महिला सुरक्षा ॲप भोरोक्सा विषयी माहिती – women safety app bhoroxa information in Marathi

महिला सुरक्षा ॲप भोरोक्सा विषयी माहिती women safety app bhoroxa information in Marathi

सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस डी वाय चंद्रचूड कायदामंत्री किरण रिजिजु आणि भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी नुकतेच 7 एप्रिल रोजी गुवाहाटी हाय कोर्टाच्या प्लॅटिनम जुगली समारोहामध्ये एका व्यासपीठावर उपस्थित असताना एक ॲपलाॅच केले आहे.ह्या नवीन अॅपचे नाव भोरोक्सा ॲप असे आहे.

असे सांगितले जात आहे की हे भोरोक्सा ॲप खासकरून महिलांसाठी अणि वृद्धांसाठी लाॅच करण्यात आले आहे.हे ॲपगुवाहाटी हाय कोर्टादवारे डेव्हलप करण्यात आले आहे.

ह्या ॲप चे वैशिष्ट्य असे आहे की ह्या ॲप ला आॅपरेट करण्यासाठी आपणास इंटरनेटची तसेच डेटा पॅकची आवश्यकता नाहीये.हे ॲप आपणास कुठल्याही इंटरनेट कनेक्शन विना देखील वापरता येणार आहे.

ज्या महिला अशा ठिकाणी राहता जिथे इंटरनेटचे कनेक्शन संथ गतीने प्राप्त होते तसेच इंटरनेटची सुविधाच त्या क्षेत्रात उपलब्ध नाही अशा महिलांसाठी हे ॲप फार उपयुक्त ठरणार आहे.

असे सांगितले जात आहे की द्रोपदी मुर्मु यांनी लाॅच केलेल्या ह्या ॲप चा अर्थ भरोसा तसेच विश्वास होतो.

ह्या ॲप च्या माध्यमातून कुठलीही महिला एमरजन्सी तसेच कुठल्याही संकटाच्या परिस्थिती मध्ये इंटरनेट कनेक्शन विना संदेश पाठवू शकणार आहे.

ह्या ॲप मुळे ड्युटी वर तैनात सुरक्षा अधिकारी वर्गाला त्या महिलेचा संदेश पोहचणार आहे तसेच ती महिला सध्या कोठे आहे तिची लोकेशन देखील त्यांना ह्या ॲप दवारे कळणार आहे.

जेणेकरून अधिकारी वर्गाला संकटात सापडलेल्या महिलेची लोकेशन ट्रेस करून घटनास्थळी धाव घेऊन तिची तातडीने मदत करता येणार आहे.

यासाठी सर्व महिलांना फक्त आपल्या मोबाईल मध्ये भोरोक्सा हे झिरो इंटरनेट कनेक्शन वर काम करणारे अॅप डाऊनलोड करून घ्यायचे आहे.

भोरोक्सा ॲप चे महत्व काय आहे?

महिलांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी गुवाहाटी हाय कोर्टादवारे हे ॲप लाॅच करण्यात आले आहे.

हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये इंस्टाॅल करणारी महिला एस ओ एस दवारे आपात्कालीन परिस्थितीत कोणालाही संदेश पाठवू शकणार आहे.

See also  विमानाचा रंग हा सफेद का असतो? Why are Airplanes White in Color?

ह्या ॲप मुळे अडचणीत तसेच एखाद्या संकटात सापडलेल्या महिलेला त्वरीत मदत प्राप्त होणार आहे.