मानवी अंतराळ उडडाणाचा आंतरराष्ट्रीय दिवस – International Day Of Human Space Flight In Marathi

मानवी अंतराळ उडडाणाचा आंतरराष्ट्रीय दिवस – International Day Of Human Space Flight In Marathi

आज १२ एप्रिल आहे आज तो दिवस ज्या दिवशी मानवाने प्रथमत अंतराळात आपले पहिले पाऊल टाकले होते.म्हणुन ह्या दिवसाला मानवी अंतराळ उडडाणाचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून ओळखले जाते.

म्हणुन हा दिवस संपुर्ण जगभरात मानवी अंतराळ उडडाणाचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून वैश्विक पातळीवर साजरा केला जातो.

१२ एप्रिल १९६१ मध्ये मानवाने प्रथमत अंतराळात आपले पहिले पाऊल टाकले होते.तेव्हापासुन हा दिवस युरी गागरीन यांनी केलेल्या एका ऐतिहासिक अंतराळ उड्डाणाच्या रूपात आनंदात साजरा केला जातो.

आजच्याच दिवशी वोस्तोक १ ह्या अंतराळ यानाने आपले पहिले मानवयुक्त अंतराळ उड्डाण केले होते.असे सांगितले जाते की याआधी जे अंतराळ उड्डाण करण्यात आले होते ते मानवरहित होते.

१२ एप्रिल रोजी केलेले अंतराळ उड्डाण हे पहिलेच मानवयुक्त अंतराळ उड्डाण होते.वोस्तोक १ ह्या अंतराळ यानाला सोव्हिएत अंतराळवीर युरी गागरीन यांच्या समवेत लाॅच करण्यात आले होते.

हे मिशन पुर्ण करत सोव्हिएत संघाने अंतराळात पहिला व्यक्ती पाठविण्याच्या ह्या शर्यतीमध्ये अमेरिका सारख्या बलाढ्य देशाला देखील मागे टाकण्यात यश प्राप्त केले होते.

असे सांगितले जाते की सोव्हिएत अंतराळवीर युरी गागरीन ह्या अंतराळ प्रवासातुन तब्बल १०८ मिनिटांचा अंतराळ प्रवास पुर्ण करून जमिनीवर परत आले होते.यानंतरच मानवाला अंतराळात पाठविले जाण्याचा ठराव करण्यात आला होता.

१२ एप्रिल १९६१ मधील उडडाणाचे महत्व-

International Day Of Human Space Flight In Marathi
  • हे जगातील पहिले ऐतिहासिक अंतराळ उड्डाण म्हणून ओळखले जाते.
  • हे मानवाने केलेले पहिले अंतराळ उड्डाण होते.
  • सोव्हिएत नागरीक युरी गागरीन यांनी हा पहिला मानवी अंतराळ उड्डाणाचा इतिहास रचला होता.हया अंतराळ उड्डाणासोबत पृथ्वीची यशस्वीरीत्या परिक्रमा पुर्ण करणारा जगातील पहिला व्यक्ती बनण्याचा मान देखील युरी गागरीन यांनी ह्या उडडाणासोबत मिळविला होता.
  • ह्या ऐतिहासिक घटनेने संपूर्ण मानवजातीसाठी अवकाश संशोधनाचा मार्ग खुला झाला होता.यानंतरच मानवाने अंतराळात जाऊन संशोधन करण्यास सुरुवात केली होती.
  • २०१७ मध्ये सात एप्रिल रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने १२ एप्रिल ह्या दिनास मानवी अंतराळ उडडाणाचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून प्रथमतः घोषित केले होते.
  • हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू हा विकास अणि ध्येयाच्या प्राप्तीसाठी अंतराळ क्षेत्रातील योगदानाचे महत्व पटवून देणे हा होता.
  • तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवतेने किती साध्य केले आहे आज किती गोष्टी प्राप्त केल्या आहेत हे ओळखण्यास मदत करणारा हा दिवस आहे.
  • हा दिवस आपल्याला सहकार्य, सहभाग आणि अंतराळातील तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीचे महत्त्व दर्शवण्याचे काम करतो ज्याने आपले जग एक चांगले स्थान बनवण्यास योगदान दिले आहे.
See also  मदर टेरेसा के अनमोल विचार तथा कोटस Mother Teresa quotes and thoughts in Hindi