीएस देखील दाखवलेला असतो.

इन्कम स्टेटमेंटचे महत्व-

● इन्कम स्टेटमेंट मधुन आपणास एखाद्या कंपनीचा नेट प्राँफिट किती आहे ते कळत असते.नेट प्राँफिट हा कुठल्याही कंपनीच्या सर्व व्यवहार कृतींचा म्हणजेच कुठल्याही कंपनीचा उद्योग धंद्यातील अंतिम नफा मानला जातो.

● याच सोबत इन्कम स्टेटमेंटमध्ये कंपनीचे ईपीएस देखील दाखवले जाते.गुंतवणुकदारांसाठी कंपनीचे ईपीएस खुप महत्वपूर्ण मानले जाते.म्हणुन गुंतवणुकदार कुठल्याही कंपनीच्या ईपीएसवर नजर ठेवत असतात.एखादी कंपनी गुंतवणुकदारांच्या दृष्टीने जास्त अरनिंग पर शेअर अहवालात दाखवत असेल तर अशा कंपनीच्या शेअरची किंमत बाजारात वाढण्याची दाट शक्यता असते.अशा कंपनीचे शेअर खरेदी करणे गूंतवणुकदारांसाठी खुप फायदेशीर ठरते.