बँलन्स शीट विषयी माहीती -आर्थिक ताळेबंद- Balance Sheet Information In Marathi

बँलन्स शीट विषयी माहीती Balance Sheet Information In Marathi

मित्रांनो ज्या वेळी आपण कुठल्याही कंपनीत गुंतवणुक करत असतो.सर्वात पहिले आपण त्या कंपनीचे नीट व्यवस्थित निरीक्षण,विश्लेषण करत असतो.

अणि आपल्याला तर माहीतच आहे की कोणत्याही कंपनीच्या आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी त्या कंपनीचे आर्थिक विवरण समजुन घेणे खुप आवश्यक असते.

कंपनीचे आर्थिक विवरण हे एकुण तीन प्रकारचे असते.

1) बँलन्स शीट –

2) इन्कम स्टेटमेंट –

3) कँश फ्लो स्टेटमेंट –

आजच्या लेखात आपण या तिघांपैकी बँलन्स शीट याविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

बँलन्स शीट म्हणजे काय?

बँलन्स शीट हे एक आर्थिक विवरण किंवा ताळेबंद असतो,ज्याला इंग्रजीत फायनान्शिअल स्टेटमेंट असे म्हणतात.

हे स्टेटमेंट प्रत्येक कंपनीकडुन तयार केले जात असते.आर्थिक वर्षाच्या शेवटी हे स्टेटमेंट कंपनी तयार करते.अणि हे स्टेटमेंट कुठल्याही कंपनीच्या वार्षिक आर्थिक अहवालामध्ये दाखविले जात असते.

कंपनीचे बँलन्स शीट हे त्या कंपनीची आर्थिक स्थिति दर्शवत असते.म्हणजे त्या कंपनीने वर्षभरात किती कमाई केली?किती पैशांची बचत केली आहे?किती पैसे कंपनीसाठी खर्च केले आहे इत्यादी. थोडक्यात मालमत्ता आणि दायित्वचा ताळेबंद.

बँलन्स शीटला बँलन्स शीट असेच का म्हटले जाते?

कुठल्याही कंपनीचे बँलन्स शीट हे एकुण दोन विभागात विभागले जात असते.

ज्यात एका बाजुने त्या कंपनीचे अँसेट (मालमत्ता) दाखविले जात असते.

तर दुसरया बाजुने त्या कंपनीच्या लायबिलिटीज (दायित्व कींवा देणं) दाखवल्या जात असतात.अणि हे दोघे नेहमी अगदी बँलन्समध्ये राहत असतात.हेच कारण आहे की बँलन्स शीटला बँलन्स शीट असे म्हटले जाते.

See also  जेईई ऍडव्हान्स डचा निकाल जाहीर निकाल बघण्यासाठी ह्या डायरेक्ट लिंकवर क्लिक करा - JEE advanced २०२३ result declared in Marathi

बँलन्स शीट हे आपणास कंपनीच्या कोणकोणत्या बाबींविषयी माहीती देण्याचे काम करते?

बँलन्स शीट हे आपणास कुठल्याही कंपनीच्या आर्थिक वर्षाच्या शेवटी त्या कंपनीच्या पुढील तीन महत्वाच्या बाबींविषयी माहीती देण्याचे काम करते.

1)संपत्ती-assets

कंपनीकडे असे कोणकोणते अँसेटस सध्या उपलब्ध आहेत.जिथुन कंपनीला पैसे मिळता आहे.

म्हणजेच कंपनीला कोणकोणत्या सोर्समधुन इन्कम प्राप्त होत आहे हे यात सांगितले जात असते.

2)उधारी कर्ज -liabilities

यात याची माहीती दिलेली असते की सदर कंपनीने किती कर्ज घेतलेले आहे.कंपनीवर किती उधारी आहे.

म्हणजेच थोडक्यात सांगायचे म्हटले तर कंपनीच्या अशा कोणकोणत्या लायबिलिटीज आहेत जिथुन कंपनीकडे पैसे येत नसुन उलट कंपनीकडुन पैसे जाता आहे.

3) भागीदारांनी केलेली गुंतवणुक -share holder equity

यात हे सांगितलेले असते की कंपनीच्या शेअर होल्डर्सने म्हणजेच भागीदारांनी आपल्या किती पैशांची गुंतवणुक कंपनीत केलेली आहे.

कुठल्याही कंपनीच्या शेअर होल्डर इक्विटीला कंपनीचे नेटवर्थ किंवा बुक व्हँल्युह असे देखील म्हटले जाते.

बँलन्स शीट कसे बनविले जाते?

कुठल्याही कंपनीचे बँलन्स शीट हे दोन पदधतीने बनविता येते.

1)क्षैतिज ताळेबंद -horizontal balance sheet

2) अनुलंब ताळेबंद -vertical balance sheet

1)क्षैतिज ताळेबंद -horizontal balance sheet-

यात कुठल्याही कंपनीचे बँलन्स शीट ही आडव्या पदधतीने दोन भागामध्ये विभाजित केले जात असते.

ज्यात डाव्या बाजुला कंपनीचे अँसेटस दाखवले जाते.

ह्या अँसेटचे देखील दोन भागात विभाजन करण्यात येते.करंट अँसेट अणि दिर्घकालीन म्हणजेच लाँग टर्म अँसेट.

करंट अँसेटमध्ये अशा संपत्तीचा समावेश होत असतो ज्याचा कुठल्याही कंपनीकडुन वर्षभरासाठी वापर केला जात असतो.किंवा त्यातुन रक्कम,नफा प्राप्त करणार असते.

उदा,इन्वहेंटरी,कँश आँन कँश इक्यालंट,अल्पकालीन गुंतवणुक इत्यादी.

अणि लाँग टर्म अँसेटमध्ये अशा दिर्घकालीन गुंतवणुक,जमीन,बिल्डींग,कारखाना,इतर साधने यांचा समावेश होत असतो.ज्यांच्या मधुन एका वर्षानंतर नफा प्राप्त होत असतो एका वर्षाच्या आत कंपनीला कुठलाही नफा तसेच कँश प्राप्त होणार नसते.

See also  फेक लोन अ‍ॅप्स म्हणजे काय? | Fake loan apps information in Marathi

अणि उजव्या बाजुला कंपनीच्या सर्व लायबिलिटीज तसेच इक्विटी दाखवल्या जात असतात.

ज्यात सर्वप्रथम कंपनीच्या लायबिलिटीज दाखवल्या जात असतात.लायबिलिटीजचे देखील दोन भागात विभाजन करण्यात येते.

एक करंट लायबिलिटीज अणि दुसरे नाँन करंट तसेच लाँग टर्म लायबिलिटीज.

करंट लायबिलीटीजमध्ये अशा कर्जाचा समावेश होत असतो जे कंपनीला एका वर्षाच्या आत फेडायचे असते.

उदा, शाँर्ट टर्म लोन,अकाऊंट पेईबल इत्यादी.

अणि नाँन करंट तसेच लाँग टर्म लायबिलीटीजमध्ये अशा दीर्घकालीन कर्जाचा समावेश होत असतो जे कर्ज कंपनीला एका वर्षाच्या नंतर फेडायचे असते.

लायबिलीटीज नंतर कुठलीही कंपनी आपल्या इक्विटी अणि लायबिलिटीजच्या बाजुस कंपनीची इक्विटी दाखवत असते.

इक्विटीमध्ये इक्विटी शेअर कँपिटल,रिटेन अरनिंग इत्यादींचा समावेश होत असतो.

मग सर्वाचे मिळुन कंपनी तिची एकुण इक्विटी दाखवत असते.

ज्यात कंपनीच्या पुर्ण लायबिलीटीज अणि इक्विटी अँड करून सर्व लायबिलीटी अणि इक्विटीची टोटल दाखवण्यात येते.जी एकुण अँसेटच्या समानच असते.

2) अनुलंब ताळेबंद -vertical balance sheet-

अधिकतम कंपनीकडुन हे बँलन्स शीटच तयार केले जात असते.

यात देखील कुठल्याही कंपनीचे बँलन्स शीट दोन भागात विभाजित केले जाते.फक्त हे बँलन्स शीट उभ्या पदधतीने विभाजित केले जात असते.

यात पहिल्या भागात त्या कंपनीचे अँसेटस दाखवले जात असतात.अणि त्याच्याखाली दुसरया भागात त्या कंपनीच्या लायबिलीटीज तसेच इक्विटी दाखवल्या जात असतात.

बँलन्स शीटचे फायदे तसेच महत्व काय आहे?

● कुठल्याही कंपनीचे बँलन्स शीट बघुन आपण कंपनीची सध्याची आर्थिक परिस्थिति कशी आहे हे जाणुन घेऊ शकतो.

● एखादी कंपनी किती नफ्यात आहे तसेच किती तोटयात चालली आहे कंपनीची एकुण नेटवर्थ किती आहे हे गुंतवणुकदार बँलन्स शीट बघुन जाणुन घेऊ शकतो.

कंपनीचे बँलन्स शीट तयार करण्याची जबाबदारी कोणाची असते?याची पुर्वतयारी कोण करते?

कंपनीचे बँलन्स शीट कोण तयार करेल हे निश्चित ठरलेले नसते.कारण प्रत्येक वेगवेगळया कंपनीत वेगवेगळया पार्टीकडुन आपापल्या आर्थिक परिस्थिति नुसार हे काम बघितले जाते.

See also  ६८ व्या फिल्म फेम पुरस्काराविषयी माहिती 68 th film fare award information in Marathi

लहान सहान कंपनींचे बँलन्स शीट तयार करण्याचे काम कंपनीचे मालक स्वता करत असतात.तर जी कंपनी खुप मोठी नाही अणि छोटीही नाहीये अशा मध्यम कंपनीचे बँलन्स शीट कंपनीमध्येच तयार केले जात असते.

अणि बँलन्स शीट कनफरमेशन करायला क्राँस चेक करायला बाहेरच्या अकाऊंटटची तात्पुरता स्वरुपात मदत घेतली जात असते.

पण ज्या मोठमोठया कंपन्या असतात त्यांना आपले बँलन्स शीटमध्ये अचुकता तसेच दर्जेदारपणा हवा असतो.ते आपल्या कंपनीच्या बाहेरील अकाऊंटंट कडुनच आपले बँलन्स शीट तयार,चेक करून घेत असतात.

ज्या सार्वजनिक कंपन्या असतात त्यांना आपल्या कंपनीच्या बँलन्स शीटचे आर्थिक विवरण करावे लागते.धंधाच्या जमाखर्च किंवा हिशेबांची अधिकृतरीत्या तपासणी करावी लागते.

म्हणुन अशा कंपन्या आपले बँलन्स शीट सीए म्हणजेच चार्टड अकाऊंटंट कडुनच तयार करून घेत असतात.

बँलन्स शीटचे काही तोटे-

● बँलन्स शीटदवारे आपल्याला कुठल्याही कंपनीच्या रोजच्या व्यवसायातील व्यवहारांची माहीती प्राप्त होत नसते.

● यात जे प्रोडक्ट इन प्रोसेस असतात यांच्याविषयी माहीती प्राप्त होत नाही.

● यामध्ये अँसेट हे सध्याच्या मार्केट व्हँल्युह नुसार नव्हे तर जुन्या किंमती खर्चानुसार दर्शवले जाऊ शकते.