केशुब महेंद्रा कोण होते?

केशुब महेंद्रा कोण होते?

नुकतेच भारत देशातील अब्जाधीश वयोवृध्द उद्योजक व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केशुब महेंद्रा यांचे आज वयाच्या ९९ व्या वर्षी नुकतेच निधन झाले आहे.

केशुब महेंद्रा यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.केशुब महेंद्रा हे महेंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचे माजी अध्यक्ष होते.

केशुब महिंद्रा यांचा जन्म ९ आॅक्टोंबर १९२३ मध्ये शिमला येथे झाला होता.

महिंद्रा कंपनीचे संचालक पद केशुब महेंद्रा यांनी २०१२ मध्ये सोडले होते यानंतर त्यांनी निवृत्ती घेतल्यानंतर महिंद्रा कंपनीची सुत्रे आनंद महिंद्रा यांच्या हातात गेली होती.

नुकत्याच हाती आलेल्या एका अपडेट नुसार असे सांगितले जाते की केशुब महेंद्रा यांच्या नावावर १.२ अब्ज डॉलर पेक्षा अधिक संपत्ती मालमत्ता आहे.

याचसोबत भारतातील सर्वात वृद्ध अब्जाधीश बनण्याचा मान देखील त्यांनी पटकावला आहे.

केशुब महेंद्रा हे सर्वप्रथम आपल्या वडिलांच्या कंपनीत १९४७ पासुन काम करत होते.हया कंपनीत काम करताना केशुब महेंद्रा यांनी लोकांना उपयुक्त ठरतील अशा अनेक वाहनांची निर्मिती करण्याचे काम केले.

याचसोबत ही तयार केलेली वाहनांची विक्री करण्याचे काम देखील केशुब महेंद्रा स्वता करीत होते.पुढे जाऊन कालांतराने महिंद्रा कंपनीची सर्व सुत्रे केशुब यांच्या वडिलांनी त्यांच्या हातात सोपवली.

तेव्हापासून तब्बल ४८ वर्षे त्यांनी हा सर्व कंपनीचा कारभार सांभाळण्याचे काम केले होते.साधारणत २०१२ पर्यंत केशुब यांनी कंपनीचा सर्व कारभार सांभाळला.

आपल्या ह्या संपुर्ण कार्यकाळात त्यांनी महिंद्रा कंपनीला घरोघरी ओळख प्राप्त करून दिली होती.केशुब महिंद्रा 2004 ते 2010 पर्यंत व्यापार आणि उद्योगावरील पंतप्रधान परिषदेचे सदस्य देखील होते.

केशुब महेंद्रा यांच्या नेतृत्वाखाली महेंद्रा कंपनीने कोणकोणती उपलब्धी प्राप्त केली?कोणकोणत्या क्षेत्रात आपल्या उद्योगाचा विस्तार करण्यात यश मिळवले?

केशव महिंद्रा यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत महिंद्रा कंपनीने विविध क्षेत्रात आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार करण्यात यश प्राप्त केले आहे.

See also  18 मे महत्वाच्या चालू घडामोडी - current affairs in Marathi

केशुब महेंद्रा यांच्या नेतृत्वात आतापर्यंत कंपनीने फायनान्स,रिअल इस्टेट,आयटी सेक्टर,वाहन निर्मिती अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी दर्शवली आहे.

महेंद्रा कंपनीची जागतिक पातळीवर मोठमोठ्या दिग्दज कंपनीसोबत भागीदारी घडवून आणण्यात केशुब महेंद्रा यांनी आपले फार मोलाचे योगदान दिले आहे.

याचसोबत केशुब महेंद्रा यांनी विविध शासकीय तसेच खासगी कंपन्या मध्ये संचालक म्हणून देखील काम पाहिले होते.

केशुब महिंद्रा यांचे शिक्षण –

केशुब महिंद्रा यांनी आपले पदवीचे शिक्षण Wharton University of Pennsylvania मधुन पुर्ण केले आहे.

केशुब महिंद्रा यांच्या वडिलांचे नाव –

केशुब महिंद्रा यांच्या वडिलांचे नाव जगदीशचंद्र महेंद्रा असे होते.

केशव महिंद्रा यांचा भाचा –

केशव महिंद्रा यांच्या भाच्याचे नाव आनंद महिंद्रा असे आहे.

केशुब महिंद्रा यांची अपत्ये –

केशुब महिंद्रा यांच्या अपत्यांची नावे उमा रणजित मल्होत्रा लिना लाबरू असे आहे.

केशुब महिंद्रा यांच्या भावंडांची नावे हरिष महेंद्रा तसेच सुरेश महेंद्रा असे आहे.